अमृता फडणवीस ब्लॅकमेल प्रकरणी मोठी घडामोड, थेट गुजरातमधून अटकेची कारवाई

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

Amruta Fadnavis Blackmailng Case: मुंबई: महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या पत्नी अमृता फडणवीस (Amruta Fadnavis) यांना ब्लॅकमेल करून धमकावल्याचा आरोप असलेला बुकी अनिल जयसिंघानी (Anil Jaisinghani) याला अखेर अटक करण्यात आली आहे. अनिलला मुंबई पोलिसांनी गुजरातमधून (Gujarat) अटक केली आहे. अमृता फडणवीस यांनी डिझायनर अनिक्षा (aniksha) आणि तिचे वडील अनिल जयसिंघानी यांच्याविरुद्ध ब्लॅकमेलिंग आणि धमकी दिल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला होता. अनिक्षाला यापूर्वीच अटक करण्यात आली असून आता अनिल जयसिंघानीच्या देखील मुसक्या आवळण्यात आल्या आहेत. (anikshas father and bookie anil jaisinghani arrested from gujarat accused of blackmailing devendra fadnavis wife amruta fadnavis)

काय आहे प्रकरण?

अमृता फडणवीस यांनी गेल्या महिन्याच्या 20 तारखेला डिझायनर अनिक्षा जयसिंघानी आणि तिचे वडील अनिल यांच्याविरुद्ध मलबार हिल स्टेशन येथे एफआयआर दाखल केला होता. अनिक्षाने तिच्या वडिलांसोबत आपल्याला धमकावून आपल्या विरोधात कट रचल्याचा आरोप अमृता फडणवीस यांनी केला आहे. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही याबाबत माहिती दिली होती. याबाबत त्यांनी सांगितलेलं की, अनिक्षाने प्रथम अमृताचा विश्वास जिंकला. अनिक्षानेही तिच्या वडिलांबद्दल अमृतालाही माहिती दिली. वडिलांना खोट्या खटल्यात अडकवल्याचा दावा तिने यावेळी केला होता. याप्रकरणी त्यांनी अमृताची मदत मागितली होती.

अनिक्षाने नंतर अमृताला एक कोटी रुपयांची लाच देऊ केल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. यावेळी अनिक्षाने अमृताला असंही सांगितलं की, ‘तिच्या वडिलांची केस मागे घेतली गेली तर ती त्याला एक कोटी रुपये देईल. पण जेव्हा अमृताने ही गोष्ट करण्यास नकार दिला तेव्हा अनिक्षाने अमृताला ब्लॅकमेल करण्यास सुरुवात केली. जर या प्रकरणात मदत केली नाही तर ती तुमचा पती देवेंद्र फडणवीस यांना या प्रकरणात गोवेल.’ दरम्यान, अनिक्षाने अनेक बनावट ऑडिओ आणि व्हिडिओ रेकॉर्डिंग पाठवून अमृताला ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न केल्याचाही तिच्यावर आरोप आहे.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

Amruta Fadnavis : 1 कोटी लाचेची ऑफर देणारी डिझायनर अनिक्षा कोण?

कोण आहे अनिल जयसिंघानी?

अनिल जयसिंघानी हा एक प्रसिद्ध बुकी आहेत. तो मूळचा उल्हासनगरचा रहिवासी आहे. त्याच्यावर 5 राज्यात 17 गुन्हे दाखल आहेत. एवढेच नाही तर तब्बल 8 वर्षे तो फरार होता. अनिलला बेटिंग प्रकरणात तीनवेळा अटकही झाली आहे. त्याच्यावर एकूण 17 गुन्हे दाखल आहेत. गोवा पोलिसांनी 11 मे 2019 रोजी त्याच्याविरुद्ध लुकआउट नोटीस जारी केली होती.

ADVERTISEMENT

Amruta Fadnavis यांना 1 कोटीची लाच देण्याची ऑफर; तरुणीला अखेर अटक

ADVERTISEMENT

सुमारे आठ वर्षांपूर्वी मे 2015 मध्ये गुजरात अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) जयसिंघानीच्या दोन घरांवर छापे टाकले होते आणि त्याच्यावर मनी लाँड्रिंगचा गुन्हा दाखल केला होता. पण तब्येतीचे कारण देत तो फरार झाला होता. त्यानंतर त्याच्यावर मुंबईतील दोन पोलीस ठाण्यात फसवणूक आणि बनावट कागदपत्रं बनविल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता.

इतकंच नाही तर जयसिंघानी बीसीसीआयच्या अँटी करप्शन अँड सिक्युरिटी (ACSU) च्या रडारवरही आहे. त्याने सुरुवातीला उल्हासनगरमध्ये क्रिकेट बुकी म्हणून काम केलं होतं.

प्रियंका चर्तुर्वेदी-अमृता फडवणीसांमध्ये घमासान; ‘मॅडम चतूर… औकात… अन्’

    follow whatsapp

    ADVERTISEMENT