ओढणीला घामाचा वास, प्रियकराच्या मदतीने पत्नीने रचला कट, पुण्यातील नकुल भोईरच्या हत्येचा उलगडा कसा झाला?
Pune Crime : ओढणीला घामाचा वास, प्रियकराच्या मदतीने पत्नीने रचला कट, पुण्यातील नकुल भोईरच्या हत्येचा उलगडा कसा झाला?
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
ओढणीला घामाचा वास, प्रियकराच्या मदतीने पत्नीने रचला कट
पुण्यातील नकुल भोईरच्या हत्येचा उलगडा कसा झाला?
Pune Crime : चिंचवड परिसरात घडलेल्या सामाजिक कार्यकर्त्याच्या खुनाच्या प्रकरणात नवे धक्कादायक तपशील समोर आले आहेत. सामाजिक कार्यकर्ते नकुल आनंदा भोईर यांच्या हत्येमागे त्यांच्या पत्नी चैताली आणि तिचा प्रियकर सिद्धार्थ दीपक पवार (वय 21, रा. बालाजी अपार्टमेंट, लिंकरोड, चिंचवड) यांचा हात असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. पोलिसांनी सिद्धार्थला अटक करून बुधवारी न्यायालयात हजर केले. न्यायालयाने चैताली आणि सिद्धार्थ दोघांनाही 1 नोव्हेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.
पत्नीनेच दिली होती पतीच्या हत्येची माहिती
अधिकची माहिती अशी की, 24 ऑक्टोबरच्या पहाटे सव्वा तीनच्या सुमारास नकुल भोईर (वय 40, रा. माणिक कॉलनी, चिंचवड) यांची हत्या करण्यात आली होती. विशेष म्हणजे, ही घटना चैतालीने स्वतः पोलिसांना फोन करून कळवली होती. चिंचवडमधील महापालिकेच्या आरोग्य केंद्राजवळ हा खून झाला. प्रारंभी पोलिसांनी चैतालीला ताब्यात घेतले, मात्र तपासात या गुन्ह्यामागे आणखी एक व्यक्ती असल्याची शंका निर्माण झाली. पोलिसांनी तिच्या प्रियकर सिद्धार्थला चौकशीसाठी बोलावले असता दोघांनी सुरुवातीला गोंधळ निर्माण करणारी, उडवाउडवीची उत्तरे दिली.
तपासात उघड झाले की, चैताली आणि सिद्धार्थ यांच्या प्रेमसंबंधांमुळे पती-पत्नीमध्ये वारंवार वाद व्हायचे. नकुल भोईर यांना या संबंधांची माहिती मिळाल्याने घरगुती कलह वाढले होते. नकुलने चैतालीला या संबंधांबद्दल सुनावल्याने आणि तीने घेतलेल्या कर्जाबद्दल नाराजी व्यक्त केल्याने त्यांच्यात तीव्र भांडण झाले. त्यावेळी नकुलने तिला मारहाण केली. या घटनेनंतर संतापलेल्या सिद्धार्थने चैतालीसोबत संगनमत करून नकुलचा खून करण्याचे ठरवले.










