Govt Job: कोणत्याही परीक्षेशिवाय मिळवा रेल्वेत नोकरी! लवकरच करा अर्ज... काय आहे पात्रता?
भारतीय रेल्वे खानपान आणि पर्यटन महामंडळ (IRCTC) कडून 'हॉस्पिटॅलिटी मॉनिटर'च्या एकूण 64 पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. विशेष बाब म्हणजे, कोणत्याही लेखी परीक्षेशिवाय या पदांवर उमेदवारांची नियुक्ती केली जाणार आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
कोणत्याही परीक्षेशिवाय मिळवा रेल्वेत नोकरी!
काय आहे अर्जाची प्रक्रिया?
Govt Job: सरकारी नोकरी मिळवू इच्छिणाऱ्या उमेदवारांसाठी नव्या भरतीची बातमी समोर आली आहे. भारतीय रेल्वे खानपान आणि पर्यटन महामंडळ (IRCTC) कडून 'हॉस्पिटॅलिटी मॉनिटर'च्या एकूण 64 पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. विशेष बाब म्हणजे, कोणत्याही लेखी परीक्षेशिवाय या पदांवर उमेदवारांची नियुक्ती केली जाणार आहे. केवळ वॉक-इन-इंटरव्ह्यूच्या आधारे, उमेदवारांची या पदांसाठी निवड केली जाणार आहे. या भरतीमध्ये सहभागी होण्यासाठी उमेदवार irctc.com या अधिकृत वेबसाइटवर अर्ज करू शकतात.
शैक्षणिक पात्रता
हॉस्पिटॅलिटी किंवा हॉटेल मॅनेजमेंट संबंधित कोर्स पूर्ण केलेले उमेदवार या भरतीसाठी अर्ज करण्यासाठी पात्र ठरतात. जसे की, बी.एससी इन हॉस्पिटॅलिटी अॅण्ड हॉटेल अॅडमिनिस्ट्रेशन, बी.एससी इन हॉटेल मॅनेजमेंट अॅण्ड केटरिंग सायन्स, एमबीए इन टुरिझम अँड हॉटेल मॅनेजमेंट किंवा बीबीए तसेच एमबीए इन कलिनरी आर्ट्स अशा क्षेत्रात शिक्षण घेतलेले उमेदवार या भरतीमध्ये सहभागी होऊ शकतात. यासोबतच, या क्षेत्रात किमान दोन वर्षांचा अनुभव असणं गरजेचं आहे.
वयोमर्यादा
या भरतीमध्ये सहभागी होण्यासाठी जनरल (Open) प्रवर्गातील उमेदवारांसाठी 28 वर्षे कमाल वयोमर्यादा निश्चित करण्यात आली आहे. तसेच, ओबीसी प्रवर्गातील उमेदवारांसाठी 31 वर्षे, एससी आणि एसटी प्रवर्गातील उमेदवारांसाठी 33 वर्षे आणि अपंग उमेदवारांसाठी 38 वर्षे कमाल वयोमर्यादा निश्चित करण्यात आली आहे. 1 ऑक्टोबर 2025 या तारखेच्या आधारे उमेदवारांच्या वयाची गणना केली जाईल.
भरतीसाठी अर्ज केल्यानंतर उमेदवारांना वॉक-इन-इंटरव्ह्यूमध्ये सहभागी व्हावं लागेल. मुलाखतीदरम्यान, उमेदवारांच्या डॉक्यूमेंट्ची तपासणी केली जाईल आणि शेवटी मेडिकल टेस्ट घेण्यात येईल. या टप्प्यांनंतर, उमेदवारांची नियुक्ती केली जाईल. या भरतीमध्ये कोणत्याच प्रकारची लेखी परीक्षा आयोजित केली जाणार नाही.










