भाजपच्या बुथ प्रमुखाची गोळ्या झाडून हत्या, आरोपीच्या वडिलांची गळफास घेऊन आत्महत्या, आईने विष घेतलं

मुंबई तक

Crime News : भाजपच्या बुथ प्रमुखाची गोळ्या झाडून हत्या, आरोपीच्या वडिलांची गळफास घेऊन आत्महत्या, आईने विष घेतलं; संपूर्ण प्रकरण जाणून घ्या..

ADVERTISEMENT

 Crime News
Crime News
social share
google news

बातम्या हायलाइट

point

भाजप बुथ प्रमुखाची गोळ्या झाडून हत्या

point

आरोपीच्या वडिलांची गळफास घेऊन आत्महत्या, आईने विष घेतलं

Crime News : मध्य प्रदेशातील भाजपचे बुथ प्रमुख आणि बजरंग दलाचे नेते निलेश उर्फ निलू रजक यांची दिवसा ढवळ्या गोळ्या झाडून हत्या करण्यात आलीये. कटनी जिल्ह्यातील कैमोर पोलीस ठाणे हद्दीत मंगळवारी ही घटना घडली. या घटनेनंतर कैमोर परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. घटनेचा निषेध करत हिंदू संघटनांनी शहरातील बाजारपेठ बंद पाडली होती. तसेच आरोग्य केंद्रासमोर आंदोलन करत पोलिसांविरोधात घोषणा दिल्या. पोलीस निरीक्षकाला तात्काळ हटवावे आणि दोषींवर कारवाई करून त्यांना फाशी द्यावी, अशी मागणी आंदोलकांनी केलीये. प्रकरणाचं गांभीर्य लक्षात घेऊन घटनास्थळी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.

दोन आरोपी फरार, आरोपीच्या वडिलांची आत्महत्या

दरम्यान, या प्रकरणी पोलिस तपासात समोर आले की, मृत निलेश रजक आणि मुख्य आरोपी प्रिन्स जोसेफ तसेच त्याचा साथीदार अकरम खान यांच्यात काही दिवसांपूर्वी वाद झाला होता. त्याच वादातून ही हत्या करण्यात आली. दोघेही कैमोरमधील अमरैयापार भागातील रहिवासी आहेत. पोलिसांनी त्यांच्या घरी छापे टाकले, पण ते फरार झाल्याची माहिती समोर आली. त्यानंतर प्रिन्स जोसेफच्या वडिलांनी गळफास घेऊन आत्महत्या केली, तर आईने विषप्राशन केले. आईची प्रकृती गंभीर असून तिच्यावर कटनी जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

हेही वाचा : आरोप करणं सोपं, चौकशीनंतर सत्य काय? उघडकीस येईल, रणजितसिंह निंबाळकरांबाबत उदयनराजेंनी मांडली भूमिका

बँक ऑफ बडोदासमोर गोळीबार

कैमोर बाजारात भाजपचे बूथ अध्यक्ष निलेश उर्फ नीलू रजक यांच्यावर मंगळवारी सकाळी सुमारे 11 वाजता दोन युवकांनी गोळ्या झाडल्या. प्रत्यक्षदर्शींनुसार, निलेश बँक ऑफ बडोदासमोरून आपल्या दुचाकीवर जात होते. त्याचवेळी दुचाकीवर आलेल्या दोन अज्ञात युवकांनी त्यांच्यावर अनेक गोळ्या झाडल्या आणि पळ काढला. गंभीर जखमी अवस्थेत निलेश यांना तातडीने विजयराघवगड आरोग्य केंद्रात नेण्यात आले, मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. हल्लेखोरांनी चेहऱ्यावर मास्क घातला होता. गोळीबारानंतर ते दुचाकीवरून पसार झाले. पोलिसांना घटनास्थळावरून रक्ताने माखलेले कपडे मिळाले आहेत. या घटनेनंतर परिसरात प्रचंड संताप पसरला असून नागरिक रस्त्यावर उतरले आहेत आणि आरोपींना त्वरित अटक करण्याची मागणी करत आहेत.

हे वाचलं का?

    follow whatsapp