चुकूनही पाकिस्तानात जाणार नाही, इंग्लंडचा खेळाडू एअरपोर्टवर ढसा ढसा का रडला?

मुंबई तक

India Pakistan ceasefire : भारत-पाकिस्तान युद्धादरम्यान, दोन्ही देशांमधील क्रिकेट लीग स्थगित करण्यात आल्या होत्या. त्यानंतर पाकिस्तानने त्या खेळाडूंना यूएईला पाठवण्यात आलं होतं. त्यावेळी न्यूझीलंडचा अष्टपैलू खेळाडू म्हणून ओळखल्या जाणाऱ्या डॅरिल मिशेलने पुन्हा पाकिस्तानला जाणार नसल्याच्या भावना व्यक्त केल्या आहेत. सर्वात जास्त भावनिकरित्या प्रभावित झालेल्यांपैकी, इंग्लंडचा खेळाडू रडत होता.

ADVERTISEMENT

भरत पाकिस्तान युद्धावेळी इंग्लंडच्या खेळाडूला अश्रू अनावर
भरत पाकिस्तान युद्धावेळी इंग्लंडच्या खेळाडूला अश्रू अनावर
social share
google news

बातम्या हायलाइट

point

भारत-पाकिस्तान युद्धादरम्यान, दोन्ही देशांमधील क्रिकेट लीग स्थगित करण्यात आल्या होत्या

point

पाकिस्तानने त्या खेळाडूंना यूएईला पाठवण्यात आलं होतं

point

परिस्थिती पाहता इंग्लंडच्या खेळाडूला अश्रू अनावर

India pakistan ceasefire : भारत-पाकिस्तान या दोन्ही देशांदरम्यान युद्धाला 86 हून अधिक तास झालेत. यामुळे दोन्ही देशातील सुरू असणाऱ्या T20 प्रिमीयर लीग स्थगित करण्यात आल्यात. या युद्धादरम्यान, पाकिस्तानातील गद्दाफी स्टेडियमवर हल्ला करण्यात आला अशी माहिती मिळत होती. या संकटकाळात बांगलादेशचा फिरकीपटू गोलंदाज रिशान हुसैननं खुलासा केला. न्यूझीलंडचा अष्टपैलू खेळाडू म्हणून ओळख असणाऱ्या डॅरिल मिशेलनं पुन्हा पाकिस्तानात जाणार नसल्याची भावना व्यक्त केलीय. अशातच इंग्लंडच्या खेळाडूला रडू कोसळल्याची माहिती आता समोर येत आहे. 

हेही वाचा : "पाकिस्तानच्या मातीत दहशतवादाला...", ट्रम्प यांच्या हस्तक्षेपावरून संतप्त ओवैसींचे 4 सवाल

नेमकं काय घडलं? 

भारत पाकिस्तान दोन्ही देशांत युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली होती. त्यावेळी पाकिस्तानातील पीसीएल आणि भारताची आयपीएल अशा दोन्ही लीग स्थगित करण्यात आल्या. यानंतर पीएसएलमध्ये खेळणाऱ्या खेळाडूंना युएईमध्ये हलवण्यात आले. 

दरम्यान, सॅम बिलिंग्ज, डॅरेल मिशेल, कुशर परेरा, डेव्हिड विस, टॉम करन असे काही खेळाडू घाबरले होते, असे रिशादनं क्रिकबझला सांगितलं. परिस्थिती संवेदनशील असताना न्यूझीलंडच्या डॅरिल मिशेलनं मी पुन्हा कधीही पाकिस्तानात जाणार नाही, असं म्हणत त्यांनं आपली भावना व्यक्त केली. 

हे वाचलं का?

    follow whatsapp