पीडित डॉक्टरला न्याय मिळवून देण्यासाठी बीडमधील आंदोलकांचा पेट्रोल ओतून घेण्याचा इशारा, सुषमा अंधारेंनी थांबवलं अन्...

मुंबई तक

Sushma Andhare on satara female doctor and beed protest : पीडित डॉक्टरला न्याय मिळवून देण्यासाठी आंदोलकांचा पेट्रोल ओतून घेण्याचा इशारा, सुषमा अंधारेंनी थांबवलं अन्...

ADVERTISEMENT

Sushma Andhare on satara female doctor and beed protest
Sushma Andhare on satara female doctor and beed protest
social share
google news

बातम्या हायलाइट

point

पीडित डॉक्टरला न्याय मिळवून देण्यासाठी पेट्रोल ओतून घेण्याचा इशारा

point

सुषमा अंधारेंनी थांबवलं; बीडमध्ये काय घडलं?

Sushma Andhare on satara female doctor case and beed protest : काही दिवसांपूर्वी साताऱ्यातील फलटणमधील उपजिल्हा रुग्णालयातील डॉक्टर महिलेने हातावरती सुसाईड नोट लिहित आत्महत्या केली होती. दरम्यान, या प्रकरणात दररोज मोठे खुलासे झालेले पाहायला मिळत आहेत. या प्रकरणी विरोधकांनी भाजपचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी सनसनाटी आरोप केले आहेत. शिवाय, ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी ही हत्या आहे की आत्महत्या याबाबत शंका उपस्थित केल्या आहेत. आत्तापर्यंत या प्रकरणात दोन पोलीस अधिकाऱ्यांना अटक झाली असून त्यांची चौकशी सुरु आहे. 

हेही वाचा : गंजलेल्या नंबर प्लेटची स्कुटी घेऊन फिरणाऱ्या ट्रॅफिक पोलिसाला 2 हजारांचा दंड, व्हायरल व्हिडीओतील 'त्या' तरुणाला यश

कवडगाव येथील ग्रामस्थांचं शोले स्टाईल आंदोलन 

दरम्यान, या प्रकरणात एसआयटीची स्थापना करण्यात यावी, अशी मागणी नातेवाईकांनी केली आहे. मात्र सरकार जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहे ,असा आरोप करत कवडगाव ग्रामस्थांनी येथील शोले स्टाईल आंदोलन सुरु केले आहे. एसआयटीची स्थापन करण्यात यावी त्याशिवाय आम्ही आंदोलन मागे घेणार नसल्याची भूमिका आंदोलकांनी घेतली आहे. दरम्यान, यावेळी शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे आंदोलन स्थळी पोहोचल्यानंतर आंदोलनकांनी पेट्रोल ओतून घेण्याचा इशारा दिला होता. मात्र, सुषमा अंधारे यांनी आंदोलकांशी संवाद साधत त्यांना रोखलं आहे.

...तर आपण फलटणला जायचं आहे, सुषमा अंधारेंचा सरकारला इशारा 

सुषमा अंधारे यावेळी आंदोलकांना आवाहन करताना म्हणाल्या, सरकारकडून सहजासहजी न्याय मिळणार नाही. पेट्रोल ओतून घेऊ नका.. वेडेपणा करु नका. आपण लढणारी माणसं आहे, रडणारी माणसं नाहीत. आपल्याला लढायचं आहे. आपण काय स्वस्थ बसलेले नाहीत. आपल्याला कायद्याच्या प्रत्येक गोष्टीचा अभ्यास आपण लढणार आहोत. आपण कुठेही माघार घेणार नाहीत. आपण त्यांच्या धमक्यांना भीक देखील घालणार नाहीत. दोन तारखेपर्यंत त्यांनी संबंधित लोकं चौकशीच्या कक्षेत आणली नाहीत, तर आपण फलटणला जायचं आहे. आता तुमची मोठी बहीण सांगत आहे, तुम्ही खाली या...

हे वाचलं का?

    follow whatsapp