Latur: पत्नीच्या प्रचार सभेतच पतीचा मृत्यू, नेमकं काय घडलं? - Mumbai Tak - 45 year old husband died of a heart attack in a campaign meeting organized for his wife to be elected as sarpanch - MumbaiTAK
बातम्या मुंबई

Latur: पत्नीच्या प्रचार सभेतच पतीचा मृत्यू, नेमकं काय घडलं?

अनिकेत जाधव, प्रतिनिधी (लातूर) 45 year old husband died of a heart attack in election campaign meeting: लातूर: तब्बल 32 वर्ष गावात आपल्याच चुलत भावाची असणारी सत्ता उलथवून टाकण्यासाठी 45 वर्षीय अमर पुंडलिक नाडे यांनी यंदा शड्डू ठोकला होता. थेट सरपंचपदासाठी (Sarpanch) त्यांनी आपल्या पत्नीलाच (Wife) निवडणुकीच्या (election) रिंगणात उतरवलं होतं. अनेक वर्ष चुलत भावाच्या […]

अनिकेत जाधव, प्रतिनिधी (लातूर)

45 year old husband died of a heart attack in election campaign meeting: लातूर: तब्बल 32 वर्ष गावात आपल्याच चुलत भावाची असणारी सत्ता उलथवून टाकण्यासाठी 45 वर्षीय अमर पुंडलिक नाडे यांनी यंदा शड्डू ठोकला होता. थेट सरपंचपदासाठी (Sarpanch) त्यांनी आपल्या पत्नीलाच (Wife) निवडणुकीच्या (election) रिंगणात उतरवलं होतं. अनेक वर्ष चुलत भावाच्या हातात ग्रामपंचायत (Grampanchayat) असून देखील गावाचा फारसा विकास झालाच नाही असं अमर नाडेंना (Amar Nade) वाटत होतं त्यामुळेच आता आपण स्वत: भावाविरोधात रिंगणात उतरलं पाहिजे असं ठरवून अमर नाडेंनी नवा डावा माडंला होता. पण नियतीला हे काही मान्य नव्हतं. अन् अमर नाडेंनी मांडलेला डाव काळानं अर्ध्यातच मोडला… (45 year old husband died of a heart attack in a campaign meeting organized for his wife to be elected as sarpanch)

दुर्देवाची बाब अशी की, आपली पत्नी सरपंच म्हणून निवडून यावी, तिला तुम्ही भरघोस मतं असं म्हणून खाली बसलेल्या अमर नाडेंना अवघ्या काही क्षणात हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. ही घटना ज्या पद्धतीने घडली त्यांचा चटका अवघ्या मुरुड गावाला बसला आहे.

गिरीश महाजनांचा दणका : मिटकरींच्या गावातील राष्ट्रवादीचे सर्व ग्रामपंचायत सदस्य अपात्र

नेमकी घटना काय?

लातूर जिल्ह्यातील मुरुड या गावच्या ग्रामपंचायत निवडणुकीच्या प्रचार सभेत अमर पुंडलिक नाडे (वय 45 वर्ष) यांचे आकस्मात निधन झाले. मयत अमर यांच्या पत्नी अमृता नाडे या सरपंच पदाच्या उमेदवार आहेत. त्यांच्याच प्रचारार्थ मुरुड शहरातील चौकात काल (14 डिसेंबर) सायंकाळी जाहीर सभा आयोजित करण्यात आली होती. दरम्यान, या सभेत भाषण करुन खाली बसल्यानंतर अवघ्या काही मिनिटातच अमर नाडे यांच्या छातीत दुखू लागलं. आपल्या पत्नीला छातीत जरा जास्त दुखतंय असं त्यांनी आपल्या पत्नीला सांगितलं आणि ते थेट खुर्चीवरून खालीच कोसळले.

यानंतर त्यांना तिथून तात्काळ लातूरच्या शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र, हृदयविकाराचा झटका तीव्र असल्याने त्यांचा उपचाराआधीच मृत्यू झाला असल्याचे डॉक्टरांनी सांगितलं.

ग्रामपंचायत सदस्याच्या पतीची तलवार दाखवत दहशत; घटना सीसीटीव्हीत कैद

भावाची सत्ता उलथवण्यासाठी मांडलेला निवडणुकीचा डाव

BE प्रोडक्शन इंजिनिअरिंग झालेल्या अमर नाडे यांनी त्यांचे चुलत बंधू दिलीपदादा नाडे ज्यांच्या हातात मागील 32 वर्षापासून ग्रामपंचायतची सत्ता आहे यांच्या विरोधात आपलं पॅनल उभं केलं होतं. याआधी देखील त्यांनी भावाविरोधात पॅनल उभं केलं होतं. पण त्यावेळी त्यांना यश आलं नव्हतं. पण तरीही हार न मानता त्यांनी यंदा पुन्हा आपल्या पत्नीला निवडणुकीच्या रिंगणात उतरवलेलं.

अमर नाडे हे लातूरमध्ये भारतीय जनता पक्षाच्या जिल्हा सरचिटणीस या पदावर कार्यरत होते. तसेच ते मुरुडच्या अष्टविनायक शैक्षणिक संस्थेचे ते अध्यक्षही होते. त्यांच्या आकस्मिक निधनाने संपूर्ण गावावरच शोककळा पसरली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

eight + 9 =

‘नाना पाटेकरांची दहशत, दिग्दर्शकांना मारतात’, विवेक अग्निहोत्रींना कोणी भरवली धडकी? नशीब असावं तर असं! बकरी चरायला घेऊन जाणारा क्षणातच बनला कोट्यधीश भारताच्या इतिहासातील 10 सर्वात महान प्रभावी राजे कोणते? तुमच्या घरात फार काळ पैसा का टिकत नाही? भूकंप झाल्यानंतर नेमकी तीव्रता कशी मोजतात, रिश्टर स्केल म्हणजे काय? ‘या’ तारखांना जन्मलेले लोक बुद्धीने असतात हुशार, तुमची जन्म तारीख कोणती? सुंदर ते कोकण! ‘हे’ 10 नयनरम्य समुद्रकिनारे कुटुंबासोबत नक्की करा एक्सप्लोर नेमका काय असतो क्रॅश डाएट, ज्यामुळे गेला श्रीदेवीचा जीव? लाखो रूपयांच्या केशरची घरीच करा शेती, ‘ही’ सोपी पद्धत करा फॉलो! Mumbai मध्ये हँगआउट करण्यासाठी ही 10 ठिकाणं आहेत ‘बेस्ट’! Parineeti Chopra लग्नाच्या लुकवरून ट्रोल, कुणाला केलं कॉपी? टीना दाबीने आनंदाने सांगितली ही गोष्ट… IAS टीना दाबींच्या लेकाचा पहिला फोटो व्हायरल, काकांनी तर केले खूपच लाड! बिग बॉस फेम अभिनेत्रीला कोणी केली मारहाण? ‘तू माझे हृदय आहेस’, IAS रिया दाबीची रोमँटिक पोस्ट! श्रीदेवाची मृ्त्यूचं कारण बोनी कपूरने केलं उघड महात्मा गांधींनी बॅरिस्टर डिग्रीपर्यंतचं शिक्षण का घेतलं? Jio vs Airtel: 84 दिवस चालणारा सर्वात स्वस्त प्लान! समजून घ्या… मुस्लिम क्रिकेटर-हिंदू अभिनेत्री, लग्नावेळी मिळाल्या होत्या ठार मारण्याच्या धमक्या! सुवर्ण मंदिरातील ‘त्या’ व्हिडीओमुळे राहुल गांधी पुन्हा चर्चेत…