कर्ज फेडायचं नव्हतं, मग थेट IIFL मॅनेजरचाच मर्डर केला, तरुणीला अटक
Gujrat Crime News : गुजरातमधील प्रांतिज तालुक्यात IIFL फायनान्सच्या मॅनेजरच्या हत्येचा उलगडा काही तासांत झाला. 6 लाख रुपयांचे कर्ज फेडण्यापासून वाचण्यासाठी आणि गहाण ठेवलेले सोने परत मिळवण्यासाठी प्रेमी-प्रेमिकेने हत्या केल्याचे पोलिस तपासात समोर आले.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
कर्ज फेडायचं नव्हतं, मग थेट IIFL मॅनेजरचाच मर्डर केला
तरुणीला अटक ..नेमकं काय घडलं?
Gujrat Crime News : गुजरातमधील प्रांतिज तालुक्यात IIFL फायनान्सच्या मॅनेजरच्या हत्येचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. दोन दिवसांपूर्वी लिमला गावाजवळ एका कारमध्ये माणसा शाखेचे ब्रँच मॅनेजर भरत चौधरी यांचा मृतदेह आढळला होता. पोलिसांनी तपास सुरू केल्यानंतर अवघ्या काही तासांत या हत्येचा उलगडा करण्यात आला. पोलिसांच्या माहितीनुसार, भरत चौधरी 2 सप्टेंबर रोजी अचानक बेपत्ता झाले होते. त्यानंतर लिमला गावातून वडवासा येथे जाणाऱ्या रस्त्यावर त्यांची कार आढळून आली. या कारमध्ये भरत चौधरी यांचा मृतदेह होता. त्यांच्या गळ्यावर धारदार शस्त्राने गंभीर वार केल्याच्या खुणा आढळल्या होत्या.
हेही वाचा : फ्लाईंग किस, अश्लील हावभाव, दहीहंडीचा उत्सव या थराला का गेला? अविनाश जाधव EXCLUSIVE
मॅनेजरच्या हत्येमागील संपूर्ण कट समोर आला
प्रांतिज पोलिसांनी तांत्रिक तपास आणि कॉल डिटेल्सच्या आधारे तपास पुढे नेला. या तपासादरम्यान भावना उर्फ भावू ठाकोर आणि तिचा प्रियकर योगेश ठाकोर यांची नावे समोर आली. पोलिसांनी भावनाला ताब्यात घेऊन चौकशी केली असता मॅनेजरच्या हत्येमागील संपूर्ण कट समोर आला. पोलिस तपासात भावना हिने IIFL फायनान्सकडून 1.50 लाख रुपयांचे कर्ज घेतल्याचे समोर आले. तर तिच्या प्रियकराने याच कंपनीकडून 4.50 लाख रुपये कर्ज घेतले होते. अशा प्रकारे दोघांवर एकूण 6 लाख रुपयांचे कर्ज होते. कर्जाच्या हप्त्यांची परतफेड करावी लागू नये आणि गिरवी ठेवलेले सोन्याचे दागिनेही परत मिळावेत, या उद्देशाने दोघांनी भरत चौधरी यांना संपवण्याचा कट रचला.
हेही वाचा : Astrology : सप्टेंबरच्या 'या' तारखेपासून काही राशींचे नशीब फळफळणार
