ग्राहकांची मज्जाच मज्जा! भारत-पाक तणावामुळे सोन्याचे दर गडगडले, 'इतक्या' रुपयांनी सोनं झालं स्वस्त?
Today Gold Rate In Maharashtra : भारत-पाकिस्तानमध्ये युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाल्याने शेअर मार्केटवर याचा थेट परिणाम झाला आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट

सोन्या-चांदीच्या दरात किती रुपयांनी झाली घट?

22 आणि 24 कॅरेट सोन्याचे आजचे दर काय?

मुंबईत आज 1 तोळा सोन्याचा भाव काय?
Today Gold Rate In Maharashtra : भारत-पाकिस्तानमध्ये युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाल्याने शेअर मार्केटवर याचा थेट परिणाम झाला आहे. शेअर बाजारात चढ-उतार होत असल्याचं पाहायला मिळत आहे. सोन्या-चांदीच्या दरावरही भारत-पाक युद्धाचा भडका उडाला आहे. आज शुक्रवारी 9 मे रोजी सोनं स्वस्त झालं आहे. सोन्याच्या भावात प्रति 10 ग्रॅममागे जवळपास 1200 रुपयांची घट झाली आहे.
मागील काही दिवसांमध्ये 600 रुपयांची वाढ झाल्याचंही समोर आलं होतं. देशातील सर्व शहरांमध्ये 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमची किंमत 98 हजार रुपयांच्या पुढे गेली आहे. तर 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमची किंमत 90 हजार रुपयांच्या पुढे गेली आहे. दरम्यान, देशात एक किलोग्रॅम चांदीची किंमत 1,10,000 रुपयांवर पोहोचली आहे. अशातच महाराष्ट्रातील प्रमुख शहरांमध्ये आजचे सोन्याचे दर काय आहेत, जाणून घ्या सविस्तर माहिती.
महाराष्ट्रातील प्रमुख शहरांमध्ये आजचे सोन्याचे दर काय?
मुंबई
मुंबईत 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमची किंमत 98350 रुपयांवर पोहोचली आहे. तर 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमची किंमत 90150 रुपये झाली आहे.
पुणे
पुण्यातही 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमची किंमत 98350 रुपयांवर पोहोचली आहे. तर 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमची किंमत 90150 रुपये झाली आहे.