Govt Job: टॉप क्लास अधिकारी बनण्याची सुवर्णसंधी! SEBI च्या 'या' भरतीसाठी लवकरच करा अर्ज...
भारतीय प्रतिभूति और विनिमय बोर्ड (SEBI) म्हणजेच 'सेबी'कडून ऑफिसर ग्रेड A असिस्टंट मॅनेजर पदासाठी भरती जाहीर करण्यात आली आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
 
 टॉप क्लास अधिकारी बनण्याची सुवर्णसंधी!
 
 SEBI मध्ये निघाली मोठ्य पदांसाठी भरती
Govt Job: अधिकारी पदावरील सरकरी नोकरीच्या प्रयत्नात असणाऱ्या तरुणांसाठी चांगली संधी उपलब्ध झाली आहे. भारतीय प्रतिभूति और विनिमय बोर्ड (SEBI) म्हणजेच 'सेबी'कडून ऑफिसर ग्रेड A असिस्टंट मॅनेजर पदासाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. या भरतीसाठी 30 ऑक्टोबर म्हणजेच कालपासूनच अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू झाली असून उमेदवार 28 नोव्हेंबर पर्यंत अर्ज करू शकतात. त्यामुळे इच्छुक आणि पात्र उमेदवार लवकरच अधिकृत वेबसाइटवर जाऊन या भरतीसाठी अर्ज करू शकतात.
भारतीय प्रतिभूति और विनिमय बोर्ड (SEBI) ही भारत सरकारची फायनान्शियल म्हणजेच आर्थिक रेग्युलेटरी संस्था असून त्याचा मुख्य उद्देश शेअर बाजारातील गुंतवणूकदारांच्या हिताचे रक्षण करणे आणि शेअर बाजाराच्या विकासाला चालना देणे आहे. या भरतीच्या माध्यमातून उमेदवार भारत सरकारच्या या मोठ्या संस्थेत चांगल्या पदावर सहभागी होऊ शकतात. ही भरती ग्रेड A पदाच्या एकूण 110 रिक्त जागांसाठी केली जाणार आहे.
किती मिळेल वेतन?
दरमहा 62500 रुपये ते 126100 रुपये पगार
शैक्षणिक पात्रता
या भरतीमध्ये सहभागी होण्यासाठी उमेदवारांकडे कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून लॉ म्हणजेच कायद्यात बॅचलर्स डिग्री/ मास्टर्स डिग्री/ पोस्ट ग्रॅज्युएशन/ पोस्ट ग्रॅज्युएशन डिप्लोमा/ इंजिनीअरिंगमध्ये बॅचलर्स/ सीए/ चार्टर्ड फायनान्शियल अॅनालिस्ट/ कंपनी सेक्रेटरी/ कॉस्ट अकाउंटन्ट/ आयटी/ रिसर्च/ हिंदी विषयात मास्टर्स/ हिंदी ट्रान्सलेशन इंग्लिश/ संस्कृत/ इंग्रजी/ इकोनॉमिक्स/ कॉमर्स या संबंधित क्षेत्रात पदवी असणं आवश्यक आहे. या भरतीसाठी पदांनुसार वेगवेगळी पात्रता निश्चित करण्यात आली असून याबद्दल सविस्तर माहितीसाठी उमेदवार अधिकृत वेबसाइटला भेट देऊ शकतात.














