संभाजी ब्रिगेडच्या नकुल भोईर हत्या प्रकरणात सर्वात मोठा ट्वीस्ट, पत्नीने 21 वर्षीय प्रियकराच्या मदतीने काढला पतीचा काटा
Pune Crime : पुण्यातील संभाजी ब्रिगेडच्या नकुल भोईर हत्या प्रकरणात मोठा ट्वीस्ट, पत्नीने प्रियकराच्या मदतीने काढला पतीचा काटा
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
संभाजी ब्रिगेडच्या नकुल भोईर हत्या प्रकरणात सर्वात मोठा ट्वीस्ट
पत्नीने प्रियकराच्या मदतीने काढला पतीचा काटा
Pune Crime : चिंचवड परिसरात घडलेल्या एका धक्कादायक घटनेत सामाजिक कार्यकर्ते नकुल आनंदा भोईर (वय 40, रा. माणिक कॉलनी, चिंचवड) यांच्या खुनामागे त्यांच्या पत्नी चैताली भोईर आणि तिचा प्रियकर सिद्धार्थ दीपक पवार (वय 21, रा. बालाजी अपार्टमेंट, लिंकरोड, चिंचवड) यांचा सहभाग असल्याचे तपासात समोर आले आहे. पोलिसांनी सिद्धार्थला अटक करून बुधवारी न्यायालयात हजर केले असता, चैताली आणि सिद्धार्थ या दोघांनाही 1 नोव्हेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली.
पत्नीने 21 वर्षीय प्रियकराच्या मदतीने काढला प्रियकराचा काटा
संभाजी ब्रिगेडचे कार्यकर्ते असलेल्या नकुल भोईर यांचा 24 ऑक्टोबरच्या पहाटे साडेदोनच्या सुमारास खून करण्यात आला. ही घटना चिंचवडमधील माणिक कॉलनी परिसरातील महापालिकेच्या आरोग्य केंद्राजवळ घडली. घटनेनंतर पत्नी चैतालीने स्वतः पोलिसांना फोन करून पतीच्या खुनाची माहिती दिली. प्रारंभी तिने पती चारित्र्यावर संशय घेतो म्हणून त्याचा गळा आवळून खून केल्याचे सांगितले होते. मात्र पोलिसांना यामध्ये आणखी कोणीतरी सहभागी असल्याची शंका येत होती.
यानंतर तपास अधिक खोलवर नेल्यावर उघड झाले की, चैताली आणि सिद्धार्थ यांच्यात प्रेमसंबंध होते, आणि याच कारणावरून नकुल आणि चैताली यांच्यात वारंवार वाद होत होते. नकुल त्यांच्या नात्याच्या आड येत असल्याने या दोघांनी त्याचा काटा काढण्याचे ठरविले. त्याचवेळी चैतालीने काही लोकांकडून कर्ज घेतल्याचे समजल्यावर पती-पत्नीमध्ये पुन्हा भांडण झाले. भांडणाच्या दरम्यान नकुलने चैतालीला मारहाण केली, आणि त्या संतापातून सिद्धार्थने नकुलचा ओढणीने गळा आवळून खून केला.










