Mumbai Tak /बातम्या / Bhushan Desai: ‘या’ प्रकरणामुळे सुभाष देसाईंचे पुत्र शिंदे गटात?
बातम्या राजकीयआखाडा

Bhushan Desai: ‘या’ प्रकरणामुळे सुभाष देसाईंचे पुत्र शिंदे गटात?

मुंबई: शिवसेना (Shiv Sena) UBT पक्षाचे ज्येष्ठ नेते सुभाष देसाई (Subhash Desai) यांचे पुत्र भूषण देसाई (Bhushan Desai) यांनी आज (13 मार्च) शिवसेना (शिंदे गटात) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत पक्षात प्रवेश केला. मात्र, असं असताना आता एक चर्चा अशीही सुरू झाली आहे की, भूषण देसाई यांनी एका प्रकरणामुळे दबावापोटी शिंदे गटात प्रवेश केल आहे. याबाबत भूषण देसाई यांना पत्रकार परिषदेत प्रश्नही विचारण्यात आला. ज्यावर भूषण देसाईंनी उत्तरही दिलं. पण ते उत्तर जाणून घेण्याआधी आपण भूषण देसाईंबाबतचं नेमकं प्रकरण काय ते सविस्तरपणे समजून घेऊया. (which case against subhash desai son bhushan desai was discussed in vidhansabha what is the connection with shiv sena party entry)

Bhushan Desai: ‘एक चूक महागात पडू शकते’, भाजप नेत्याचं शिंदेंना पत्र

भूषण देसाईंवर करण्यात आलेले गंभीर आरोप

राज्यात काही दिवसांपूर्वी झालेल्या हिवाळी अधिवेशनात भाजपचे आमदार अतुल भातखळकर यांनी भूषण देसाईंवर गंभीर आरोप केले होते. ते नेमके आरोप काय ते जाणून घ्या.

विधानसभेत अतुल भातखळकरांनी भूषण देसाईंवर आरोप करताना म्हटलं होतं की, ‘MIDC ची कुठलीही जागा जी मूलत: उद्योगासाठी राखीव असते ती थेट रहिवाशी क्षेत्रात परावर्तित करता येत नाही. उद्योगाआधी तुम्हाला जागा कमर्शिअल करावी लागते आमि मग रहिवासी. पण अडीच वर्षाच्या कालखंडात MIDC महाराष्ट्रातील 4 लाख 14 हजार स्क्वेअर मी. एवढी जागा जी औद्योगिक कारणाकरिता राखीव होती ती जागा थेट बेकायदेशीर पद्धतीने रहिवासी वापराकरिता परावर्तित केली. या जागेची मार्केट व्हॅल्यू 3 हजार 190 कोटी आहे. पण कायदा पायदळी तुडवून जमिनीच्या आरक्षणात बदल केला.’ असं म्हणत भातखळकर यांनी काही सवालही उपस्थित केले होते.

प्रश्न:

1. कोण आहेत भूषण सुभाष देसाई?, सॉफिटेलला बसून कोणते व्यवहार होत होते?

2. त्या भूषण देसाईची आणि तत्कालीन उद्योगमंत्र्याची (सुभाष देसाई) चौकशी व्हावी

3. 20.5.2021 ची 6 ऑर्डर गतीमान सरकार, कोरोनाच्या कालखंडात महसुलाची लूट

4. SIT नेमून चौकशी करा पैसे मातोश्रीपर्यंत गेले का?

Bhushan Desai : “सुभाष देसाईंना स्पष्टपणे सांगून निघालोय, मी शिंदेंसोबत…”

दरम्यान, अतुल भातखळकर यांच्या या आरोपानंतर ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव यांना प्रत्युत्तर दिलं,

भास्कर जाधव म्हणाले की, ‘भातखळकरांना कोणत्या नियमानुसार बोलण्यास दिलं?, सभागृहासमोर तो विषय नाही. सभागृहात त्याविषयावर चर्चा नाही. अशावेळी कधीही कोण उठून बोलत आहे. परवा एका विषयावर चर्चा झाली इथले एक सदस्य उठले त्यावर एसआयटी, काय चालयं काय? यामुळे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर तुमच्या कारकिर्दीला डाग लागणार आहे. संख्याबळाच्या जोरावर माझं तोंड बंद करू शकता. पण जे बेकायदेशीर सुरू आहे ते दाखवू शकत नाही. अशी आक्रमक भूमिका भास्कर जाधव यांनी मांडली होती. ज्यामुळे सभागृहात गोंधळाचे वातावरण निर्माण झालं होतं.

