आकाश, MRSAM ते शिल्का... पाकिस्तानच्या प्रत्येक हल्ल्याला उत्तर, भारताची ढाल ठरलेत हे 5 एअर डिफेन्स शस्त्र
पाकिस्तानने श्रीनगर, जम्मू, पठाणकोट, अमृतसर, चंदीगड आणि इतर 15 शहरांमधील भारतीय सैन्याच्या तळांवर ड्रोन आणि क्षेपणास्त्र हल्ले करण्याचा प्रयत्न केला. ते सगळेच हल्ले या यंत्रणांनी परतवून लावले.
ADVERTISEMENT

Indias Air Defence System : भारत आणि पाकिस्तानमध्ये सध्या युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली असून, 8 मे 2025 रोजी पाकिस्तानने भारतातील 15 शहरांमधील भारतीय सैन्याच्या छावण्यांवर ड्रोन आणि क्षेपणास्त्र हल्ले केले. मात्र, पाकिस्तानचा हा प्रयत्न भारतीय हवाई संरक्षण प्रणालींनी पूर्णपणे हाणून पाडला. भारतीय सैन्याच्या आकाश, MRSAM, झू-23, एल-70 आणि शिल्का यासारख्या प्रगत हवाई संरक्षण प्रणालींनी महत्त्वाची भूमिका बजावली.
या प्रणाली भारताच्या हवाई संरक्षण धोरणाचा अविभाज्य भाग आहेत. शत्रूच्या हवाई धोक्यांना नष्ट करण्यास सक्षम आहेत. 7-8 मे 2025 च्या रात्री, पाकिस्तानने श्रीनगर, जम्मू, पठाणकोट, अमृतसर, चंदीगड आणि इतर 15 शहरांमधील भारतीय सैन्याच्या तळांवर ड्रोन आणि क्षेपणास्त्र हल्ले करण्याचा प्रयत्न केला. ते सगळेच हल्ले या यंत्रणांनी परतवून लावले.
हे ही वाचा >> मोठी बातमी... भारतीय Navy ने केलं कराची बंदर उद्ध्वस्त, पाकिस्तानवर समुद्री हल्ला
22 एप्रिल 2025 रोजी पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून भारताने ऑपरेशन सिंदूर सुरू केल्यानंतर हा हल्ला झाला. यामध्ये 26 नागरिक ठार झाले. ऑपरेशन सिंदूर-1 मध्ये, भारताने पाकिस्तान आणि पीओकेमधील नऊ दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले.
भारताच्या काउंटर-यूएएस ग्रिड आणि हवाई संरक्षण प्रणाली, ज्यामध्ये आकाश, एमआरएसएएम, झू-23, एल-70 आणि शिल्का आहेत. या यंत्रणांनी पाकिस्तानी हल्ल्यांना निष्क्रिय केलं. संरक्षण मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, या प्रणालींनी पाकिस्तानी ड्रोन आणि क्षेपणास्त्रे हवेतच नष्ट केली. यामुळे भारताचं कोणतंही नुकसान झालं नाही.










