“संजय राऊतांना गोळ्या घालणार”, मुंबई पोलिसांनी दोघांना ठोकल्या बेड्या

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbai Police Arrested two people in sanjay raut, sunil raut death threat case
Mumbai Police Arrested two people in sanjay raut, sunil raut death threat case
social share
google news

Sanjay Raut Death Threat : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) खासदार संजय राऊत आणि त्यांचे बंधू तथा आमदार सुनील राऊत यांना जीवे मारण्याची धमकी काही दिवसांपूर्वी देण्यात आली होती. या प्रकरणी मुंबई पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. पोलिसांनी अटक केलेल्या आरोपींची नावेही समोर आली असून, 8 जून रोजी दुपारी 4 ते 5 वाजेच्या दरम्यान संजय राऊत आणि सुनील राऊत यांना शिवीगाळ करत गोळ्या घालेन अशी धमकी कॉलवरून देण्यात आली होती.

ADVERTISEMENT

“संजय राऊतांना सकाळचा भोंगा बंद करायला लाव. त्याला कॉल उचलायला सांग. संजय राऊत आणि तुला (सुनील राऊत) गोळ्या घालणार आणि एका महिन्याच्या आत दोघांना स्मशानात पाठवणार”, अशी धमकी कॉलवरून देण्यात आली होती. आरोपीने शिवीगाळही केली.

याप्रकरणी मुंबईतील कांजूरमार्ग पोलीस ठाण्यात भारतीय दंड विधान कलम 506 (2) आणि 504 कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. याप्रकरणी आता कांजूरमार्ग पोलिसांनी दोघांना अटक केली आहे.

हे वाचलं का?

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, धमकी प्रकरणात अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे रिझवान झुल्फिकार अन्सारी आणि शाहिद अन्सारी अशी आहेत.

ADVERTISEMENT

आरोपीने सुनील राऊतांना कॉल करून काय म्हटलं होत?

सुनील राऊत – हॅलो.
धमकी देणारा – हॅलो,
सुनील राऊत – हा
धमकी देणारा – सुनील राऊत बोलताहेत ना?
सुनील राऊत – हा, बोलतोय.
धमकी देणारा – हा, तर तुझ्या भावाला समजव, संजय राऊतला.
सुनील राऊत – कोण माझा भाऊ?
धमकी देणारा – संजय राऊत तुझा भाऊ आहे ना? *** समजव, गोळ्या घालीन ***ला.
सुनील राऊत – तू कुठे गोळ्या मारणार?
धमकी देणारा – जिथे सांगाल, तिथे गोळ्या घालीन.
सुनील राऊत – कुठे, सांग ना? मी त्यांना तिथे पाठवून देतो मारण्यासाठी.
धमकी देणारा – सकाळचा भोंगा बंद करायला सांग.

ADVERTISEMENT

हेही वाचा >> Chavadi Impact: संजय राऊत म्हणाले शिवसेना शाहांनी फोडली, गृहमंत्री म्हणाले सेना तर…

सुनील राऊत -अरे कुठे पाठवू सांग ना? जिथे गोळ्या घालणार आहेस, तिथे पाठवून देतो +**
धमकी देणारा – त्याला भोंगा बंद करायला सांग ***ला. माझा फोन का घेत नाहीये तो?
सुनील राऊत – अरे, *** कुठे पाठवू ते सांग ना?
धमकी देणारा – अरे, *** माझा कॉल का उचलत नाहीये, ** फाटलीये का?
सुनील राऊत – कुणाची?
धमकी देणारा – संजय राऊतची. त्याला कॉल तर उचलायला सांग.
सुनील राऊत – आ
धमकी देणारा – शपथ घेऊन सांगतो, आता फक्त कॉल केलाय.
सुनील राऊत – संजय राऊत, *** मर्द आहे, समजलं का? तुझ्यासारखा ** नाहीये.
धमकी देणारा – त्याला सकाळचा भोंगा बंद करायला सांग.
सुनील राऊत – चल तुझ्या ***, जे उखडायचं ते उखाड.
धमकी देणारा – मी गोळ्या घालेन.
सुनील राऊत – (हसत) गोळी… कोणती लिमलेटची गोळी मारणार का? कोणती गोळी मारणार?
धमकी देणारा- त्याला समजव, गोळ्या घालेन त्याला.
सुनील राऊत – सोड रे.
धमकी देणारा – तो माझा कॉल का घेत नाहीये?
सुनील राऊत – सोड रे.
धमकी देणारा – सोड रे काय… त्याला माझा कॉल उचलायला सांग नाहीतर गोळ्या घालेन. एका महिन्यात दोन्ही भावांना गोळ्या घालणार.
सुनील राऊत – कुठे गोळ्या घालणार? आम्ही दोघंही तिथे येतो.
धमकी देणारा – दोन्ही भावांना स्मशानात पाठवेन.

हेही वाचा >> Chandrashekhar Bawankule: “शरद पवारांनी षडयंत्र सुरू केले आहे, कारण…”

सुनील राऊत – *** ठिके. मार. मार आम्हाला.
धमकी देणारा – सकाळचा भोंगा बंद करायला सांग, त्याला.
सुनील राऊत – हा, मार मार.
धमकी देणारा – एका महिन्याच्या आत दोन्ही भावांना स्मशानात पाठवणार.
सुनील राऊत – ठिके. सोड रे ***
धमकी देणारा – एका महिन्यात दोघांना स्मशानात पाठणार.
सुनील राऊत – हा, बघतो मी. तू खुशीत रहा.
धमकी देणारा – कोणत्या गोष्टीमुळे तू इतका उडतोय?
सुनील राऊत – तुझ्यावर, बोल काय करायचं आहे?
धमकी देणारा – गोळ्या घालेन गोळ्या. समजलं का?
सुनील राऊत – अरे पन्नास वेळा तुला सांगितलंय की मारून दाखव दोन्ही भावांना.
धमकी देणारा – ठिके. दाखवतो मी तुम्हा दोन्ही भावांना गोळ्या घालून.
सुनील राऊत – ठिके, दाखव. चल आता फोन ठेव.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT