लाइव्ह

Marathi News Live: पुरस्कारांचाही आता तिरस्कार वाटू लागला, विनेश फोगटनेही घेतला पुरस्कार वापसीचा निर्णय

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

लाइव्हब्लॉग बंद

  • 10:40 PM • 26 Dec 2023

    Marathi News Live : पुरस्कारांचाही आता तिरस्कार वाटू लागला, विनेश फोगटनेही घेतला पुरस्कार वापसीचा निर्णय

    कुस्तीपटू बजरंग पुनियानंतर आता विनेश फोगटनेही पदक परत करण्याची जाहीर केले आहे. याबाबत तिला मिळालेला मेजर ध्यानचंद खेलरत्न आणि अर्जुन पुरस्कारही परत करण्याचा निर्णय घेतला आहे. पुरस्कार वापसी करताना तिने आजपर्यंत केलेल्या सहकार्याबद्दल तिने सगळ्यांचे आभारही मानले आहेत.
  • 08:45 PM • 26 Dec 2023

    Marathi News Live : फडणवीस, अजितदादा आणि शिंदेंच्या निर्णयावरच लोकसभा आम्ही जिंकणार, चंद्रशेखर बावनकुळेंना विश्वास

    नांदेड जिल्ह्यातील अनेक मोठे नेते संपर्कात आहेत मात्र अशोक चव्हाण यांच्या संपर्कात आम्ही नाही असं स्पष्टपणे भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले. फडणवीस, अजितदादा आणि एकनाथ शिंदे मिळून जो निर्णय घेतील त्याप्रमाणे लोकसभेच्या जागांवर विजय होणार असल्याचाही विश्वास त्यांनी व्यक्त केला. माढा लोकसभा मतदारसंघात खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना बावनकुळे यांचा लोकसभेसाठी ग्रीन सिग्नल, मोदींनी सर्वात अधिक निधी देऊन विशेष प्रेम दाखवले असल्याचे सांगत त्यांनी देशातील टॉप 10 मध्येही खासदार निंबाळकर यांचा समावेश असल्याचे त्यांनी सांगितले.
  • 06:44 PM • 26 Dec 2023

    Marathi News Live : मोदींच्या नव्या भारताचा रस्ता महाराष्ट्रातून जातो, फडणवीसांना जपानच्या विद्यापीठाकडून डॉक्टरेट

    महाराष्ट्रासाठी जपानकडून नेहमीच मदतीचा हात पुढं राहिला असल्याचे मत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले. मुंबईच्या विकासातही जपानचा महत्वाचा वाटा असून वर्सोवा ते विरार सी-लिंकचं कामही जपानमुळेच करता आल्याचे त्यांनी सांगितले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विकसित भारताचे जे स्वप्न बाळगले आहे, त्या भारताच्या विकासाचा रस्ता महाराष्ट्रातून जात असल्याचेही त्यांनी सांगितले.
  • 03:19 PM • 26 Dec 2023

    प्रतापराव चिखलीकरांचा दावा, अशोक चव्हाणांनी केला खुलासा

    "अशोक चव्हाण यांच्या साखर कारखान्याची दीडशे कोटी रुपयांची थकहमी मागच्या सरकारने दिली नाही. पण, भाजपच्या नेत्यांकडे चव्हाण गेले आणि महायुती सरकारने थकहमी दिली. यावरून लक्षात घेतले पाहिजे की, अशोक चव्हाण सत्तेसाठी येऊ शकतात. त्यांच्यासाठी काही नवीन नाही. आम्ही त्यांचे भाजपत स्वागत करू", असे नांदेडचे खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर म्हणालेले.
  • ADVERTISEMENT

  • 02:47 PM • 26 Dec 2023

    अशोक चव्हाण वंचित बहुजन आघाडीबद्दल काय म्हणाले?

    इंडिया आघाडी प्रकाश आंबेडकरांच्या वंचित बहुजन आघाडीला सोबत घेणार की नाही, याकडे सगळ्यांचं लक्ष आहे. दिल्लीत झालेल्या बैठकीत प्रकाश आंबेडकरांना सोबत घेण्याबद्दल चर्चा झाल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार यांनी दिली. त्यानंतर राज्यातील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अशोक चव्हाण यांनी वंचित बहुजन आघाडीबद्दल भूमिका मांडली आहे.
  • 11:53 AM • 26 Dec 2023

    शिंदे गटा इतक्याच जागा आम्हाला हव्या -छगन भुजबळ

    अजित पवार गटाचे नेते छगन भुजबळ यांनी लोकसभेच्या जागा वाटपाबाबत एक मोठं विधान केले आहे. शिंदेंच्या शिवसेनेला जितक्या जागा मिळतील तितक्याच आम्हाला मिळाल्या पाहिजे, असे भुजबळ यांनी म्हटलं आहे.
  • ADVERTISEMENT

