Social Media चं व्यसन मानसिक आरोग्यासाठी घातक! कसं कराल धटक्यात दूर?

रोहिणी ठोंबरे

ADVERTISEMENT

Social Media चं व्यसन मानसिक आरोग्यासाठी घातक! कसं कराल धटक्यात दूर?
Social Media चं व्यसन मानसिक आरोग्यासाठी घातक! कसं कराल धटक्यात दूर?
social share
google news

Siocial Media Addiction : सोशल मीडियाचा (Social Media) अति वापर तुमच्या मानसिक आरोग्याशी जोडलेला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, जर तुम्ही फोनचा वापर 30 मिनिटांपेक्षाही कमी करत असाल तर मानसिक आरोग्यासोबतच तुमच्या नोकरीतील समाधान मिळेल. जर तुम्ही फोन सतत वापरत राहिल्यास त्याचा तुमच्या मानसिक आरोग्यावर गंभीर परिणाम होऊ शकतो. (Social media addiction is dangerous for mental health How to get rid from it)

ADVERTISEMENT

संशोधकांना असे आढळून आले की, सोशल मीडियाच्या कमी वापरामुळे व्यक्तींना कामाचे ओझे कमी वाटू लागले आणि ते ऑनलाइन नसताना त्यांच्या नेटवर्कमध्ये घडणाऱ्या महत्त्वाच्या घटनांपासून वंचित राहण्याची भीती ज्याला FOMO म्हणून ओळखले जाते ते कमी झाले आहे.

वाचा : मनोज जरांगेच्या सभेत चोरांचा सुळसुळाट, एका मागून एक लांबवले दागिने

कोणत्याही गोष्टीवर लक्ष केंद्रित करणं होतं कठीण?

संशोधकांना असे आढळून आले की, सोशल मीडिया टाळल्याने लोकांना त्यांचे काम करण्यासाठी अधिक वेळ मिळतो. अहवालात असे म्हटले आहे की, जे लोक त्यांचे सोशल मीडिया फीड अॅक्टिव्ह ठेवण्यासाठी त्यांचे काम थांबवतात, त्यांना त्यांच्या कामावर लक्ष केंद्रित करणे अधिक कठीण होते.

हे वाचलं का?

माहितीसाठी, संशोधन टीमने 166 लोकांचा समावेश होता. हे लोक दररोज किमान 35 मिनिटे सोशल मीडियावर घालवायचे. हे सर्व लोक दोन गटात विभागले गेले. एक गट ज्यांनी त्यांच्या सोशल मीडियाच्या सवयी बदलल्या नाहीत, तर दुसरा गट ज्यांनी सात दिवस दररोज फक्त 30 मिनिटे सोशल मीडियासाठी घालवली.

वाचा : Opinion Poll 2024 : शिंदे-पवारांची साथ… भाजपवरच ‘बुमरँग’! ओपिनियन पोलचा अर्थ काय?

सोशल मीडियाचे व्यसन म्हणजे काय?

सध्या सोशल मीडिया वारंवार पाहणे आणि स्क्रोल करणे सामान्य झाले आहे. तसंच, बहुतेक लोक सोशल मीडियावर बराच वेळ घालवतात आणि त्यासाठी वेळ सेट करत नाहीत. अशा यूजर्सना सोशल नेटवर्किंग साइट्सचे व्यसन लागते, ज्यामुळे त्यांच्या इतर कामांवरही परिणाम होतो.

ADVERTISEMENT

सोशल मीडियाच्या व्यसनाची लक्षणे कोणती?

सामान्य लक्षणांमध्ये सोशल मीडियावर जास्त वेळ घालवणे, सोशल मीडियावर पोस्ट टाकण्यासाठी फोटो क्लिक करण्यासाठी बाहेर जाणे. एखाद्याच्या पोस्ट किंवा स्टोरीला मिळालेल्या लाईक्सची संख्या यांचा यामध्ये समावेश होतो. यामध्ये सतत व्ह्यूज तपासणे याचा समावेश आहे. सोशल मीडियाचा वापर कमी करणे किंवा सोडण्याचा प्रयत्न अयशस्वी होणे, अस्वस्थता, चिडचिडेपणा इत्यादी लक्षणांचा यामध्ये समावेश आहे.

ADVERTISEMENT

वाचा : Sunil Kedar : ‘भगवान के घर देर है…अंधेर नहीं…!’ राष्ट्रवादीच्या नेत्याचे सूचक ट्विट

फोनच्या व्यसनातून सुटका कशी मिळवावी?

ज्याप्रमाणे आपण वजन कमी करण्यासाठी किंवा फिटनेससाठी डाएट घेतो, त्याचप्रमाणे सोशल मीडिया डाएटही लागू करता येतो. ज्याला याचे व्यसन आहे तो दररोज थोडा थोडा सोशल मीडियाचा वापर कमी करू शकतो. ज्याप्रमाणे वजन कमी करण्यासाठी क्रॅश डाएट हा चांगला पर्याय नाही, त्याचप्रमाणे सोशल मीडियापासून पूर्णपणे दूर राहणे देखील व्यावहारिकदृष्ट्या शक्य नाही आणि ते चिंतेचे कारण असू शकते. यासाठी झोपण्यापूर्वी एक ते दोन तास सोशल मीडियापासून दूर राहा जेणेकरून तणाव आणि झोपेचा त्रास होणार नाही.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT