जम्मू काश्मीरवर हल्ला करणाऱ्या जैश-ए-मोहम्मदच्या 7 दहशतवाद्यांचा खात्मा!
Operation sindoor : जम्मू आणि काश्मीरमधील सांबा जिल्ह्यातील आंतरराष्ट्रीय सीमेवर पाकड्यांनी शुक्रवारी पहाटे हल्ला केला. भारतानं याला चांगलंच प्रत्युत्तर दिलंय. हल्ले करणारे जैश-ए-मोहम्मदशी संबंधित असल्याचं सांगण्यात येतंय.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट

जम्मू आणि काश्मीरमधील सांबा जिल्ह्यातील आंतरराष्ट्रीय सीमेवर पाकड्यांनी शुक्रवारी पहाटे हल्ला केला.

भारतानं त्याला चांगलं प्रत्युत्तर दिलंय.

हल्ले करणारे जैश-ए-मोहम्मदशी संबंधित असल्याचं सांगण्यात येतंय.

याच दहशतवादी संघटनातील सात दहशतवाद्यांना ठार मारण्यात आल्याचं सांगण्यात येतंय.
Operation sindoor : जम्मू आणि काश्मीरमधील सांबा जिल्ह्यातील आंतरराष्ट्रीय सीमेवर पाकिस्ताननं शुक्रवारी पहाटे हल्ला केला. भारतानं त्याला चांगलं प्रत्युत्तर दिलंय. अशातच भारताच्या सीमा सुरक्षा दलानं पाकिस्तानानं केलेल्या घुसखोरीचा प्रयत्न उधळून लावलाय. हल्ले करणारे जैश-ए-मोहम्मदशी संबंधित असल्याचं सांगण्यात येतंय. याच दहशतवादी संघटनातील सात दहशतवाद्यांना ठार मारण्यात आल्याचं सांगण्यात येतंय, अशी माहिती सूत्रांनी इंडिया टुडेला दिलीय.
भारतीय जवानांकडून चोख प्रत्युत्तर
8 मे पासून रात्री 11 वाजताच्या सुमारास बीएसएफ जवानांना सांबानजीक असणाऱ्या सीमेजवळ हालचाली सुरूच आहेत. त्यानंतर भारतीयांनी चोख प्रत्युत्तर देत कारवाई करण्यास सुरूवात केलीय. यावर आता बीएसएफनं अधिकृतरित्या माहिती दिलीय.
बीएसएफ म्हणालं...
8 मे 2025 रोजी 11 वाजताच्या सुमारास बीएसएफनं जम्मू काश्मीरमधील सांबा जिल्ह्यातील आंतरराष्ट्रीय सीमेवर घुसखोरीचा एका मोठा प्रयत्न उधळून लावलाय, असं बीएसएफनं एक्सवर पोस्ट शेअर करत पुष्टी करण्यात आलीय.
भारत आणि पाकिस्तानातील लष्करादरम्यान तणावजन्य परिस्थिती आहे. गुरूवारी, भारतानं जम्मू, पठाणकोट, उधमपूरमधील अनेक लष्करी ठिकाणांना क्षेपणास्त्र आणि ड्रोन वापरून लक्ष्य केलंय. त्यानंतर पाकिस्तानंनं केलेला हल्ला भारताला हाणून पाडण्यात यश आलंय.
8 मे रोजी भारतानं पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरातील काही दहशतवादी अड्डे उडवलेत. दरम्यान भारतानं एकूण 100 हून अधिक दहशतवादी ठार केलेत. हा हल्ला पहलगामचं प्रत्युत्तर असल्याचं भारतानं सांगितलंय.