  • 10:52 AM • 26 Dec 2023

    तुम्हाला जर झटका बसला, तर मला टेन्शन येईन -मनोज जरांगे

    माध्यमांशी "ओबीसीतून आरक्षण मिळावं यासाठी आमचा संघर्ष सुरू राहणार आहे", असे सांगतानाच मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा छगन भुजबळांना खेडबोल सुनावले. ते म्हणाले, "तो माणूस कामातून जायचा अंदाज दिसतोय. मला तर धाकच पडलाय त्याचा. भुजबळ साहेब, सुसंस्कृतपणा तुमच्याकडून काय शिकावा? सुधरा. आज भुजबळ साहेब बोलतोय, सुधरा. शेवटी या राज्यातील एक अभ्यासू माणूस आहे. तुम्हाला जर झटका बसला, तर मला लय टेन्शन येईन. इतका चांगला माणूस आम्हाला पागल होऊ द्यायचा नाही. मला लय बेकार वाटायला लागलं आहे. सांगा तरी काय झालंय तुम्हाला?", अशी टीका जरांगे पाटलांनी भुजबळांवर केली.
  • 09:17 AM • 26 Dec 2023

    पुण्यावर प्रेम पण, लोकसभा निवडणूक...; अखेर फडणवीसांनी दिले उत्तर

    महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या मीडिया टॉवर या खासगी तत्वावरील गृहनिर्माण योजनेचा शुभारंभ कार्यक्रमाला देवेंद्र फडणवीस उपस्थित होते. याच कार्यक्रमात फडणवीसांनी पुण्यातून लोकसभा निवडणूक लढणार की नाही, याचं उत्तर दिलं.देवेंद्र फडणवीस म्हणाले, "पुण्यावर माझ विशेष प्रेम आहे. पण उद्या लगेच बातम्या येतील की पुण्यातून लढणार. पण, आधीच सांगतो की, मी पुण्यातून लोकसभा निवडणूक लढणार नाही", असे त्यांनी जाहीर केले. पुढे फडणवीस म्हणाले, "जोपर्यंत पुण्याला नवीन विमानतळ मिळणार नाही तोपर्यंत पुण्याचा विकास होणार नाही, हे मी सांगतो. यासाठी जन आंदोलन उभं करावं लागणार आहे. या विमानतळ कामात ज्यांच्या जमिनी जातील, त्यांना मी आश्र्वासित करतो की त्यांचं कुठलही नुकसान होणार नाही, त्यांना उत्तम मोबदला दिला जाईल", अशी ग्वाही देवेंद्र फडणवीस यांनी दिली.
  • 09:10 AM • 26 Dec 2023

    अमोल कोल्हे शरद पवारांची घेणार भेट

    शिरुर लोकसभा मतदारसंघावरून अजित पवारांनी खासदार अमोल कोल्हेंना इशारा दिला आहे. कोल्हेंना पाडणार आणि आपला उमेदवार निवडून आणणारच, असा इशारा अजित पवारांनी दिला आहे. त्यानंतर आता अमोल कोल्हे मंगळवारी (26 डिसेंबर) शरद पवारांची पुण्यातील मोदी बाग येथील निवासस्थानी भेट घेणार आहेत. अजित पवार यांनी टीका केल्यानंतर शरद पवार यांचे मार्गदर्शन आणि शिवनेरी ते पुणे जिल्हाधिकारी कार्यालय शेतकरी आक्रोश मोर्चा बाबत करणार चर्चा करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
  • 09:02 AM • 26 Dec 2023

    मोदी घालवायचा की पक्ष वाढवायचा, प्रकाश आंबेडकरांचा इंडिया आघाडीतील पक्षांना सवाल

    "उद्या काय घडेल, काय नाही? हे सांगता येत नाही. कोण म्हणतंय आम्ही 23 जागा लढू, कोण म्हणतंय आम्ही अमूक जागा लढणार... आम्ही त्यांना म्हणतोय की, पहिल्यांदा जागा सोडा... मोदीचं भूत जे बसलंय ते पहिल्यांदा उतरवा. पक्ष वाढवणं हे जागांवरून ठरतं. तुम्हाला पक्ष वाढवायचा की मोदी घालवायचा... याचा पहिल्यांदा निर्णय करा. मोदी घालवायचा असेल, तर दोन-चार जागा कमी आल्या तरी चालतील ही भूमिका असली पाहिजे. नाहीतर मला एवढ्याच जागा पाहिजे, मग मोदी तुमच्या बोकांडी बसल्याशिवाय राहणार नाही", असा इशारा प्रकाश आंबेडकर यांनी नागपुरातील सभेत दिला.
follow whatsapp

ADVERTISEMENT