"तुमच्यासारख्या अनुभवी...", विराट कोहलीची मनधरणी करताना BCCI ने काय म्हटलं?

मुंबई तक

Virat kohli : टीम इंडियाचा कसोटी संघाचा माजी कर्णधार रोहित शर्माने नुकतीच निवृत्तीची घोषणा केली. त्यानंतर आता टीम इंडियाचा रन मशीन अशी ओळख असणाऱ्या विराट कोहलीने कसोटी फॉर्म्याटमधून निवृत्तीचा निर्णय घेतला आहे. यावर बीसीसीआयने निवृत्त न होण्यासाठी आवाहन केलं आहे.

ADVERTISEMENT

विराट कोहलीचा कसोटीतून निवृत्त होण्याचा निर्णय
विराट कोहलीचा कसोटीतून निवृत्त होण्याचा निर्णय
social share
google news

बातम्या हायलाइट

point

विराट कोहलीचा कसोटी फॉर्म्याटमधून निवृत्तीचा निर्णय.

point

बीसीआयच्या सूत्रांनी महत्त्वाची माहिती दिली.

Virat Kohli : टीम इंडियाचा कसोटी संघाचा माजी कर्णधार रोहित शर्माने नुकतीच निवृत्तीची घोषणा केली. त्यानंतर आता टीम इंडियाचा रन मशीन अशी ओळख असणाऱ्या विराट कोहलीने कसोटी फॉरमॅट निवृत्तीचा निर्णय घेतला आहे. मात्र, विराट कोहलीने निवृत्तीचा निर्णय घेऊ नये अशी माहिती बीसीसीआयच्या सूत्रांनी दिली आहे. 

हेही वाचा : चुकूनही पाकिस्तानात जाणार नाही, इंग्लंडचा खेळाडू एअरपोर्टवर ढसा ढसा का रडला?

वृत्तमाध्यमानुसार, बीसीआयने विराट कोहलीला कसोटी फॉरमॅटच्या निवृत्तीवर पुनर्विचार करावा असं आवाहन केलं आहे. मात्र, विराट हा आपल्या निर्णयावर ठाम असल्याचं बोललं जात आहे. सांगण्यात येतंय की, बीसीसीआयने कोहलीसोबत निवृत्तीची चर्चा केली. त्या चर्चेत बीसीआयने टीम इंडियामध्ये अनुभवी खेळाडूंच्या महत्त्व पटवून दिलं आहे. मात्र, विराट कोहली आपल्या निर्णयावर ठाम आहे. 

सूत्रांनुसार, विराट कोहली कसोटी फॉरमॅटमधून निवृत्त होणार असल्याचं म्हणाला. त्यावेळी त्याला आगामी इंग्लंडविरोधात कसोटी सामने खेळण्याची विनंती करण्यात आली होती. दरम्यान, कोहली आपल्या निर्णयावर ठाम आहे. तरी एका आठवड्यानंतरच्या बैठकीनंतर यावर निर्णय घेतला जाईल. 

ऑस्ट्रेलियामध्ये झालेल्या बॉर्डर गावस्कर ट्रॉफी दरम्यान विराट कोहलीनं म्हणावी अशी कामगिरी केली नाही. त्यामुळे त्यांच्या कामगिरीवर अनेकांनी प्रश्न उपस्थित केले होते. कसोटी असा फॉर्म्याट आहे की, ज्याला सर्वाधिक क्रिकेट रसिकांनी पसंती दिली आहे. रोहित शर्मानंतर आता विराटने निवृत्तीचा निर्णय घेतला आहे. दरम्यान, टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीही निवृत्त होईल असं बोललं जातंय. 

हेही वाचा :  भाचीच्या डोहाळे जेवणासाठी आलेल्या मावशीचे 11 लाखांचे दागिणे लंपास, पुण्यात घडला धक्कादायक प्रकार

दरम्यान सांगण्यात येत आहे की, इंग्लंड दौऱ्यादरम्यान टीम इंडियाच्या कसोटी सामन्यासाठी प्लेईंग इलेव्हनबाबतचा अंतिम निर्णय 23 मे रोजी होणार आहे. यावेळी कोहलीच्या निवृत्तीच्या निर्णयाची माहिती समोर येईल.   

हे वाचलं का?

    follow whatsapp