3 मोबाइल, 6 पेनड्राइव्ह, 4 मेमरी कार्ड आणि भक्तांच्या खासगी क्षणांचे व्हिडीओ...बाबाच्या चौकशीत धक्कादायक खुलासे

मुंबई तक

अश्लील चाळे करणारा भोंदूबाबा प्रसाद दादा उर्फ बाबा उर्फ प्रसाद दादा भीमराव तामदार (वय 29, रा. सूस गाव, मुळशी) याच्या पोलीस कोठडीत न्यायालयाने चार दिवसांची वाढ केली आहे.

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

बातम्या हायलाइट

point

पुण्यातील भोंदूबाबा प्रकरणा धक्कादायक खुलासे

point

भोंदूबाबा तामदारकडून भलं मोठं साहित्य जप्त

point

पोलिसांना आतापर्यंत काय काय सापडलं?

पुणे : पुण्यात भोंदूबाबाचा हादरवून टाकणारा प्रकारसमोर आला आहे. भक्तांच्या मोबाइलमध्ये ‘हिडन अ‍ॅप’ डाउनलोड करून त्यांचे खासगी क्षण रेकॉर्ड करणारा आणि गुंगीचे औषध देऊन अश्लील चाळे करणारा भोंदूबाबा प्रसाद दादा उर्फ बाबा उर्फ प्रसाद दादा भीमराव तामदार (वय 29, रा. सूस गाव, मुळशी) याच्या पोलीस कोठडीत न्यायालयाने चार दिवसांची वाढ केली आहे. बावधन पोलीस ठाण्यात 39 वर्षीय व्यक्तीच्या तक्रारीवरून या प्रकरणाचा तपास सुरू असून, पोलिसांनी 5 भक्तांची चौकशी केली तेव्हा या भोंदूबाबाच्या किळसवाण्या कारनाम्यांचा पर्दाफाश झाला.

भक्तांना भीती दाखवून फसवणूक

हे ही वाचा >> Mumbai: शिक्षिका चटावलेली शरीर संबंधांना, विद्यार्थ्यांना घेऊन जायची थेट 5 स्टार हॉटेलच्या रुममध्ये अन्...

मोठं संकट येणार असल्याची भीती दाखवून आरोपी भोंदूबाबा भक्तांना त्यांच्या मोबाइलमध्ये ‘हिडन अ‍ॅप’ डाउनलोड करायला लावायचा. त्यानंतर गुंगीच्या गोळ्या देऊन अनैसर्गिक अत्याचार आणि अश्लील चाळे करायचा. एका भक्ताला त्याचे दोष आपल्यावर घेत असल्याची बतावणी करत अश्लील कृत्य केली. तर दुसऱ्या भक्ताला मैत्रिणीशी संबंध प्रस्थापित करताना ‘हिडन अ‍ॅप’ सुरू ठेवण्यास सांगितले. विरोध करणाऱ्या भक्ताला कागदावर तारीख लिहून त्या दिवशी मृत्यू होईल, अशी धमकी देऊन दहशत निर्माण करायचा.

पोलीस तपासात धक्कादायक खुलासे

पोलिसांनी आरोपीकडून तीन मोबाइल, एक डिजिटल पॅड, सहा पेनड्राइव्ह, चार मेमरी कार्ड आणि निद्रानाशावरील गोळ्यांचे पाकीट जप्त केले आहे. भक्तांचे खासगी क्षण ‘हिडन अ‍ॅप’द्वारे रेकॉर्ड करून लॅपटॉपमध्ये सेव्ह केल्याची माहिती समोर आली आहे. हा लॅपटॉप हस्तगत करण्यासाठी तपास सुरू आहे. 

हे ही वाचा >> विद्यार्थीनीची छेडछाड, पालकांनी शिक्षकाला शाळेच्या मैदानातच चोपलं, मुश्रीफांनी फोन केला आणि म्हणाले...

आरोपीने पुरुष, महिला आणि लहान मुलांचीही फसवणूक केल्याची शक्यता असून, लाटलेल्या पैशांतून मालमत्ता खरेदी केली आहे का, आणि त्याने स्थापन केलेली संस्था कायदेशीर आहे का याचा तपास पोलिसांना करायचाय. त्यासाठी तपास अधिकारी उपनिरीक्षक सारंग ठाकरे आणि सरकारी वकील विजयसिंह जाधव यांनी पोलिस कोठडीत वाढीची मागणी केली. ही मागणी मान्य करत न्यायालयाने मंगळवारी आरोपीच्या कोठडीत चार दिवसांची वाढ केली.

पोलीस तपासात आरोपीच्या हायटेक फसवणुकीचे अनेक धक्कादायक प्रकार उघडकीस आले आहेत. भोंदूबाबाने भक्तांना भीती दाखवून आणि गुंगीच्या औषधांचा वापर करून त्यांच्यावर अत्याचार केल्याचं समोर आलं आहे. पोलीस आता आरोपीच्या मालमत्तेची आणि त्याच्या संस्थेच्या कायदेशीरतेची चौकशी करत आहेत. या प्रकरणात आणखी किती भक्तांची फसवणूक झाली आहे, याचा तपास सुरू आहे.

हे वाचलं का?

    follow whatsapp