Rule Change 2025 : शेतकऱ्यांचं कर्ज, UPI ते गॅस सिलेंडरच्या किमती... 1 जानेवारी 2025 पासून काय काय बदलणार?

1 जानेवारी 2025 पासून देशात अनेक मोठे बदल लागू होणार आहेत. ज्याचा परिणाम प्रत्येक सामान्य नागरिकावर होणार आहे. या बदलांमध्ये स्वयंपाकघरात वापरल्या जाणाऱ्या एलपीजी सिलिंडरच्या किंमतीपासून ते UPI पेमेंटपर्यंतच्या नियमांचा समावेश आहे.

Mumbai Tak
social share
google news

बातम्या हायलाइट

point

नव्या वर्षात कोणकोणते नवे बदल होणार?

point

UPI पासून ते गॅस सिलेंडरच्या दरापर्यंत, काय काय बदलणार?

point

सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री लागणार?

New Rule Change from 1 Jaunaury 2025 : 2024 वर्ष संपायला फक्त सहा दिवस उरले असून, नवीन वर्ष 2025 च्या स्वागताची जगभर तयारी सुरू आहे. पण नव्या वर् म्हणजेच 1 जानेवारी 2025 पासून देशात अनेक मोठे बदल लागू होणार आहेत. ज्याचा परिणाम प्रत्येक सामान्य नागरिकावर होणार आहे. या बदलांमध्ये स्वयंपाकघरात वापरल्या जाणाऱ्या एलपीजी सिलिंडरच्या किंमतीपासून ते UPI पेमेंटपर्यंतच्या नियमांचा समावेश आहे.

1. LPG सिलेंडरच्या किमती

प्रत्येक महिन्याच्या 1 तारखेप्रमाणे, 1 जानेवारी 2025 रोजी, तेल विपणन कंपन्या घरघुती आणि व्यावसायिक एलपीजी गॅसच्या किमतीत बदल करणार असून, नवीन दर जाहीर करतील. गेल्या काही काळापासून कंपन्यांनी 19 किलोच्या व्यावसायिक एलपीजी सिलिंडरच्या किमतीत अनेक बदल केले असले तरी, 14 किलोच्या घरघुती सिलिंडरच्या किमती अनेक महिन्यांपासून स्थिर आहेत.  याशिवाय हवाई इंधनाच्या किमतीतही बदल दिसू शकतात.

2. EPFO ​​चा नवीन नियम

1 जानेवारी 2025 रोजी, नव्या वर्षाच्या पहिल्या दिवशी, 
कर्मचारी भविष्य निर्वाह निधी म्हणजेच EPFO ​​द्वारे पेन्शनधारकांसाठी एक नवीन नियम लागू केला जाईल. ही एक मोठी भेट असणार आहे. EPFO ​​नवीन वर्षात पेन्शनधारकांसाठी एक मोठा बदल करणार आहे, ज्या अंतर्गत आता पेन्शनधारक देशातील कोणत्याही बँकेतून त्यांच्या पेन्शनची रक्कम काढू शकतील आणि यासाठी त्यांना कोणत्याही व्हेरीफिकेशनची आवश्यकता असणार नाही.

हे ही वाचा >>Navi Mumbai Car Accident : दोन कारची धडक, एअरबॅग उघडल्या अन् मानेला झटका बसल्यानं चिमुकल्याचा मृत्यू...

3. UPI 123Pay चे नियम

फीचर फोनवरून ऑनलाइन पेमेंट सुविधा देण्यासाठी रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) ने UPI 123Pay लाँच केलं आहे. यामध्ये व्यवहाराची मर्यादा वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला असून, ती 1 जानेवारीपासून लागू होणार आहे. यानंतर यूजर्स आता 10,000 रुपयांपर्यंतचे ऑनलाइन पेमेंट करू शकतील. यापूर्वी ही मर्यादा फक्त 5,000 रुपये होती.

4. शेअर मार्केट

सेन्सेक्स, सेन्सेक्स-50 आणि बँकेक्सच्या मासिक एक्स्पायरीमध्ये बदल करण्यात आले आहेत. कारण मासिक एक्सपायरी आता दर आठवड्याला शुक्रवारी नाही, तर मंगळवारी होणार आहे. तर तिमाही आणि सहामाही करार शेवटच्या मंगळवारी संपणार आहेत. दुसरीकडे, NSE निर्देशांकाने निफ्टी 50 मासिक करारांसाठी गुरुवार निश्चित केला आहे.

हे ही वाचा >> Maharashtra Weather Update : 27 आणि 28 डिसेंबरला विदर्भ, मराठवाड्यात गारपिटीसह पावसाची शक्यता, वाचा तुमच्या जिल्ह्याची अपडेट

5. शेतकऱ्यांना कर्ज


वर्षाच्या पहिल्या दिवसापासून, RBI शेतकऱ्यांना कोणत्याही हमीशिवाय 2 लाख रुपयांपर्यंतचे कर्ज देण्यास सुरूवात करणार आहे. काही दिवसांपूर्वीच आरबीआयने शेतकऱ्यांसाठी विना गॅरंटी कर्जाची मर्यादा वाढवण्याची घोषणा केली होती. यामुळे आता त्यांना 1.6 लाख नाही तर 2 लाख रुपयांपर्यंत कर्ज मिळू शकणार आहे.

हे वाचलं का?

    follow whatsapp