मुंबई आयआयटीतील दर्शन सोळंकीचा जातीयवादाने घेतला बळी?, FIR मध्ये काय?

हर्षदा परब

आयआयटीचा विद्यार्थी दर्शन सोळंकीच्या आत्महत्येनंतर अखेरीस पोलिसांनी ‘जातीभेदामुळे दर्शनने आत्महत्या केल्याचा’ गुन्हा दाखल करुन घेतला.

ADVERTISEMENT

Mumbai IIT student Darshan Solanki committed suicide. In this case, the police have filed a crime of committing suicide by casteism.
Mumbai IIT student Darshan Solanki committed suicide. In this case, the police have filed a crime of committing suicide by casteism.
google news

IIT Bombay Dalit student suicide case Update : मुंबईतील आयआयटीचा विद्यार्थी दर्शन सोळंकीच्या आत्महत्येच्या दीड महिन्यांनंतर अखेरीस पोलिसांनी ‘जातीभेदामुळे दर्शनने आत्महत्या केल्याचा’ गुन्हा दाखल करुन घेतला आहे. जातीभेद करुन आत्महत्येला प्रवृत्त करण्याबद्दल एका विद्यार्थ्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात अशी तक्रार दाखल करुन घेण्यात आलीय. दर्शनच्या कुटुंबियांची तशी मागणी होती. पण त्यासाठी त्यांना मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या कार्यालयाचे दरवाजे ठोठावावे लागले.

दर्शनच्या कुटुंबियांनी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या या पत्रांनंतर सोळंकी कुटुंबियांच्या मागणीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला. दर्शनने कॉलेज कॅम्पसमधल्या हॉस्टेलच्या 7 व्या मजल्यावरुन उडी मारुन 13 फेब्रुवारीला आत्महत्या केली होती. त्यानंतर केवळ पवईमधील आयआयटी कॅम्पस आणि त्यातले विद्यार्थीच नाही तर ही बातमी ऐकलेला प्रत्येक जण हादरुन गेला होता.

गुजरातच्या अहमदाबादमधला दर्शन सोळंकी आयआयटीमध्ये केमिकल इंजिनिअरिंगच्या पहिल्या वर्षात शिकत होता. अवघ्या 18 वर्षांच्या दर्शन सोळंकीने कॉलेज कॅम्पसमधल्या 7 व्या मजल्यावरुन उडी मारुन आत्महत्या केली. त्यानंतर पवई पोलिसांनी या प्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद करुन तपास सुरू केला. पण त्याच वेळी दर्शनने जातीभेदातून झालेल्या छळाला कंटाळून आत्महत्या केल्याचा आरोप काही संघटनांकडून झाला.

हेही वाचा – Mumbai Viral Video : दोन मुलींसोबत तरूणाचा बाईकवर जीवघेणा स्टंट, पोलिसांकडून शोध सुरु

ज्या पवई आयआयटीचा दर्शन विद्यार्थी त्याच कॅम्पसमधल्या ‘आंबेडकर पेरियार फुले स्टुडंट सर्कल संघटनेने’ या संदर्भात एक पत्र काढलं. दर्शनने जातीभेदातून आत्महत्या केल्याचा आरोप संघटनेने केला. कॅम्पसमध्येच अनुसूचित जाती – जमातीमधील विद्यार्थ्यांसोबत भेदभाव केला जातो, असा आरोप करत याच जातीभेदाच्या मनस्तातून दर्शनने आत्महत्या केल्याचा संशयही या संघटनेने व्यक्त केला होता.

हे वाचलं का?