मुंबईची खबर : बीएमसीचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प, वर्सोवा ते भाईंदर प्रवास होणार सुसाट

मुंबई तक

बीएमसीने 'मुंबई किनारा रस्ता (उत्तर)' हा महत्त्वाकांक्षी पायाभूत सुविधा प्रकल्प हाती घेतला आहे. हा संपूर्ण मेगा प्रकल्प सुमारे 60 किलोमीटर लांबीचा असून, याच्या माध्यमातून वेसावे आणि भाईंदर ही दोन प्रमुख शहरे थेट किनारा रस्त्याने जोडली जाणार आहेत.

ADVERTISEMENT

Mumbai News
Mumbai News
Google CTA

बातम्या हायलाइट

point

मुंबईची खबर : बीएमसीचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प

point

वर्सोवा ते भाईंदर प्रवास होणार सुसाट

Mumbai News : बृहन्मुंबई महानगरपालिकेने 'मुंबई किनारा रस्ता (उत्तर)' हा महत्त्वाकांक्षी पायाभूत सुविधा प्रकल्प हाती घेतला आहे. या प्रकल्पामुळे मुंबई महानगरातील वाहतूक कोंडी कमी होऊन नागरिकांना अखंड प्रवासाचा अनुभव मिळणार आहे.  हा संपूर्ण मेगा प्रकल्प सुमारे 60 किलोमीटर लांबीचा असून, याच्या माध्यमातून वेसावे आणि भाईंदर ही दोन प्रमुख शहरे थेट किनारा रस्त्याने जोडली जाणार आहेत. मुंबईच्या आणि उपनगरांच्या भविष्यातील रस्तेवाहतुकीसाठी हा किनारा रस्ता अत्यंत महत्त्वपूर्ण ठरणार आहे. या प्रकल्पामुळे वेसावे ते भाईंदर दरम्यानचा प्रवासाचा कालावधी पूर्वीच्या 90 ते 120 मिनिटांवरून घसरून केवळ 15 ते 20 मिनिटांवर येणार आहे.

प्रत्यक्ष अंमलबजावणीच्या टप्प्यात

या प्रकल्पाचाच एक अत्यंत महत्त्वाचा भाग असलेला 'दहिसर-भाईंदर जोड रस्ता' सध्या प्रत्यक्ष अंमलबजावणीच्या टप्प्यात आला आहे. हा प्रकल्प दहिसर पश्चिम आणि भाईंदर पश्चिम या दोन परिसरांमध्ये थेट आणि जलद रस्ते संपर्क निर्माण करेल. या विशिष्ट रस्ते प्रकल्पाची एकूण लांबी सुमारे 5.135 किलोमीटर इतकी आहे. यातील सुमारे 3.83 किलोमीटर लांबीचा आणि 45 मीटर रुंदीचा मुख्य उन्नत रस्ता हा मुंबई किनारा रस्त्याच्या (उत्तर) अंतिम टप्प्याचा भाग असणार आहे, ज्यामुळे मिरा-भाईंदरकरांचा मुंबईतील प्रवास अधिक सुखकर आणि वेळेची बचत करणारा ठरणार आहे.

हे ही वाचा : मुंबई फायनल! मनोज जरांगेंची मोठी घोषणा, आझाद मैदानावर कधी येणार?

प्रकल्प नेमका काय आहे?

या जोड रस्त्याच्या उभारणीत विविध प्रकारच्या अद्ययावत आणि गुंतागुंतीच्या अभियांत्रिकी संरचनांचा वापर करण्यात येत आहे. यामध्ये प्रामुख्याने उन्नत मार्ग (Elevated Road), खारफुटीच्या क्षेत्रातील खांबांवरील रस्ता (Roads on Stilts), खाडीवरील उन्नत संरचना, तसेच मिठागरांच्या (Salt pan) जमिनीवरील उन्नत मार्गांचा समावेश आहे. याशिवाय, वाहनांची वर्दळ सुरळीतपणे हाताळण्यासाठी आणि वाहतूक विखुरण्यासाठी आवश्यक असलेले जोडमार्ग, आंतरबदल (Interchanges) आणि उड्डाणपुलांचीही उभारणी या प्रकल्पांतर्गत केली जात आहे.

हे ही वाचा : वाशिम: कुख्यात गुंडाचा विहिरीत आढळला मृतदेह, 15 हून अधिक गुन्हे दाखल

सध्या काय स्थिती?

सध्या या प्रकल्पाच्या कामाला चांगलीच गती मिळाली असून, सद्यस्थितीत गॅबियन भिंतीचे कुंपण उभारण्याचे काम प्रगतीपथावर आहे. तसेच, पुलाचा पाया भक्कम करण्यासाठी 'पाइल्स' (खोल पाया) आणि त्यावर 'पाइल कॅप' तयार करण्याची प्रक्रिया वेगाने सुरू आहे. येत्या ऑक्टोबर महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात या पुलाच्या 'लाँचिंग गर्डर'चे (Launching Girder) महत्त्वपूर्ण काम सुरू करण्यात येणार आहे. या सर्व सुरू असलेल्या आणि आगामी कामांची सविस्तर माहिती अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (प्रकल्प) अभिजीत बांगर यांनी नुकतीच घेतली असून प्रकल्पाचा आढावा घेतला आहे.