वडिलांचं निधन, आईने मजुरी करुन शिकवलं, कोचिंग शिवाय लेक वयाच्या 21 व्या वर्षी आयएएस अधिकारी
IAS success story : वडिलांचं निधन, आईने मजुरी करुन शिकवलं, कोचिंग शिवाय लेक वयाच्या 21 व्या वर्षी आयएएस अधिकारी
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
 
 वडिलांचं निधन, आईने मजुरी करुन शिकवलं,
 
 कोचिंग शिवाय लेक वयाच्या 21 व्या वर्षी आयएएस अधिकारी
IAS success story : देशातील सर्वात कठीण आणि प्रतिष्ठित परीक्षांपैकी एक असलेली यूपीएससी (UPSC) परीक्षा उत्तीर्ण होणे हे दरवर्षी लाखो विद्यार्थ्यांचे स्वप्न असते. मात्र ही वाट अजिबात सोपी नाही. अनेक विद्यार्थी वर्षानुवर्षे मेहनत घेतात, अनेकदा अपयश पचवतात आणि शेवटी यशाच्या शिखरावर पोहोचतात. तर काही जण असेही असतात की आपल्या जिद्द, आत्मविश्वास आणि चिकाटीच्या जोरावर पहिल्याच प्रयत्नात इतिहास रचतात. अशीच प्रेरणादायी कहाणी आहे दिव्या तंवर हिची... घरची परिस्थिती बेताची असताना तिने देशातील सर्वात अवघड असलेली परीक्षा यशस्वीपणे दिली.
संघर्षमय बालपण आणि शिक्षण
हरियाण्यातील महेंद्रगड जिल्ह्यातील रहिवासी असलेल्या दिव्या तंवर यांचे आयुष्य संघर्षांनी भरलेले होते. त्यांनी प्राथमिक शिक्षण शासकीय शाळेतून पूर्ण केले आणि पुढील शिक्षण नवोदय विद्यालय, महेंद्रगड येथून घेतले. दिव्या लहानपणापासूनच बुद्धिमान आणि अभ्यासू होत्या. शिक्षणात त्यांची रुची एवढी प्रखर होती की विज्ञान शाखेत पदवी पूर्ण करताच त्यांनी यूपीएससी परीक्षेची तयारी सुरू केली.
हेही वाचा : दिल्ली हादरली! तरुणी विद्यापीठात जात होती, ओळखीच्याच तरुणाने थेट तिच्यावर अॅसिड फेकलं, नंतर तरुणीचा...
कोचिंगशिवाय मिळवले यश
दिव्याने 2021 साली पहिल्याच प्रयत्नात यूपीएससी परीक्षा उत्तीर्ण करत ऑल इंडिया रँक 438 मिळवली. तेव्हा तिचे वय केवळ 21 वर्षे होते. तिचे यश विशेष ठरले कारण तिने कोणत्याही कोचिंग संस्थेची मदत न घेता स्वतःच्या मेहनतीवर हे यश मिळवले. रंतु दिव्या इथेच थांबल्या नाहीत. त्यांनी पुढील वर्षी म्हणजे 2022 मध्ये पुन्हा परीक्षा दिली आणि यावेळी आणखी उज्ज्वल यश मिळवत ऑल इंडिया रँक 105 मिळवली. या रँकसह त्यांनी आपले स्वप्न पूर्ण केले आणि आयएएस अधिकारी होण्याचा मान प्राप्त केला.














