अनैतिक संबंधाच्या आड येत होती 7 वर्षांची मुलगी; प्रियकराने मुलीसोबत केलं निर्घृण कृत्य अन् विवाहित प्रेयसीला...
एका 26 वर्षीय तरुणाने त्याच्या विवाहित प्रेयसीच्या 7 वर्षांच्या मुलीची निर्घृणपणे हत्या केल्याचं वृत्त समोर आलं आहे. मृत मुलगी आपल्या आईच्या खाजगी जीवनात अडथळा ठरत असल्याने आरोपीने तिची हत्या केल्याचं सांगितलं जात आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
अनैतिक संबंधाच्या आड येत होती 7 वर्षांची मुलगी
प्रियकराने मुलीसोबत केलं निर्घृण कृत्य
नेमकं प्रकरण काय?
Crime News: महिलेच्या विवाहबाह्य संबंधातून एक धक्कादायक घटना घडल्याची बातमी समोर आली आहे. एका 26 वर्षीय तरुणाने त्याच्या विवाहित प्रेयसीच्या 7 वर्षांच्या मुलीची निर्घृणपणे हत्या केल्याचं वृत्त समोर आलं आहे. संबंधित घटना ही बंगळुरूच्या कुम्बलगुडु परिसरात घडल्याची माहिती आहे. मृत मुलगी आपल्या आईच्या खाजगी जीवनात अडथळा ठरत असल्याने आरोपीने तिची हत्या केल्याचं सांगितलं जात आहे.
पतीपासून वेगळी राहायची...
पोलिसांच्या माहितीनुसार, आरोपी तरुणाचं नाव दर्शन कुमार यादव असून तो पूर्वी एका पेन्ट कंपनीमध्ये मार्केंटिंग एक्झीक्यूटिव्ह म्हणून कार्यरत होता. दरम्यान, शिल्पा एस. के नावाच्या महिलेसोबत दर्शनची मैत्री झाली. संबंधित महिला ही एका खाजगी कंनीमध्ये बिझनेस डेव्हलपमेंट ऑफिसर म्हणून काम करते. शिल्पा बऱ्याच वर्षांपासून आपल्या पतीपासून वेगळी राहत होती आणि ती तिच्या 7 वर्षांच्या मुलीसोबत रामसंद्रा गावात राहत होती. मुलीचं नाव सिरी असून ती दुसऱ्या इयत्तेत शिकत होती. शिल्पा तिच्या मुलीसोबत आपल्या माहेरी आईसोबत राहत होती, पण ऑगस्ट महिन्यात शिल्पाच्या आईचं निधन झालं आणि तेव्हापासून दर्शनचं शिल्पाच्या घरी सतत येणं-जाणं असायचं.
प्रियकराचा विवाहित प्रेयसीवर दबाव
शिल्पाच्या आईच्या मृत्यूनंतर दर्शनने त्याच्या प्रेयसीवर सिरीला हॉस्टेलमध्ये पाठवण्यासाठी सतत दबाव आणण्यास सुरूवात केली. घरात मुलीच्या उपस्थितीमुळे त्या दोघांच्या प्रायव्हेट टाइममध्ये अडथळा येत असल्याचं शिल्पाचं म्हणणं होतं. परंतु, शिल्पाने तिच्या प्रियकराला तिच्या मुलीला दूर ठेवण्यासाठी नकार दिला आणि त्यामुळे दर्शन प्रचंड संतापला. रागाच्या भरात त्याचे शिल्पासोबत सतत वाद व्हायचे. इतकेच नव्हे तर, तो शिल्पाला मारहाण सुद्धा करायचा. त्याने आई आणि मुलीला मारून टाकण्याची सुद्धा धमकी दिली.
हे ही वाचा: सातारा डॉक्टर आत्महत्या प्रकरणात अंधारेंनी वेलांटीची चूक काढली, आता अश्विनी बिद्रेंचे पतीही समोर, सातारा SP वर गंभीर आरोप
मुलीचं डोकं आपटून निर्घृण हत्या
23 ऑक्टोबरच्या रात्री दर्शन रात्री शिल्पाच्या घरीच थांबला होता. दुसऱ्या दिवशी, शिल्पा नेहमीप्रमाणे कामासाठी गेल्यानंतर दर्शन सिरीला आपल्या घरी घेऊन गेला. त्या दिवशी, त्याने दुपारी शिल्पाला फोन करून ताबडतोब घरी येण्यास सांगितलं. त्यावेळी, फोनवर शिल्पाने आपल्या मुलीच्या रडण्याचा आवाज ऐकला आणि म्हणून ती लगेच घरी येण्यासाठी निघाली. पीडित महिला घरी पोहोचल्यानंतर दर्शनने तिच्यावर हल्ला केला आणि तिला खोलीत बंद केलं. नंतर, कसं बसं तिने स्वत:ला सोडवलं आणि तिथून बाहेर पडली. परंतु, त्यावेळी तिने अतिशय धक्कादायक दृश्य पाहिलं. सिरी जमिनीवर रक्ताच्या थारोळ्यात पडली होती. दर्शनने मुलीचं डोकं फरशीवर आपटलं आणि तिची गळा दाबून निर्घृण हत्या केली.










