मोठी बातमी... भारतीय Navy ने केलं कराची बंदर उद्ध्वस्त, पाकिस्तानवर समुद्री हल्ला
भारतीय नौदलाने कराची बंदर उद्ध्वस्त केल्याची माहिती आता समोर आली आहे. थेट INS विक्रांतच्या मदतीने भारताने पाकिस्तानवर सागरी हल्ला करण्यास सुरूवात केली आहे.
ADVERTISEMENT

कराची: पाकिस्तानने गुरुवारी (8 मे) रात्री भारतावर ड्रोन आणि क्षेपणास्त्र हल्ले केल्यानंतर भारताने आता प्रत्युत्तर देण्यास सुरुवात केली आहे. नुकत्याच मिळालेल्या माहितीनुसार, भारतीय नौदलाने पाकिस्तानचे कराची बंदर उद्ध्वस्त केले आहे. नौदलाने केलेल्या हल्ल्यात नौदलाने कराची बंदरावर अनेक क्षेपणास्त्रे सोडली. ज्यामुळे हल्ल्यांमध्ये कराची बंदर पूर्णपणे उद्ध्वस्त झालं आहे.
पाकिस्तानचं कराची बंदर केलं उद्ध्वस्त
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तानसोबत वाढलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर, भारतीय नौदलाने आधीच अरबी समुद्रात आयएनएस विक्रांतला तैनात केलं होतं. पण आता पाकिस्तानच्या कुरापती वाढल्यानंतर विक्रांतने पाकिस्तानवर थेट हल्लाच केला.
हे ही वाचा>> Ind vs Pak: दोन JF-17 आणि एक F-16... भारताकडून पाकिस्तानच्या 3 लढाऊ विमानांचा टप्प्यात कार्यक्रम!
हे नौदलाचे हे सर्वात घातक जहाज कारवार किनाऱ्याजवळ तैनात करण्यात आलेले. त्यांच्या स्ट्राइक ग्रुपमध्ये विमानवाहू जहाजे, विध्वंसक, फ्रिगेट्स, पाणबुडीविरोधी युद्धनौका आणि इतर सहाय्यक जहाजे समाविष्ट आहेत. भारताच्या तिन्ही सैन्याने एकत्रितपणे प्रथम पाकिस्तानमधील दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त केले. ज्यानंतर पाकिस्तानकडून सातत्याने भारतावर हल्ले सुरू झाले आहे. ज्याला भारतीय लष्कर योग्य प्रत्युत्तर देत आहे.
भारताने पाकिस्तानचे 3 जेट फायटर पाडले
सरकारी सूत्रांनी सांगितले की, इस्लामाबादने जम्मू आणि पंजाबमध्ये अनेक ठिकाणी हल्ले केल्यानंतर भारताच्या हवाई संरक्षण यंत्रणेने एक पाकिस्तानी F-16 आणि दोन JF-17 विमानं नष्ट केली. सूत्रांनी सांगितले की, भारताने पाकिस्तानच्या पंजाब प्रांतात पाकिस्तानची एअरबोर्न वॉर्निंग अँड कंट्रोल सिस्टम (AWACS) देखील उद्ध्वस्त केली.
हे ही वाचा>> Ind vs Pak: भारताचा लाहोरवर सर्वात मोठा हल्ला सुरू, पाकच्या दिशेने भारताचे फायटर झेपावले!
दरम्यान, जम्मू-काश्मीरमधील उधमपूर आणि राजस्थानमधील जैसलमेर येथेही ड्रोन हल्ले उधळण्यात आले आणि अखनूरमध्ये एक ड्रोन पाडण्यात आला. पूंछमध्येही दोन ड्रोनही पाडण्यात आले.