'ज्याला पलटन वाढवायची असेल, वाढवा बाबा...' आंबे खाऊन पोरं होत नाहीत... अजित पवारांचं लोकसंख्या नियंत्रणावर भाष्य

मुंबई तक

Ajit Pawar : उपमुख्यमंत्री अजित पवारांनी इंदापूर तालुक्यातील भवानीनगर येथे एका कार्यक्रमात बोलताना लोकसंख्या नियंत्रणावर भाष्य केले. तेव्हा त्यांनी बोलताना आंबे खावून मुलं होत नसल्याचं म्हणत, मिश्कील टोला लगावला आहे.

ADVERTISEMENT

ajit pawar
ajit pawar
social share
google news

बातम्या हायलाइट

point

वाढती लोकसंख्या रोखण्यासाठी कुटुंब मर्यादित ठेवण्याचा अजित पवारांकडून सल्ला

point

'ज्याला पलटन वाढवायची असेल, वाढवा बाबा...'

point

नेमकं काय म्हणाले अजित पवार?

Ajit Pawar : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे त्यांच्या वक्तव्यासाठी नेहमी चर्चेत असतात. अनेकदा त्यांनी मिश्कील टिप्पणी करत विरोधकांवर टीका केल्या आहेत. तसेच जे पोटात ते ओठात असल्याचा प्रत्यय अजित पवारांकडून अनेकदा बघायलाही मिळाला आहे. अशातच आता अजित पवारांनी आंबा खाऊन पोरं जन्माला होत नाहीत, कुटुंबं मर्यादीत ठेवण्याचे त्यांनी उपस्थितांना सल्ला दिला. ते इंदापूर तालुक्यातील भवानीगर येथे एका कार्यक्रमात बोलत होते. 

हे ही वाचा :  Maharashtra Weather: अरे चाललंय तरी काय.. तुफान पावसाला सुरुवात, जणू काही पावसाळाच!

वाढती लोकसंख्या रोखण्यासाठी कुटुंब मर्यादित ठेवण्याचा अजित पवारांकडून सल्ला

अजित पवारांनी वाढती लोकसंख्या रोखण्यासाठी कुटुंब मर्यादित ठेवण्याचा सल्ला दिला. इंदापूर तालुक्यातील भवानीनगर येथे आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. पंचायत राजव्यवस्थेतील जनसंख्या नियंत्रणासाठी कायदे आणण्याचा प्रयचत्न केला, मात्र अनेक अडचणी आल्याचे त्यांनी सभेत उपस्थितांना संबोधित केले. आपला प्रपंच वाढताना कुटुंब मर्यादित ठेवणं गरजेचं असल्याचे  ते म्हणाले. 

आम्हाला कायदे करायचे होते, पण खूप अडचणी आल्या. निवडणुकीत उभे राहण्यासाठी दोनपेक्षा अधिक अपत्य असतील तर त्याला उभे राहता येणार नाही. सरकारच्या सर्व योजना मिळवता येतील, पण तीन अपत्य असतील तर त्यांना लाभ घेता येणार नसल्याचे ते म्हणाले, तसेच जो आपलं कुटुंब मर्यादीतपणे ठेवेल, त्यालाच याचा लाभ मिळणार आहे. यामुळे जनसंख्या नियंत्रणाला चांगलं प्रोत्सहान मिळेल, असा अजित पवारांनी दावा केला आहे. 

हे ही वाचा : पुणे : मला जो आई बनवेल त्याला 25 लाख, मोबाईलवर आली जाहिरात, पुण्यातील कंत्राटदाराला 11 लाखांचा गंडा

'ज्याला पलटन वाढवायची असेल, वाढवा बाबा...'

लोकसंख्या वाढीवर बोलताना अजित दादांनी मिश्कील टीप्पणी केली. ज्याला पलटन वाढवायची असेल, वाढवा बाबा, आम्हाला काय करायचं? कोणी म्हणतात की देवाची ही कृपा आहे, अरे बाबा ही देवाची नाही तुझी कृपा आहे, कोणी म्हणतात आंबे खाऊन मूलं होतात, पण ते काय झाले नाही, या वक्तव्याने उपस्थितांना हसू आवरले नाही. 

हे वाचलं का?

    follow whatsapp