पहाटेच्या शपथविधीबद्दल कोश्यारींचा गौप्यस्फोट; अजित पवारांचं नाव घेत म्हणाले,... - Mumbai Tak - %e0%a4%aa%e0%a4%b9%e0%a4%be%e0%a4%9f%e0%a5%87%e0%a4%9a%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%be %e0%a4%b6%e0%a4%aa%e0%a4%a5%e0%a4%b5%e0%a4%bf%e0%a4%a7%e0%a5%80%e0%a4%ac%e0%a4%a6%e0%a5%8d%e0%a4%a6%e0%a4%b2 %e0%a4%95 - MumbaiTAK
बातम्या राजकीय आखाडा

पहाटेच्या शपथविधीबद्दल कोश्यारींचा गौप्यस्फोट; अजित पवारांचं नाव घेत म्हणाले,…

Bhagat Singh Koshyari Interview With Mumbai Tak : देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी घेतलेल्या पहाटेच्या शपथविधीच्या अनेक कथा अजूनही महाराष्ट्रात चर्चेत आहेत. काही दिवसांपूर्वी फडणवीसांच्या विधानाने ही घटना पुन्हा केंद्रस्थानी आली. पण सगळ्या घटनांचे साक्षीदार असलेले भगतसिंह कोश्यारी याबद्दल कधीही बोलले नाही. राज्यपाल पदाच्या जबाबदारीतून मुक्त झाल्यानंतर कोश्यारींनी पहाटेच्या शपथविधीबद्दल भाष्य केलं आहे. त्याचबरोबर […]

Bhagat Singh Koshyari Interview With Mumbai Tak : देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी घेतलेल्या पहाटेच्या शपथविधीच्या अनेक कथा अजूनही महाराष्ट्रात चर्चेत आहेत. काही दिवसांपूर्वी फडणवीसांच्या विधानाने ही घटना पुन्हा केंद्रस्थानी आली. पण सगळ्या घटनांचे साक्षीदार असलेले भगतसिंह कोश्यारी याबद्दल कधीही बोलले नाही. राज्यपाल पदाच्या जबाबदारीतून मुक्त झाल्यानंतर कोश्यारींनी पहाटेच्या शपथविधीबद्दल भाष्य केलं आहे. त्याचबरोबर त्यांनी शरद पवारांनाही सुनावलं आहे.

प्रश्न – तुमच्या काळात लोकांसाठी राजभवन खुलं झालं होतं. पण, राजभवन इतकं कधीच वादात राहिलं नाही. अजित पवारांचा शपथविधी झाला. एका रात्रीत राष्ट्रपती राजवट हटवली गेली, ते कसं झालं?

भगतसिंह कोश्यारी -राजकारणात जेव्हा मी राहणार नाही. अनेक लोक राहणार नाहीत. आणि जे खरे राजकारणी आहेत. अभ्यासक आणि विचारवंत आहेत, ते विचार करतील की एका रात्रीत हे कसं झालं. कधी कधी तर अशा गोष्टी एका क्षणात होतात. तुम्ही तर एका रात्रीच बोलत आहात. भूकंप आल्यानंतर एका क्षणात घडून जातं. कुणी सांगितलं की एका रात्रीत झालं. स्वाभाविक आहे की, आमच्याकडे एक मोठ्या पक्षाचा नेता येतो आणि त्याच्यासोबत मित्रपक्षाचा नेता येतो. ते म्हणतात की, माझ्याकडे पाठिंब्याच्या स्वाक्षऱ्या आहेत. नेते विश्वसनीय आहेत. छोटे पण नाहीत. अजित पवार छोटे नेते नाहीत. ते मला येऊन भेटले. मी म्हणालो ठिक आहे. तुमचं बहुमत आहे. सिद्ध करा. मी सिद्ध करण्यासाठी वेळ दिला. असं झालं असेल की वेळ जास्त दिला. कोर्टाने सांगितलं वेळ कमी करा. कमी केला. बहुमत सिद्ध करण्यास समर्थ नव्हते मग त्यांनी राजीनामा दिला. ही सामान्य गोष्ट आहे.

प्रश्न -लपून छपून शपथ घेतली गेली. कारण कुणालाही माहिती नव्हतं. सर्वसामान्यपणे माध्यमांना बोलावलं जातं. आमंत्रित केलं जातं.

