रायगड जिल्ह्यातील ताम्हिणी घाटात दरड कोसळली, सनरुफ तोडून महिलेच्या डोक्यात दगड पडला, महिलेचा दुर्दैवी अंत
Raigad accident : रायगड जिल्ह्यातील ताम्हाणी घाटात एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. एका धावत्या कारवर दगड रडून एका महिलेचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
 
 रायगड जिल्ह्यातील ताम्हाणी घाटात भयंकर अपघात
 
 दरडीचा भाग कोसळून महिलेच्या डोक्यात आदळला
Raigad Accident : रायगड जिल्ह्यातील ताम्हिणी घाटात भयंकर अपघात झाल्याची घटना उघडकीस आली आहे. एका धावत्या कारवर दगड रडून एका महिलेचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. ताम्हिणी घाटातील कोंडीथर गावाच्या एका हद्दीत गुरुवारी सकाळी हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. दगड थेच कारच्या सनरुफवर आदळला. या अपघातात महिलेचा जागीच मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे. ही धक्कादायक घटना 30 ऑक्टोबर रोजी घडली.
हे ही वाचा : विश्वचषकात ऑस्ट्रेलियाला घरी पाठवणारी टीम इंडियाची वाघीण, कोण आहे जेमिमा?
दरडीचा भाग कोसळला आणि थेट गाडीच्या सनरुफवर आदळला
मृत्यू झालेल्या महिलेची आता ओळख पटली आहे. स्नेहल गुजराथी (वय 43) असे महिलेचं नाव आहे. स्नेहल गुजराथी या पुण्याहून माणगावकडे निघाल्या असता, हा अपघात घडला असे सांगण्यात येत आहे. या घडलेल्या अपघातामुळे एकच खळबळ उडाली आहे. पुण्यावरून माणगावच्या दिशेने एक गुजराती कुटुंब आपल्या लग्झरी कारने प्रवास करत होते.
ताम्हिणी घाटात दरडीचा भाग कोसळून महिलेच्या डोक्यात...
या प्रवासादरम्यान ते ताम्हिणी घाटातील कोंडीथर गावाजवळ आले असता, दरडीचा एक भाग कोसळला आणि कारच्या सनरुफवर तोडून महिलेच्या डोक्यात आदळल्याने महिलेच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. या दुर्देवी घटनेनंतर त्यांना मोदी क्लिनिकमध्ये रुग्णालयात दाखल करण्यासाठी नेण्यात आले असता, त्यांचा मृत्यू झाला.
हे ही वाचा : "एअरगनने त्याने आधी फायर केलं..." रोहित आर्या केससंबंधी मुंबई पोलिसांची माहिती... स्टुडिओच्या आत नेमकं काय घडलं?
दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून ताम्हिणी घाटात मोठ्या प्रमाणात अपघाताच्या घटना घडताना दिसत आहेत. काही दिवसांआधी याच भागात पावसाची परिस्थिती अधिक असल्याने अशा घटना घडल्या आहेत. तसेच मुरूम असलेला दरडीचा भाग सैल झाल्याने दगड गोटे खाली कोसळल्याचे दिसून येत आहे.














