राष्ट्रवादीचे नेते हसन मुश्रीफ यांच्या घरावर पुन्हा ईडीचा छापा

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

Ed Raids Ncp Leader Hasan Mushrif House : राष्ट्रवादीचे नेते आणि माजी मंत्री हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) यांच्या घरावर पुन्हा एकदा अंमलबजावणी संचलनालयाच्या (ED) टीमकडून छापेमारी करण्यात आली आहे. आज (11 मार्च) पहाटेच ईडीच्या (Ed Raid) अधिकाऱ्यांनी मुश्रीफ यांचे घर गाठले आहे. तसेच ईडीकडून कागदपत्रांची तपासणी करण्यात येत आहे. गेल्या दीड महिन्यातली मुश्रीफ यांच्या घरावर पडलेली ही दुसरी धाड आहे. त्यामुळे हसन मुश्रीफ यांच्या अडचणीत वाढ झाली असून त्यांना अटक होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. दरम्यान या घटनेनंतर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी मुश्रीफ यांच्या घराबाहेर एकत्र जमून घोषणाबाजी सुरु केली आहे. (ed again raids ncp leader hasan mushrif kolhapur kagal house)

हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) यांच्या कोल्हापूर जिल्ह्यातील कागलमधील घरावर आज पहाटे ईडीने छापा टाकला आहे. ईडीच्या अधिकाऱ्यांनी सकाळी सकाळीच मुश्रीफ यांच्या घरी येऊन तपासणी सुरू केली आहे.ईडीकडून महत्वाच्या कागदपत्राची तपासणी करण्यात आहे. यावेळी मुश्रीफ यांच्या घराबाहेर सुरक्षा रक्षकांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. याआधी 11 जानेवारी 2023 ला ईडीच्या 25 जणांच्या पथकाने मुश्रीफ यांच्या घरावर छापा टाकला होता. गेल्या दोन महिन्यातील ईडीनेही दुसरी छापेमारी केल्याने मुश्रीफ यांना मोठा धक्का बसला आहे.

सोमय्यांची बातमी खरी ठरली! सदानंद कदम यांना ईडीकडून अटक

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

ईडीचा छापा पडल्याची माहिती मिळाल्यानंतर कागल शहरातील राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते मोठ्या संख्येनं हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) यांच्या घराबाहेर जमा झाले आहेत. ईडीच्या कारवाईविरुद्ध घोषणा कार्यकर्त्यांकडून दिल्या जात आहे.किरीट सोमय्या यांनी गेल्या वर्षी 2700 पानी पुरावे ईडी आणि आयकर विभागाला दिले होते. हसन मुश्रीफानी 127 कोटींचं मनी लाँड्रिंग केल्याचा आरोप सोमय्यांचा आहे. तेव्हापासूनच हसन मुश्रीफ यांच्यामागे आयकर विभाग आणि ईडीचा ससेमिरा लागला होता.

Bachchu Kadu: ‘बच्चू भाऊ गद्दारांबरोबर जायला नको होतं’, कोणी सुनावलं?

ADVERTISEMENT

नेमकं काय प्रकरण?

भाजपचे नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी मुश्रीफ यांच्यावर तब्बल 127 कोटींचा घोटाळ्याचा आरोप केला आहे. यात त्यांच्यावर प्रामुख्याने अप्पासाहेब नलावडे साखर कारखान्यासंदर्भातील गैरव्यवहारांचे आरोप आहेत. अप्पासाहेब नलावडे साखर कारखान्यात त्यांच्या एका नातेवाईकाच्या मालकीच्या व ताब्यात असलेल्या खासगी कंपनीच्या माध्यमातून 100 कोटी रुपयांचा भ्रष्टाचार केल्याचा आरोप सोमय्यांनी मुश्रीफ यांच्यावर केलेला आहे.

ADVERTISEMENT

किरीट सोमय्या (Kirit Somaiya)यांनी असाही आरोप केला होता की, अप्पासाहेब नलावडे साखर कारखाना ब्रिक्स इंडिया प्रायव्हेट लिमिटेडनं ताब्यात घेतला होता. या कंपनीचे मालक मुश्रीफांचे नातेवाईक मतीन हसीन मंगोली हे होते. ब्रिक्स इंडियाला कारखाना देताना प्रक्रियेचं पालन केलं गेलं नाही. दुसर्‍या तक्रारीत किरीट सोमय्या यांनी आरोप केलेला होता की, हसन मुश्रीफ हे सर सेनापती संताजी घोरपडे साखर कारखान्याच्या नावाने 127 कोटी रुपयांच्या बेकायदेशीर व्यवहार आणि मनी लाँडरिंगमध्ये सामील आहेत.

रामदास आठवलेंची शरद पवारांना खुली ऑफर; राष्ट्रवादी भूमिका बदलणार?

    follow whatsapp

    ADVERTISEMENT