‘कहां राजा भोज कहां गंगू तेली’ म्हणीत आहे तिसरा व्यक्ती; कहाणी वाचून तुम्हीही व्हाल अवाक्!

रोहिणी ठोंबरे

ADVERTISEMENT

Story Behind Raja Bhoj and Gangu Teli Idiom
Story Behind Raja Bhoj and Gangu Teli Idiom
social share
google news

Raja Bhoj and Gangu Teli Idiom : आपण शाळेत असताना मराठी, हिंदी या भाषेच्या विषयांमधून अनेक म्हणी शिकलो आहोत. अशीच एक हिंदी भाषेतील प्रसिद्ध म्हण म्हणजे, ‘कहां राजा भोज कहां गंगू तेली’… दोन लोकांमधील फरक सांगण्यासाठी ही म्हण अनेकदा वापरली जाते. राजा भोज म्हणजे मोठा आणि गंगू तेली म्हणजे लहान. या म्हणीवरून असं दिसतं की, त्यामागे दोन लोक असावेत. कोणी राजा तर कोणी दुसरा व्यक्ती आणि त्यांच्यामध्ये तुलना सुरू असावी. (The Real Story Behind Raja Bhoj and Gangu Teli Idiom)

ADVERTISEMENT

पण, यात तिसर्‍या व्यक्तीचाही हात असल्याचे समजलं तर? आज आपण या म्हणी मागील अर्थ सविस्तर आणि सखोलरित्या जाणून घेऊयात.

भयंकर! जिच्यासाठी इस्लाम स्वीकारला, नंतर तिच्याच डोक्यात…

राजा भोज हा परमार घराण्याचा 9वा राजा होता. राजा भोजने आपल्या 55 ​​वर्षांच्या आयुष्यात अनेक लढाया लढल्या आणि जिंकल्या. मध्य प्रदेशातील धार ही त्यांची राजधानी होती. एवढेच नव्हे तर, त्यांनी मध्य प्रदेशची राजधानी भोपाळ शहराचीही स्थापना केली. नंतर त्या शहराला भोजपाल नगर म्हटले गेले, जे कालांतराने भूपाल आणि आता भोपाळ म्हणून ओळखले जाऊ लागले. ही एका राजाची ओळख आहेच पण त्याची आणखी एक ओळख आहे.

हे वाचलं का?

1018-19 मध्ये महमूद गझनवीसोबत भारतात आलेले पर्शियन विद्वान अल-बिरुनी यांनीही आपल्या एका कथेत राजा भोजचा उल्लेख केला आहे. भोज हे मोठे विद्वान होते. त्यांना धर्म, व्याकरण, भाषा, काव्य इत्यादींचे ज्ञान होते. भोज यांनी सरस्वतीकंठभरण, शृंगारमंजरी, चंपुरायण यांसारखी अनेक पुस्तके लिहिली. त्यापैकी 80 पुस्तकं आजही उपलब्ध आहेत.

शरद पवारांबाबत रवी राणांचा मोठा दावा, पंधरा दिवसात राजकीय भूकंप होणार?

परमार राजा अर्जुन वर्मनच्या लिखाणावरून हे समजतं की, एकदा चेदीदेशचा राजा गांगेयदेव कलचुरी आणि राजा भोज यांच्यात युद्ध झाले. इकडे राजा भोज आणि गांगेयदेव कलचुरी यांच्यात लढाई चालू होती, तर दुसरीकडे जयसिंग तेलंग नावाच्या राजानेही मध्ये उडी घेतली. त्याने गांगेयदेवाला साथ दिली. एका बाजूला राजा भोज तर, दुसऱ्या बाजूला गांगेयदेव आणि जयसिंग तेलंग लढत होते.

ADVERTISEMENT

खूप लढाई झाली. एकदा तर राजा भोज यांना गोदावरीच्या काठावर घेरलंही होतं पण तरीही राजा भोज कोकण जिंकण्यात यशस्वी झाले. गांगेयदेव कलचुरी आणि जयसिंग तेलंग यांचा पराभव झाला आणि गांगेयदेवच्या राज्याचा काही भाग राजा भोजकडे गेला.

ADVERTISEMENT

या दोन राजांना पराभूत केल्यानंतर ‘कुठे राजा भोज आणि कुठे गंगे तैलंग’ ही म्हण लोकांमध्ये प्रचलित झाली. पण कालांतराने लोक ‘कहां राजा भोज और कहां गांगेय तैलंग’ म्हणू लागले. या म्हणीतील तिसरा माणूस कोण होता हे आता तुम्हाला माहीतच असेल.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT