गंजलेल्या नंबर प्लेटची स्कुटी घेऊन फिरणाऱ्या ट्रॅफिक पोलिसाला 2 हजारांचा दंड, व्हायरल व्हिडीओतील 'त्या' तरुणाला यश

मुंबई तक

Thane Traffic cop fined Rs 2000 for riding a scooter with rusty number plate : गंजलेल्या नंबर प्लेटची स्कुटी घेऊन फिरणाऱ्या ट्रॅफिक पोलिसाला 2 हजारांचा दंड, व्हायरल व्हिडीओतील 'त्या' तरुणाला यश

ADVERTISEMENT

Thane Traffic cop fined Rs 2000 for riding a scooter with rusty number plate
Thane Traffic cop fined Rs 2000 for riding a scooter with rusty number plate
social share
google news

बातम्या हायलाइट

point

गंजलेल्या नंबर प्लेटची स्कुटी घेऊन फिरणाऱ्या ट्रॅफिक पोलिसाला 2 हजारांचा दंड

point

व्हायरल व्हिडीओतील 'त्या' तरुणाच्या धाडसाला यश

Thane Traffic cop fined Rs 2000 for riding a scooter with rusty number plate : वाहतुकीचे नियम मोडणाऱ्यांवर कारवाई करणाऱ्या ट्रॅफिक पोलिसांचं काम असतं. मात्र, स्वत: ट्रॅफिक पोलिसांनीच नियम मोडल्याने त्यांना दंड भरण्याची वेळ आली आहे. काही दिवसांपूर्वी हेल्मेटशिवाय दुचाकी चालवणाऱ्या तरुणाला ट्रॅफिक पोलिसांनी दंड ठोठावला होता. त्यानंतर त्या तरुणाने ट्रॅफिक पोलिसांच्या गाडीवरील गंजलेली नंबर प्लेट व्हिडीओ शूट करत दाखवली होती. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर अखेर पोलिस विभागालाच आपल्या कर्मचाऱ्यावर कारवाई करावी लागली. दरम्यान, धाडस करुन व्हिडीओ शूट करणाऱ्या ठाण्यातील त्या तरुणाला मोठं यश मिळाल्याची चर्चा आहे.

ट्रॅफिक पोलिसावर 2 हजारांची दंडात्मक कारवाई 

घटनेची माहिती अशी की, 27 ऑक्टोबर रोजी वागळे इस्टेट परिसरात ट्रॅफिक कॉन्स्टेबलने एका तरुणाला हेल्मेटशिवाय दुचाकी चालवत असल्याने त्याला थांबवून दंड ठोठावला. मात्र, त्याच तरुणाने पोलिसाच्याच वाहनावरील गंजलेल्या आणि अस्पष्ट नंबरप्लेटकडे लक्ष वेधले. तसेच, त्या स्कूटरवर बाजूचे आरसे नव्हते, वाहनावर अनधिकृत स्टिकर्स लावलेले होते आणि वाहन पोलिसाच्या मित्राचे असल्याचे समोर आले. या प्रकरणात नियम भंग केल्याप्रकरणी पोलिसावर 2,000 रुपयांची दंडात्मक कारवाई करण्यात आली.

हेही वाचा : लेकाची वडिलांकडे दारूसाठी पैशांची मागणी, पैसे देण्यास नकार, लोखंडी रॉडने जन्मदात्याचा केला खून... नागपूर हादरलं

तरुणाने संपूर्ण प्रकाराचा व्हिडीओ मोबाईलवर टिपला आणि तो सोशल मीडियावर शेअर केला. काही तासांतच हा व्हिडीओ व्हायरल झाला आणि नागरिकांनी “नियम सर्वांसाठी समान हवेत” अशी मागणी केली. या प्रकरणाची दखल घेत ठाणे वाहतूक विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तात्काळ कारवाईचे आदेश दिले.

हे वाचलं का?

    follow whatsapp