ठाकरेंना जबर धक्का : सुभाष देसाईंच्या कुटुंबातच फूट; पुत्र एकनाथ शिंदेंसोबत!

दरम्यान, यानंतर उद्योगमंत्री उदय सामंत असं म्हणाले होते की, ‘उच्चस्तरीय समितीमार्फत चौकशी केली जाईल, आणि पुढच्या अधिवेशनात सविस्तर अहवाल सादर केला जाईल.

आता या सगळ्या प्रकरणाबाबत आजच्या (13 मार्च) पत्रकार परिषदेत भूषण देसाई यांना याचबाबत प्रश्नही विचारण्यात आला. तेव्हा त्यांनी यावर अगदी एका वाक्यात उत्तर दिलं. ‘मी शिवसेनेत भ्रष्टाचाराच्या आरोपामुळे अजिबात प्रवेश नाही. माझा स्वतंत्र विचार आहे म्हणून शिंदे गटात.’ असं म्हणत भूषण देसाईंनी या प्रश्नावर अधिक उत्तर ने देणं पसंत केलं.

‘ठाकरेंनी गद्दारी तर..’, सुभाष देसाईंच्या मुलाच्या पक्षप्रवेशानंतर CM शिंदेचा वार

रक्षकच बनले भक्षक! पोलिसांचाच गॅगरेप पिडितेवर बलात्कार Uttar Pradesh: महिलेच्या हत्येचे गूढ 9 वर्षांनंतर एका पोपटाने उलगडलं… Shraddha Arya: बॉलिवूड अभिनेत्रीने पतीच्या वाढदिवसाला घातली बिकिनी, नेटकरी म्हणाले… प्रसुतीनंतर अभिनेत्रीचं अविश्वसनीय ट्रान्सफॉर्मेशन, घटवलं 10 किलो वजन! Amrita Ahuja: हिंडेनबर्गच्या अहवालात भारतीय वंशीय महिलेचं नाव, गंभीर आरोप 38 कोटींचा बेवारस चेक परत केला अन् जे मिळालं त्याने पायाखालची जमीन सरकली Twitter Blue tick: ब्लू टिकसाठी आता पैसे भरा, महिन्याला किती रुपये द्यावे लागणार? H3N2 Virus पासून बचावासाठी ‘या’ घरगुती गोष्टींचा आहारात करा वापर… MS Dhoni: आयपीएलमध्ये धोनी करणार गोलंदाजी? नेटमधील फोटो बघून चाहते बुचकळ्यात Anushka Sharma : ग्लॅमरस ड्रेस, पायात घुंगरांचं पैजण अनुष्काची यूनिक स्टाईल चाहत्यांना भावली वय अवघं 48…काजोल देवगणच्या बोल्ड लूकची चर्चा ‘भाबी जी घर पर हैं’ हा अश्लील शो आहे का? अंगूरी भाभी म्हणाली, ‘मी कधीही…’ हिंदू राष्ट्राचे स्वप्न महाराष्ट्रातूनच पूर्ण होईल: धीरेंद्र शास्त्री या 6 गोष्टी रोज करा.. आयुष्यभर आनंदाची खात्री Salman Khan: कोट्यवधींमध्ये फीस घेतो, तरीही राहतो 1BHK फ्लॅटमध्ये, घरात काय काय? ईशा अंबानीचा रॉयल लूक पाहतच राहाल… मोबाइल दुकानदारावर जडला जीव; पत्नीने रचला कट, पतीची निर्घृण हत्या! 4 फूट उंचीचा ‘तो’ रेसलर, WWE च्या रिंगमध्ये महिला रेसलरला केलेलं KISS बॉलिवूडच्या ललनाचा हॉट बॅकलेस अवतार गर्लफ्रेंडला परत मिळवण्यासाठी ठोठावला कोर्टाचा दरवाजा