भगत सिंह कोश्यारी – बघा. राज्यपाल कुणाला बोलवत नाही. ये काम राज्यपाल करत नाही. हे सरकार करतं आणि ज्याला शपथ घ्यायची असते, तो करतो. जे काही झालं, त्या सगळ्यामध्ये मला असं वाटतं की, मी ज्यांना शपथ दिली, देवेंद्र फडणवीस यांना. त्यांनी यासंबंधी त्यांची भूमिका अगोदरच स्पष्ट केली आहे. मला वाटत त्या भूमिकेनंतर यात मी कुठे मध्ये येतो.

Shiv Sena: “अमित शाह महाराष्ट्राचा पहिल्या क्रमांकाचा शत्रू”, ठाकरेंचा घणाघात

प्रश्न – सर, तुम्ही आता राज्यपाल नाही आहात. तुम्ही मोकळेपणाने बोलू शकता. यात आता असं म्हटलं गेलं की शरद पवारांना याची माहिती होती की नाही. असंही म्हटलं गेलं की हा शपथ विधी झाला नसता, तर राष्ट्रपती राजवट हटली नसती.

भगतसिंह कोश्यारी -जर शरद पवारांसारखे इतके मोठे व्यक्ती जर आणि तर वर चालत असतील, तर मी म्हणेन की, तर मग त्यांनी कोर्टात जे लवासाचं प्रकरण आहे. त्यावर दहा वेळा विचार करायला हवा. कोर्टाने काय म्हटलं आहे त्याबद्दल. ते इतके मोठे व्यक्ती आहे. त्यांचा मी सन्मान करतो. माझ्या हस्ते त्यांना दोन वेळा डी. लिट दिली गेली. मी त्यांचा आदर करतो. ते जर असं बोलत असतील, तर ते राजकीय बोलत आहेत.

‘Amit Shah तर मोगॅम्बो..’, तळवे चाटल्याच्या टीकेवर ठाकरेंचा पलटवार

प्रश्न – देवेंद्र फडणवीस-अजित पवार यांच्या सरकारला बहुमत सिद्ध करण्यासाठी जास्त वेळ देण्यासाठी दबाब होता का?

भगतसिंह कोश्यारी – बघा, असा कोणताही दबाब नव्हता. पण, नेता जेव्हा वेळ मागतो की, बहुमत सिद्ध करायचं आहे. तर मी वेळ दिला. त्यानंतर लोक कोर्टात गेले. कोर्टाने सांगितलं लवकर बहुमत चाचणी घ्या. मी सांगितलं लवकर घ्या. मी कुठे मध्ये येतो. सकाळी आठ वाजता शपथविधी झाला. तरीही असं पसरवलं गेलं की, रात्री शपथविधी झाला.

स्वरा भास्कर बनली आई , मुलीला दिला जन्म… Team India विश्वचषक जिंकण्याची शक्यता, कारण आहे खूप खास! तुमचीही प्रेमात उडालीये झोप? कारण… परिणीती, कियारा, आलिया… लग्नानंतर अभिनेत्रींचे व्हायरल लुक! राजेशाही लग्नातही परिणीतीच्या पायात दिसले स्वस्त सँडल, किंमत बघून विश्वास बसणार नाही VIDEO: iPhone 15 साठी तुफान मारहाण, दुकानात नेमकं काय घडलं? Parineeti Chopra निघाली सासरी, राघव चड्ढांसोबतचे व्हायरल Photo भारतातील ‘ही’ 7 पर्यटन स्थळं, परदेशी स्थळांनाही टाकतात मागे! कपल्ससाठी पुण्यातील जपानी शैलीचं बेस्ट गार्डन… जे मैत्रीचं आहे खास प्रतिक! Raghav-Parineeti यांचा शाही विवाह! पाहिलेत का खास फोटो? सर्पाच्या जोडीचा चिमुकल्यांवर प्राणघातक हल्ला! अखेर… डोक्यावर फेटा, काळा चष्मा… राघव चड्ढांचा रॉयल वेडिंग लुक! 6,6,6,6.. सूर्याने रचला इतिहास, कोहलीचाही मोडला ‘तो’ विक्रम! Premanand Maharaj : ‘या’ 2 गोष्टी करा… विघ्न जातील अन् येतील चांगले दिवस! Jasprit Bumrah ला दुसऱ्या वनडेत का खेळवलं नाही? Katrina Kaif प्रेग्नेंट? सगळीकडे विकी एकटाच का फिरतो? Jio air fiber vs Jio fiber : तुमच्यासाठी कोणतं कनेक्शन फायद्याचं? Alibaug मधील ‘ही’ ठिकाणं नक्की करा एक्सप्लोर! तुमच्या मोबाईलमधील इंटरनेटचे स्पीड कमी झाले असेल तर हे पर्याय निवडा घरच्या घरी बनवा तुमच्या आवडीचं चीज! सोपी आहे रेसिपी…