रामप्रसादशी लग्न, पण सुनीलवर जडला जीव; धोतऱ्याच्या बियांची पावडर केली अन्...
अनैतिक संबंधातून बायकोने नवऱ्याचा काटा काढला आहे. युट्यूबवर बघून तिने हत्येचा कट रचला. या घटनेमुळे मैसूर शहर हादरुन गेले आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
महिलेचे अनैतिक संबंध
नवऱ्याला संपवण्यासाठी रचला भयानक कट
अंत्यसंस्कारांनंतर उलगडलं मृत्यूचं गूढ
Crime News : अनैतिक संबंधातून बायकोने आपल्या नवऱ्याची निर्घृण हत्या केली आहे. या संबंधांमध्ये अडथळा ठरत असलेल्या नवऱ्याचा काटा काढण्यासाठी एका पत्नीने युट्यूबवरून विष देण्याचे तंत्र शिकून त्याला संपवले. पवित्रा असे आरोपी पत्नीचे नाव असून सुनील असे तिच्या प्रियकराचे नाव आहे. पोलिसांनी याप्रकरणी तातडीने कारवाई करत दोघांनाही बेड्या ठोकल्या आहेत. कर्नाटकच्या म्हैसूर जिल्ह्यातील हुनसूर तालुक्यातून ही खळबळजनक घटना आहे.
रामप्रसादशी लग्न, सुनीलशी अनैतिक संबंध
मिळालेल्या माहितीनुसार, पवित्राचा विवाह 35 वर्षीय रामप्रसाद याच्याशी झाला होता आणि त्यांना दोन मुले आहेत. पवित्राचे गावातीलच सुनील नावाच्या तरुणासोबत अनैतिक संबंध होते, ज्यावरून दोघा पती-पत्नीत नेहमी वाद होत असत. या वादाला कंटाळून आणि मार्गातील अडचण दूर करण्यासाठी पवित्राने पतीला संपवण्याचा कट रचला. यासाठी तिने युट्यूबवर धोतऱ्याच्या विषारी बियांच्या प्रभावाविषयी माहिती मिळवून हत्येची योजना आखली.
हे ही वाचा : संजय राऊत यांचा मोठा आरोप, भाजप आमदारानेच ऑडिओ क्लीप व्हायरल केली?
धोतऱ्याच्या बियांची पावडर
योजनेनुसार, 16 ऑक्टोबरच्या रात्री रामप्रसाद दारूच्या नशेत घरी आल्यानंतर पवित्राने त्याला इडलीमध्ये धोतऱ्याच्या बियांची पावडर मिसळून खाऊ घातली. मात्र, विष देऊनही रामप्रसादचा मृत्यू झाला नाही आणि त्याची प्राणज्योत मालवली नाही. हे पाहून घाबरलेल्या पवित्राने तात्काळ आपल्या प्रियकर सुनीलला घरी बोलावून घेतले. त्यानंतर दोघांनी मिळून रामप्रसादची गळा आवळून अत्यंत निर्दयपणे हत्या केली, ज्यामुळे त्याचा जागीच मृत्यू झाला.
हे ही वाचा : दुहेरी हत्याकांडाने महाराष्ट्र हादरला, मंदिर परिसरात दोघांचा खून; नेमकं काय घडलं?
अंत्यसंस्कारही उरकले, पण...
हत्येनंतर खुनाचा हा प्रकार लपवण्यासाठी पवित्राने मृत रामप्रसादच्या भावाला फोन करून तो दही खाल्ल्यामुळे उठत नाही, असा खोटा बनाव रचला. नातेवाईकांनी उपचारासाठी त्याला रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. सुरुवातीला संशय न आल्याने आणि पवित्राच्या बोलण्यावर विश्वास ठेवून कुटुंबीयांनी मृत रामप्रसादवर अंत्यसंस्कारही उरकले होते, मात्र पोलिसांच्या तपासात सत्य उघडकीस आले.
