वाशिम: कुख्यात गुंडाचा विहिरीत आढळला मृतदेह, 15 हून अधिक गुन्हे दाखल

मुंबई तक

Washim crime : वाशिम जिल्ह्यात सकाळी 30 ते 40 फुट अंतरावर एका अपराध्याचा मृतदेह आढळून आल्याची धक्कादायक घटना आहे. वाशिम जिल्ह्याच्या रिसोड शहराच्या निजामपूर येथील ही घटना आहे. या घटनेची रिसोड पोलिसांना घटनेची माहिती दिली होती.

ADVERTISEMENT

Washim crime
Washim crime
Google CTA

बातम्या हायलाइट

point

चराऊ जमिनीवरून काही कुटुंबातील व्यक्तींशी वाद

point

मृत व्यक्तीवर 15 ते 20 गुन्हे

Washim Crime : जका खान - वाशिम जिल्ह्यात सकाळी 30 ते 40 फुट अंतरावर एका अपराध्याचा मृतदेह आढळून आल्याची धक्कादायक घटना आहे. वाशिम जिल्ह्याच्या रिसोड शहराच्या निजामपूर येथील ही घटना आहे. या घटनेची रिसोड पोलिसांना घटनेची माहिती दिली होती. दरम्यान, रिसोड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह बाहेर काढला. मृतदेहाला बाहेर काढल्यानंतर मृत व्यक्तीच्या शरीरावर गंभीर जखमा झाल्याचे आढळून आले होते. यानंतर लक्षात आले की, हे प्रकरण हत्येविषयी आहे.

हे ही वाचा : Astrology : 13 सप्टेंबरपासून बुध 'या' राशींसाठी लकी ठरणार

चराऊ जमिनीवरून काही कुटुंबातील व्यक्तींशी वाद

रिसोड पोलिसांनी तात्काळपणे पंचनामा करत प्रकरणाचा तपास सुरू केला होता. मृत व्यक्तीच्या पत्नीने सांगितलं की, पतीचे  मुंगसाजीनगर भागात चराऊ जमिनीवरून काही कुटुंबातील व्यक्तींशी वाद होता. पत्नीने दावा केला की, रात्री घटनास्थळी काही लोकांनी रात्री, जमिनीच्या वादावरून रमेश यांना जीवे मारण्याची धमकीही दिली होती. सकाळी 7 वाजण्याच्या सुमारास रमेश काळे हा आपल्या घरातून बाहेर पडला होता. काही वेळ निघून गेला असता, तो पुन्हा घरी परतलाच नाही. यामुळे पत्नी त्याचा शोध घेऊ लागली होती.  

हे ही वाचा : पतीचं 14 वर्षांच्या मुलीसोबत अफेअर, त्यानंतर घडली मर्डर मिस्ट्री

मृत व्यक्तीवर 15 ते 20 गुन्हे

काही वेळानंतर तपास केल्यानंतर परिसरातील स्मशानभूमीतील एका विहिरीत नवऱ्याचा मृतदेह आढळून आला होता. तोच मृतदेह बाहेर काढला आणि नंतर शवविच्छेदनासाठी पाठवला होता. मृत व्यक्तीच्या पत्नीने दाखल केलेल्या तक्रारीच्या आधारे, पोलिसांनी सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून इतर पाच जणांना ताब्यात घेतले.  मृत रमेश काळे हा एक कुख्यात गुन्हेगार होता आणि त्याच्यावर 15 ते 20 गुन्हे दाखल असल्याचे समजले आहे.