Mumbai Stray Dog : आईशपथ! मुंबईत भटक्या कुत्र्यांची संख्या 72 टक्क्यांनी वाढली
Brihanmumbai Municipal Corporation BMC : Stray dogs increased in Mumbai. BMC said that compared to the year 2014, it is about 72 percent more.
ADVERTISEMENT
Mumbai Stray Dog Statistics : मुंबईत जिथे जाऊ तिथे गर्दी असतेच. मुंबईत असं कुठलं ठिकाण नाही, जिथे तुम्हाला गर्दी दिसणार नाही. प्रत्येक महिन्याला लाखो लोक मुंबईत येतात. त्यामुळे मुंबईच्या संख्येत भर पडतेच. पण, आता मुंबईत असलेल्या भटक्या कुत्र्यांचा आकडा समोर आलाय. मुंबईतील भटक्या कुत्र्यांची एका दशकात 72 टक्क्यांनी वाढलीये. (the population of stray dogs in Mumbai has reached 1.64 lakh)
ADVERTISEMENT
बृहन्मुंबई महानगरपालिकेने (BMC) गुरुवारी (24 ऑगस्ट) सांगितले की, मुंबईत भटक्या कुत्र्यांची संख्या 1.64 लाखांवर पोहोचली आहे. 2014 च्या तुलनेत ही संख्या सुमारे 72 टक्क्यांनी जास्त आहे. याआधी मुंबईतही रस्त्यावर फिरणाऱ्या कुत्र्यांची डिजिटल ओळख करण्याचा उपक्रम सुरू करण्यात आला होता. याअंतर्गत कुत्र्यांचा डेटा तयार करावा लागणार आहे.
हेही वाचा >> Chandrayaan 3 Pragyan Rover on Moon : प्रज्ञानचा ‘मूनवॉक’! चंद्रावर उतरतानाचा पहिला व्हिडीओ
बीएमसीने जारी केलेल्या पत्रकात म्हटले आहे की, 2014 मध्ये झालेल्या गणनेनुसार शहरात त्यावेळी भटक्या कुत्र्यांची संख्या 95 हजार होती. बीएमसीने भटक्या कुत्र्यांची पुढील गणना जानेवारी 2024 मध्ये करण्याची तयारी केली आहे. यासोबतच फेब्रुवारी 2024 मध्ये मोठ्या प्रमाणात रेबिज लसीकरण मोहिमही प्रस्तावित आहे.
हे वाचलं का?
प्रसिद्ध केलेल्या निवेदनात बीएमसीने म्हटले आहे की, येत्या दहा दिवसांत सुमारे एक लाख भटक्या कुत्र्यांचे लसीकरण केले जाईल. काही स्वयंसेवी संस्थांच्या मदतीने बीएमसीने मंगळवारी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर 26 भटक्या कुत्र्यांचे लसीकरण केले.
भटक्या कुत्र्यांची डिजिटल ओळख करण्याचा उपक्रम
गेल्या महिन्यात बृहन्मुंबई महानगरपालिकेने भटक्या कुत्र्यांची डिजिटल ओळख करण्यासाठी पुढाकार घेतला आहे. यासाठी प्राण्यांचे क्यूआर टॅगिंग असेल. नागरी संस्थेने प्रथमच हे पाऊल उचलले आहे. क्यूआर कोड असलेले टॅग कुत्र्यांच्या गळ्यात लटकवले गेले होते, ज्याद्वारे त्यांचे संपूर्ण तपशील शोधले जातील. या माहितीत कुत्र्यांचे लसीकरण, त्यांची नसबंदी आणि त्यांची नावे डिजिटली ठेवण्याचा डेटाही असेल. यामुळे केंद्रीकृत डेटाबेसद्वारे बीएमसीला अचूक डेटा मिळेल.
ADVERTISEMENT
बीएमसीच्या महाव्यवस्थापकांनी काय सांगितले
BMC महाव्यवस्थापक डॉ. कलिमपाशा पठाण यांनी सांगितले होते की, आम्ही QR कोड सक्षम कुत्र्यांच्या टॅगद्वारे डेटा गोळा करण्याचा, त्याची उपयुक्तता आणि किंमत ठरवण्याचा प्रयत्न करत आहोत. हा पायलट प्रोजेक्ट आहे, तो पुढे कसा नेता येईल हे पाहावे लागेल.
ADVERTISEMENT
हेही वाचा >> Sharad Pawar : ‘अजित पवारांना पुन्हा संधी नाही’, पवारांनी भूमिका केली क्लिअर
कुत्रे जास्त वेळ गळ्यात कॉलर ठेवू देतात की नाही हे पाहण्याची गरज असल्याचेही त्यांनी सांगितले. त्याचे चांगले परिणाम आपल्याला माहित असणे आवश्यक आहे. माणूस विरुद्ध कुत्रा संघर्ष ही गंभीर समस्या बनली आहे. हा एक नवीन धोका बनत आहे. त्यामुळे ते कमी करण्यासाठी आणखी काय करता येईल हे पाहत आहोत.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT