पुणे : मला जो आई बनवेल त्याला 25 लाख, मोबाईलवर आली जाहिरात, पुण्यातील कंत्राटदाराला...
Pune cyber crime : पुण्यात सायबर फसवणुकीचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. सोशल मीडियावर प्रेग्नंट जॉब या जाहीरातीच्या माध्यमातून शहरातील एका कंत्राटदाराला तब्बल 11 लाखांचा गंडा घातला आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
 
 पुण्यात सायबर फसवणुकीचा धक्कादायक प्रकार उघडकीस
 
 कंत्राटदराच्या मोबाईलवर प्रेग्नंट जॉबची जाहीरात
 
 11 लाखांना लुटलं
Pune Cyber Crime : पुण्यात सायबर फसवणुकीचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. सोशल मीडियावर प्रेग्नंट जॉब या जाहीरातीच्या माध्यमातून शहरातील एका कंत्राटदाराला तब्बल 11 लाखांचा गंडा घातला आहे. एका महिलेला गर्भवती केल्यास एक दोन नाही,तर तब्बल 25 लाख रुपये दिले जातील, असा दावा करण्यात आला होता. याच आमिषाला बळी पडून एका कंत्राटदाराची फसवणूक झाली आहे. या प्रकरणात बाणेर पोलिसांनी लक्ष घालत पुढील तपास सुरु केला आहे.
हे ही वाचा : रायगड जिल्ह्यातील ताम्हिणी घाटात दरड कोसळली, सनरुफ तोडून महिलेच्या डोक्यात दगड पडला, महिलेचा दुर्दैवी अंत
कंत्राटदराच्या मोबाईलवर प्रेग्नंट जॉबची जाहीरात
बाणेर पोलिसांना दिलेल्या तक्रारीनुसार, सप्टेंबर महिन्यातील पहिल्याच आठवड्यात कंत्राटदराच्या मोबाईलवर प्रेग्नंट जॉब अशी एक जाहीरात आली होती. त्यात व्हिडिओत एक महिला बोलताना दिसते की, मला आई बनवेल अशाच व्यक्तीच्या मी शोधात आहे.मला त्या व्यक्तीच्या जातीशी, शिक्षणशी, रंगाशी फारसं महत्त्वाचं वाटत नाही. संबंधित व्हिडिओत फोन नंबर होता, त्यावर संपर्क साधून कंत्राटदाराने व्यक्तीशी बोलून संबंधित जॉबचा सहाय्यक असल्याचे सांगितलं. त्याने कंत्राटदाराला सांगितलं की, महिलेसोबत राहण्यासाठी रजिस्ट्रेशन करावं लागेल आणि ओळखपत्र तयार करण्यास सांगितले.
कंत्राटदाराकडून 11 लाख रुपये ट्रान्सफर
रजिस्ट्रेशन फी, ओळखपत्र, व्हेरिफिकेशन, जीएसटी अशा विविध कारणांसाठी पैशांची मागणी करण्यात आली. तपासातील अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, सप्टेंबर महिन्यातील पहिल्याच आठवड्यात ते 23 ऑक्टोबरपर्यंत कंत्राटदाराकडून वेगवेगळ्या हप्त्यांमधून 11 लाख रुपये ट्रान्सफर करण्यात आले होते. या काळात संबंधितांनी खोटे आश्वासन देऊन तर कधी धमक्या देऊन शांत केले. जेव्हा कंत्राटदाराने त्यांच्या मागण्याबद्दल प्रश्न विचारायला सुरुवात केली, तेव्हा त्यांनी त्याला ब्लॅक केलं. त्याचक्षणी आपली फसवणूक झाल्याचा प्रकार हा त्याच्या लक्षात आला आणि त्याने तातडीने पोलीस ठाणे गाठत तक्रार दाखल केली.
हे ही वाचा : Pune News : पिंपरी-चिंचवडमध्ये पाणी भरताना महिलेचा टाकीत पडून मृत्यू, घटनेनं परिसरात एकच खळबळ
पैशांचे लालच
प्रेग्नंट जॉब सर्व्हिस प्रमाणे असे अनेक फसवणुकीचे प्रकार आता समोर येऊ लागले आहेत. या स्कीम्समध्ये पुरुषांना महिलांना गर्भवती केल्यास लाखो रुपये मिळतील, असे पैशांचे लालच दाखवले गेले. फसवणूक करणारे रजिस्ट्रेशन फीच्या नावाखाली पैसे उकळतात. तसेच त्यानंतर मेडिकल टेस्ट, कायदेशीर प्रक्रिया, सेक्युरिटी डिपॉझिट इत्यादी कारणांखाली अधिक रक्कमेची मागणी करतात, पैसे मिळाल्यानंतर हे ठगी गायब होतात.














