सचिनच्या समर्थनार्थ भाजप पुढे, फडणवीस म्हणतात.. - Mumbai Tak - bjp stands for sachin tendulkar - MumbaiTAK
बातम्या

सचिनच्या समर्थनार्थ भाजप पुढे, फडणवीस म्हणतात..

मास्टरब्लास्टर भारतरत्न सचिन तेंडूलकरने काही दिवसांपूर्वी शेतकरी आंदोलनाच्या पार्श्वभूमवीर केलेल्या ट्विटवरून निर्माण झालेला वाद अजूनही संपायचं नाव घेत नाहीये. अजुनही त्याला मोठ्या प्रमाणावर रोषाला सामोरं जावं लागतंय. त्यातच आता केरळमधल्या युवक काँग्रेस कार्यकर्त्यांनी सचिनच्या पोस्टला हे असं काळं तेल वाहून आपला निषेध नोंदवल्याची घटना घडलीय. त्यानंतर आता भाजप सचिनच्या पाठिंब्यात पुढे सरसावल्याचं दिसून येतंय. विरोधी […]

मास्टरब्लास्टर भारतरत्न सचिन तेंडूलकरने काही दिवसांपूर्वी शेतकरी आंदोलनाच्या पार्श्वभूमवीर केलेल्या ट्विटवरून निर्माण झालेला वाद अजूनही संपायचं नाव घेत नाहीये. अजुनही त्याला मोठ्या प्रमाणावर रोषाला सामोरं जावं लागतंय. त्यातच आता केरळमधल्या युवक काँग्रेस कार्यकर्त्यांनी सचिनच्या पोस्टला हे असं काळं तेल वाहून आपला निषेध नोंदवल्याची घटना घडलीय. त्यानंतर आता भाजप सचिनच्या पाठिंब्यात पुढे सरसावल्याचं दिसून येतंय. विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी सचिनच्या बाजूने ट्विट करत ठाकरे सरकारला सवाल केलाय. तर राम कदम, संबित पात्रा यांनीही सचिनच्या समर्थनार्थ ट्विट केली आहेत.

3 फेबुवारीला सचिन तेंडूलकरने देशाच्या अखंडत्वाबद्दल ट्विट केलं होतं. त्यानंतर सोशल मीडियावर सचिनविरोधी वातावरण निर्माण झालं. त्यातच आता केरळमधल्या कोचीत युवक काँग्रेस कार्यकर्त्यांनी सचिनच्या पोस्टला काळं तेल वाहून आपला निषेध नोंदवला आहे. त्याचीच दखल घेत देवेंद्र फडणवीस यांनी, केवळ महाराष्ट्राचे नाही, तर संपूर्ण देशाचे भूषण असलेले, भारतरत्न आणि मराठी माणसाचे अभिमान असलेले सचिन तेंडूलकर यांचा असा अपमान महाविकास आघाडीचे नेते सहन करणार का?, असा सवाल करणारं ट्विट केलं आहे. तर भाजपच्या संबित पात्रा यांनी काँग्रेसवर टीका केलीय, काँग्रेस पैसे घेऊन ट्विट करणा-या सेलिब्रिटिजना पाठीशी घालून खरे देशभक्त असलेल्या भारतरत्नाची प्रतारणा करत असल्याचं ट्विट त्यांनी केलं आहे.

तर राम कदम यांनीही, भारतरत्न, देशाचे भूषण असलेले सचिन तेंडूलकर यांचा असा अपमान होतोय. सचिनवर जिवापाड प्रेम करणार्‍या स्वर्गीय बाळासाहेबनी हे कधीही सहन केले नसते. शिवसेना आणी क्रिकेटवर प्रेम करणारे मा.शरद पावरजी सचिनचा असा अपमान करणार्‍यांना समर्थन करणार की जोड्याने बडवनार? सचिनचा हा अपमान महाराष्ट्रचा मराठी माणूस अन देश कधीही सहन करणार नाही. सचिन तुमच्या सोबत सारा देश आहे #IndiaAgainstPropaganda #IndiaTogether #JaiJawanJaiKissan, असं ट्विट केलंय.

दुसरीकडे केरळमधले काही सोशल मीडिया युजर्स याच मुद्द्यावरून तर थेट रशियाची टेनिसपटू मारिया शारापोव्हाची माफी मागत असल्याचं दिसून येतंय. मारियाने २०१५ साली एका मुलाखतीत सचिन तेंडुलकरला ओळखत नसल्याचे म्हटले होते. तेव्हा भारतीय लोकांनी तिच्यावर सडकून टीका केल्या होत्या. पण सचिनच्या ट्विटनंतर मात्र आता सोशल मीडिया युजर्स तिची त्या घटनेबद्दल माफी मागायला सुरूवात केलीय. विशेष म्हणजे या माफी मागण्या-यांमध्ये केरळ मधल्या नागरिकांची संख्या जास्त असल्याचं सांगितलं जातंय. त्यामुळे आता हे प्रकरण आणखी किती वाढतं आणि राजकीयस्तरावरून यावर कोणत्या प्रतिक्रिया दिल्या जातात हे पाहण महत्त्वाचं ठरेल.

हा व्हिडिओ देखील पहा…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

seventeen + 8 =

शरीरातील 7 ठिकाणी वेदना जाणवल्या तर समजा… जान्हवीसोबत ओरी… ‘या’ लुकसाठी खर्च केले ‘एवढे’ लाख! इम्रानसोबतच्या किसिंग सीनबाबत तनुश्री दत्ताचा मोठा खुलासा शमीची पत्नी हसीन जहाँला चीअर लीडर म्हणून एवढा होता पगार! मुलाच्या जन्मानंतर IAS टीना दाबी खूपच बदलली, फोटो व्हायरल बॉबीने Animal मध्ये नाना पाटेकरची केली कॉपी? ‘हा’ व्हिडिओ पाहिल्यानंतर.. Ritu Suhas: ग्लॅमरस IAS अधिकारी, रॅम्पवर जलवा UPSC मुलाखतीत सर्वाधिक विचारले जातात ‘हे’ प्रश्न पोटाची चरबी 15 दिवसात होईल कमी, फक्त ‘या’ बिया खा अन् पाहा कमाल! तेजस्वीचा 9 वर्षांनी मोठ्या बॉयफ्रेंडसोबत सर्वांसमोरच liplock kiss तुम्ही मानसिकदृष्ट्या वृद्ध बनत आहात का..? ‘या’ गोष्टीमुळे शांत झोप कधीच नाही लागणार ‘या’ लोकांनी चुकूनही दूध पिऊ नये… मराठी सिनेसृष्टीत येतोय नवा चेहरा; जिच्या रूपाची आधीपासूनच का आहे एवढी चर्चा? भारतातील 8 सर्वात तरुण महिला IAS अधिकारी; तुम्हाला किती माहितीयेत? Apurva Nemlekar: अपूर्वाचा स्विमिंग पूलमध्ये ‘खेळ चाले…’ मादक अदा अन्… ह्रतिक रोशन-दीपिका पदुकोणचा Fighter मध्ये रोमान्स, बघा Video UPSC: अभिनेत्री नाही.. तर ही आहे मोठी अधिकारी, सगळेच करतात सॅल्यूट! Belly Fat: सकाळी उठल्यानंतर ‘या’ 8 गोष्टी करून वाढलेलं पोट करा कमी! IAS अधिकारी व्हायचंय? मग ‘या’ Top 7 गोष्टींची सवय असलीच पाहिजे