Pune News : पिंपरी-चिंचवडमध्ये पाणी भरताना महिलेचा टाकीत पडून मृत्यू, घटनेनं परिसरात एकच खळबळ

मुंबई तक

Pune News : पुण्यातील पिंपरी- चिंचवडमध्ये एका सोसायटीत भूमिगत पाण्याच्या टाकीत बुडून एका 52 महिलेचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

ADVERTISEMENT

pune news
pune news
social share
google news

बातम्या हायलाइट

point

पिंपरी- चिंचवडमध्ये पाण्याच्या टाकीत बुडून महिलेचा मृत्यू

point

फुरसुंगीत टँकरमध्ये महिलेचा मृतदेह आणखी एक धक्कादायक प्रकार

Pune News : पुण्यातील पिंपरी- चिंचवडमध्ये एका सोसायटीत भूमिगत पाण्याच्या टाकीत बुडून एका 52 महिलेचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ही घटना शुक्रवारी घडली असून या घटनेनं परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.  अशा संजय गवळी (वय 52) असे मृत महिलेचं नाव आहे. ती चिंचवड येथील मोहननगर येथील दुर्गा रेसिडेन्सी येथे राहत असल्याची माहिती तपासातून समोर आली. 

हे ही वाचा : रायगड जिल्ह्यातील ताम्हिणी घाटात दरड कोसळली, सनरुफ तोडून महिलेच्या डोक्यात दगड पडला, महिलेचा दुर्दैवी अंत

महिलेचा पाणी भरताना टाकीत पडून मृत्यू 

शु्क्रवारी सकाळी महिला पाणी भरण्यासाठी इमारतीच्या परिसरात गेली. तेव्हा पाणी भरताना त्यांचा पाण्याच्या टाकीत पडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. पोलीस या प्रकरणाचा तपास करत असून, महिलेचा मृतदेह शवविच्छेनासाठी पिंपरी येथील यशवंतराच चव्हाण मेमोरियल रुग्णालयात दाखल करण्यात आला होते. मात्र, त्यानंतर त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. 

पुण्यातील फुरसुंगीत टँकरमध्ये महिलेचा मृतदेह 

दरम्यान, मागील वर्षी हडपसरमध्येही असाच धक्कादायक प्रकार समोर आला होता. पुण्यातील फुरसुंगीत एका 25 वर्षीय महिलेचा मृतदेह हा पाण्याच्या टँकरमध्ये आढळून आला होता. तपासातून समोर आले की, ही महिला पहाटे कोणालाही न सांगता घराबाहेर पडली, त्यानंतर तिच्या कुटुंबियांनी शोधाशोध सुरु केली असता, नंतर तिचा पाण्याच्या टँकरमध्ये मृतदेह आढळून आला होता. 

हे ही वाचा : महिला सफाई कर्मचाऱ्यांना मासिक पाळीमुळे कामावर येण्यास उशिर, सुपरव्हायझरला संशय, सॅनिटरी पॅड काढून फोटोही घेतले...

संबंधित प्रकरणात पोलिसांनी मृताची ओळख पटवली. कौशल्या चव्हाण (वय 25) ही हांडेवाडीच्या दुगड चाळ येथील रहिवासी आहे. त्याच दिवशी नंतर कौशल्याचा मृतदेह हा पाण्याच्या टाकीत आढळल्याचे दिसून आले. 

हे वाचलं का?

    follow whatsapp