भारतासमोर तोंडावर आपटलेल्या पाकिस्तानने आता कर्जासाठी हात पसरले, समोर आले स्पष्ट पुरावे
पाकिस्तानने यापूर्वी जागतिक बँक आणि IMF कडून प्रचंड कर्ज घेतलेलं आहे. तसेच चीन आणि अमेरिकेकडूनही पाकिस्तानला मोठी आर्थिक मदत मिळालेली आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट

भारताच्या हल्ल्यात पाकिस्तानचं कंबरडं मोडलं

पाकिस्तानची आर्थिक परिस्थितीही डबघाईला
Pakistan Loan : भारत पाकिस्तान सीमेवरचा तणाव कमालीचा वाढलाय. पाकिस्तानने केलेल्या हल्ल्याच्या प्रयत्नांना भारतानं जशास तसं उत्तर दिलं. मात्र, आता पाकिस्तानचं कंबरडं मोडल्याचं चित्र दिसतंय. कारण आता भारताशी युद्ध होण्यापूर्वीच कंगाल झालेल्या पाकिस्तानला कर्ज मागण्याची वेळ आलीय. कर्जाचं व्याज भरण्यासाठी आणखी कर्ज घेणारा पाकिस्तान भारताच्या हल्ल्यानंतर चांगलाच आर्थिक अडचणीत सापडलाय.
हे ही वाचा >> आधी रस्त्याने, नंतर विशेष रेल्वेने... पंजाब आणि दिल्लीच्या खेळाडूंना कोणत्या सुरक्षित ठिकाणी पाठवलं?
पाकिस्तानच्या अर्थखात्याने एक्स पोस्टवरून जागतिक बँकेला कर्ज मागितल्याची माहिती समोर आलीय. भारताच्या हल्ल्यात नुकसान झाल्याचं मान्य करताना कुणीतरी आम्हाला 'कर्ज देता का हो' अशा विनवण्या सुरू केल्या आहेत.
पाकिस्तानच्या अर्थखात्याने केलेल्या एक्स पोस्टमध्ये म्हटलंय की, 'शत्रूच्या हल्ल्यात आमचं मोठं नुकसान झालेलं आहे. सहकारी देशांनी आम्हाला आणखी कर्ज द्यावं, पेटलेल्या युद्धात आमचा साठा कमी झालाय, आमचा आर्थिक तणाव कमी करण्यासाठी आम्हाला मदत करण्यात यावी', असं म्हणत पाकिस्ताने जागतिक बँकेसमोर लोनसाठी हात पसरले आहेत.
हे ही वाचा >> देशभरात 26 विमानतळं बंद, दिल्लीतील 90 उड्डाणं रद्द... पुन्हा कधी सुरू होणार?
पाकिस्तानने यापूर्वी जागतिक बँक आणि IMF कडून प्रचंड कर्ज घेतलेलं आहे. तसेच चीन आणि अमेरिकेकडूनही पाकिस्तानला मोठी आर्थिक मदत मिळालेली आहे. त्यामुळे आता युद्धाआधीच भारतासमोर नांग्या टाकल्याने पाकिस्तानची चांगलीच गोची झाल्याचं दिसून येतंय.