हॉटेलमधील रुम नंबर 101, ब्युटीशियन अन् एक पुरुष; 'त्या' 40 मिनीटांत काय घडलं?
इंदोरमधील एका ब्युटीशियनचा हॉटेलमधील खोलीत मृतदेह सापडला आहे. तिच्यासोबत आलेला पुरुष सध्या फरार असून त्याचा शोध सुरु आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
हॉटेलमधील रुम नंबर 101, ब्युटीशियन अन् एक पुरुष
'त्या' 40 मिनीटांत काय घडलं?
Crime News : एका ब्युटीशियनचा हॉटेलच्या खोलीत संशयास्पद स्थितीत मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. सोनाली शर्मा असं मृत ब्युटीशियनचं नाव आहे. ती मृत अवस्थेत आढळण्यापूर्वी तिच्यासोबत असलेल्या एका व्यक्तीचा पोलीस शोध घेत आहेत. पोलिसांच्या माहितीनुसार, सोनाली इंदोरच्या 'एलएक्स' (LX) हॉटेलमधील खोली क्रमांक 101 मध्ये दुपारी 2 च्या सुमारास बेशुद्ध अवस्थेत आढळली होती. तिला तातडीने रुग्णालयात नेण्यात आले, परंतु तेथे पोहोचताच डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले.
हॉटेलमध्ये काय घडलं?
या प्रकरणी पोलीस दीपक खंडेलवाल या पाईप व्यावसायिकाचा शोध घेत आहेत. खंडेलवाल हा सोनाली बेशुद्ध पडण्यापूर्वी हॉटेलमध्ये तिच्यासोबत उपस्थित होता. प्राथमिक तपासात मृत्यूचे कारण गळफास असू शकते असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला असला तरी, मृत्यूचे नेमके कारण आणि परिस्थिती स्पष्ट करण्यासाठी अद्याप शवविच्छेदन अहवालाची प्रतीक्षा आहे. तपासादरम्यान मिळालेल्या माहितीनुसार, सोनाली दीपकच्या आधीच हॉटेलमध्ये पोहोचली होती व त्यानंतर साधारण एका तासाने दीपक त्या खोलीत गेला होता.
हे ही वाचा : मुंबई फायनल! मनोज जरांगेंची मोठी घोषणा, आझाद मैदानावर कधी येणार?
सीसीटीव्ही फुटेजमध्ये काय दिसलं?
पोलीस सूत्रांनुसार, दीपक सुमारे 40 मिनिटे खोलीत होता आणि बाहेर पडल्यानंतर त्याने हॉटेल कर्मचाऱ्यांना सोनिला आत बेशुद्ध असल्याचे सांगितले. त्यानंतर हॉटेल कर्मचाऱ्यांनी तिला रुग्णालयात नेण्याची व्यवस्था केली, मात्र तिचे प्राण वाचू शकले नाहीत. या तपासाचा भाग म्हणून हॉटेलचे सीसीटीव्ही फुटेजही समोर आले असून, यामध्ये महिलेला कारमध्ये बसवून रुग्णालयात नेताना दिसत आहे. हॉटेलच्या आत आणि बाहेर घडलेल्या घटनांचा क्रम प्रस्थापित करण्यासाठी आणि संबंधित लोकांच्या हालचालींची पडताळणी करण्यासाठी पोलीस या फुटेजची बारकाईने तपासणी करत आहेत.
हे ही वाचा : मुंबई उच्च न्यायालयात याचिका, मनोज जरांगेंच्या आंदोलनावर कोर्टाने काय सांगितलं?
दीपकचा शोध सुरु
या प्रकरणाचा उलगडा करण्यासाठी तपास अधिकारी विशेषतः दीपक खंडेलवालचा शोध घेत आहेत, ज्याच्या जबाबातून खोली क्रमांक 101 मध्ये नेमके काय घडले हे स्पष्ट होऊ शकेल. तसेच, तपासाचा एक भाग म्हणून पोलीस सोनालीच्या कुटुंबीयांचे जबाबही नोंदवत आहेत. शवविच्छेदनानंतर तिच्या कुटुंबीयांनी अंत्यसंस्कारासाठी तिचा मृतदेह राजगढला नेला. शवविच्छेदन अहवाल प्राप्त झाल्यानंतर आणि दीपकच्या चौकशीतून या मृत्यूमागील परिस्थितीचे अधिक तपशील समोर येतील आणि सोनालीच्या मृत्यूपर्यंतचा घटनाक्रम स्पष्ट होईल, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे.
