SACHIN VAZE: ‘सरकारसाठी हे शुभसंकेत नाहीत’, राऊत असं का म्हणाले?

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

मुंबई: ‘मनसुख हिरेन यांच्या मृत्यूने महाराष्ट्राचे राजकारण ढवळून निघाले आहे. त्या ढवळ्याने विरोधी पक्षाने काय मिळवले याचे उत्तर गमावलेला आत्मविश्वास असेच द्यावे लागेल. त्यामुळे सरकारसाठी हा शुभसंकेत नाही.’ असं मत शिवसेना खासदार आणि सामनाचे कार्यकारी संपादक संजय राऊत यांनी व्यक्त केलं आहे.

मुकेश अंबानी यांच्या घराजवळ एका गाडीत स्फोटकं आढळल्याप्रकरणी सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन वाझे यांना अटक करण्यात आली त्यानंतर आता विरोधकांकडून सरकारवर टीका केल्या जात आहेत, तर दुसरीकडे शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या सामनामधून सचिन वाझे मनसुख हिरेन प्रकरणी अंबांनीच्या ढाली आडून काय सुरू आहे? असा सवाल करण्यात आला आहे.

अंबानींच्या घराबाहेर आढळलेली गाडी हा कट असेल तर अंबानी कुटुंबास ठार करण्याचा कट ‘जैश-उल-हिंद’ने का रचावा? २१ जिलेटिनच्या कांड्या व एक स्कॉर्पिओ हा अंबानींसारख्या अतिसुरक्षित व्यक्तीवर हल्ला करण्याचा कट म्हणजे हास्यास्पद प्रकार आहे, असं म्हणतं आजच्या सामनातून या प्रकरणावर काही प्रश्न उपस्थित केले गेले आहेत.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

वाझेंची अटक आणि POLICE लिहिलेल्या Innova कारचा नेमका संबंध काय?

मनसुख हिरेन या व्यावसायिकाच्या मृत्यूने महाराष्ट्राचे राजकारण सध्या ढवळून निघाले. त्या ढवळण्यातून विरोधी पक्षाने काय मिळवले, याचे उत्तर‘गमावलेला आत्मविश्वास’असेच द्यावे लागेल. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना दीड वर्षात प्रथमच विरोधी पक्षनेता म्हणून सूर सापडला. आठ दिवसांच्या अधिवेशनात संपूर्ण ‘फोकस’ विरोधी पक्षनेत्यांवर राहिला हे सगळ्यात मोठे यश, अशी टीकाही विरोधकांवर करण्यात आली आहे.

ADVERTISEMENT

ज्या मनसुखचा संशयास्पद मृत्यू झाला त्याचा मृतदेह मुंब्य्राच्या खाडीत सापडला हे सर्व प्रकरण म्हणूनच रहस्यमय झाले, पण रहस्य व सत्य यात फरक आहे. विरोधी पक्षनेते फडणवीस यांनी गुप्तहेर शेरलॉक होम्सप्रमाणे या प्रकरणाचा तपास केला व काही गोष्टी समोर आणल्या. एखाद्या निष्णात फौजदारी वकिलाप्रमाणे संपूर्ण केस विधानसभेत मांडली. त्यांचे वकिलीचातुर्य या वेळी वाखाणण्यासारखेच होते, पण फौजदारी वकिलाने खटला कितीही रंगतदार केला तरी न्यायदान हे पुराव्यांवरच केले जाते.

ADVERTISEMENT

वाझेंच्या अटकेनंतर मोठी घडामोड, NIA ला सापडली पांढरी इनोव्हा कार!

मुंबई पोलिसांच्या कार्यपद्धतीवरच विरोधी पक्षनेत्यांनी प्रश्नचिन्ह निर्माण केले, पण हेच पोलीस वर्षभरापूर्वी फडणवीस यांचे हुकूम ऐकत होते, असं म्हणतं त्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर हल्ला चढवला आहे.

मुंबई पोलिसांच्या तपासावर राज्याचे विरोधी पक्षनेते आक्षेप घेतात. पोलिसांचे मनोधैर्यच नष्ट करतात. हा राज्यव्यवस्थेवर दबाव आणण्याचाच प्रयत्न असतो. या दबावातूनच पोलीस व प्रशासन विरोधी पक्षनेत्यांना गुप्त माहिती पुरवत असतात. हे असे घडणे सरकारसाठी शुभसंकेत नाहीत, पण सगळ्यांनाच पाण्यात राहायचे आहे. माशाशी वैर का करायचे? असे सगळ्यानाच वाटू लागले तर राज्याचा प्रवाह गढूळ होईल, अशी चिंताही राऊत यांनी व्यक्त केली आहे.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT