देशभरात 26 विमानतळं बंद, दिल्लीतील 90 उड्डाणं रद्द... पुन्हा कधी सुरू होणार?

मुंबई तक

एअर इंडियाने प्रवाशांना विमानतळावर उड्डाणाच्या वेळेच्या किमान तीन तास आधी पोहोचण्याचे आवाहन केले आहे. नागरी उड्डयन सुरक्षा ब्युरो (BCAS) च्या वाढीव सुरक्षा उपाययोजनांमुळे चेक-इन प्रक्रिया उड्डाणाच्या 75 मिनिटांपूर्वी बंद होईल.

ADVERTISEMENT

Mumbai Tak
google news

बातम्या हायलाइट

point

भारत-पाक सिमेवर तणाव वाढला, युद्धजन्य परिस्थिती

point

देशातील 26 विमानतळं बंद, दिल्लीत विमानतळावरही मोठे बदल

नवी दिल्ली : भारत आणि पाकिस्तान यांच्यातील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर दोन्ही देशांमध्ये हवाई हल्ले आणि क्षेपणास्त्र हल्ल्यांची तीव्र देवाणघेवाण सुरू आहे. यामुळे देशभरातील 26 विमानतळांवर नागरी विमान वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात आली आहे. या परिस्थितीमुळे अनेक विमान कंपन्यांनी आपल्या प्रवाशांसाठी नवीन प्रवास सल्ला (ट्रॅव्हल अॅडव्हायझरी) जारी केला आहे. 10 मे पर्यंत हा निर्णय लागू असणार आहे. 

एअर इंडियाची सूचना: 75 मिनिटांपूर्वी चेक-इन बंद

एअर इंडियाने प्रवाशांना विमानतळावर उड्डाणाच्या वेळेच्या किमान तीन तास आधी पोहोचण्याचे आवाहन केले आहे. नागरी उड्डयन सुरक्षा ब्युरो (BCAS) च्या वाढीव सुरक्षा उपाययोजनांमुळे चेक-इन प्रक्रिया उड्डाणाच्या 75 मिनिटांपूर्वी बंद होईल. एअर इंडियाने आपल्या निवेदनात म्हटले आहे, "सुरक्षित आणि सुचारू चेक-इन आणि बोर्डिंगसाठी प्रवाशांनी वेळेचे पालन करावे." 

हे ही वाचा >> आकाश, MRSAM ते शिल्का... पाकिस्तानच्या प्रत्येक हल्ल्याला उत्तर, भारताची ढाल ठरलेत हे 5 एअर डिफेन्स शस्त्र

अकासा एअरची अॅडव्हायझरी

अकासा एअरने देखील प्रवाशांना तीन तास आधी विमानतळावर पोहोचण्याची विनंती केली आहे. याशिवाय, प्रवाशांनी सरकारमान्य फोटो ओळखपत्र सोबत ठेवावे आणि 7 किलोपेक्षा जास्त वजनाचा हँडबॅग बाळगू नये, असेही सांगण्यात आले आहे. सर्व प्रवाशांना बोर्डिंगपूर्वी दुय्यम सुरक्षा तपासणीला सामोरे जावे लागेल.

इंडिगो आणि स्पाईसजेटच्या उड्डाणांवर परिणाम

इंडिगोने 10 मे सकाळपर्यंत 165 हून अधिक देशांतर्गत उड्डाणे रद्द केली आहेत. स्पाईसजेटने धर्मशाला, लेह, जम्मू, श्रीनगर आणि अमृतसर यासह उत्तर भारतातील काही विमानतळांवरील उड्डाणे पुढील आदेशापर्यंत रद्द केली आहेत. प्रवाशांना उड्डाणाची सद्यस्थिती तपासण्याचा सल्ला देण्यात आला आहे.

हे वाचलं का?