फी न भरता आल्याने हतबलं बापानं मृत्यूला कवटाळलं

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

father commits suicide : देशात मुलींचा शाळेतील आकडा वाढावा यासाठी ‘बेटी बचाओ, बेटी पढाओ”चा नारा दिला जातो. मात्र असे असतानाच एक हादरवून सोडणारी घटना समोर आली आहे. या घटनेत पाचवीत शिकत असलेल्या मुलीची (School Girl) फी भरता आली नसल्याने वडिलांनी (Father)आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. मुलीला शाळेत फी न भरल्यामुळे नेहमी उभं केलं जायचं. तसेच शाळेकडून अनेकदा त्यांना नोटीस बजावण्यात आली होती.त्यामुळे या त्रासाला कंटाळून पित्याने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडलीय. या घटनेने गावात शोककळा पसरली आहे. (father commits suicide after not being able to deposite daughter fees in kanpur)

आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल

कंठीपूर गावात कमलेश त्याच्या कुटूंबियांसोबत राहत होता. याच गावातीच शाळेत त्याची मुलगी (School Girl) पाचवीत शिकत होती. पाचवीत शिकत असलेल्या या मुलीच्या शाळेची फी वडिलांना भरता येत नव्हती. गेल्या पाच महिन्यापासून मुलीची फी भरली गेली नव्हती. त्यामुळे दररोज तिला शाळेत उभं केलं जायचं. मुलीसोबत दररोज होत असलेल्या प्रकाराने वडिल चिंतीत होते, यातूनच कंटाळून त्यांनी आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल उचलंल.

आणखी एका नवरा-बायकोचा बाथरूममध्ये एकत्रच मृत्यू, का घडतंय असं?

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

कमलेशने 12 मार्चला आत्महत्या केली होती. मुलगी घाटमपूरच्या शाळेत शिकत होती, पती कमलेशची नोकरी सुटली होती, त्यामुळे ते बेरोजगार होते. तसेच त्यांच्या आईला कॅन्सर झाला होता. त्यामुळे सर्व पैसै उपचारात गेले होते. याच कारणामुळे त्यांना पाच महिन्यापासून फी भरता आली नव्हती. फी मुळे ते खुप चिंतेत होते. याच कारणामुळे त्यांनी 12 मार्चला आत्महत्या केली, अशी माहिती कमलेशच्या पत्नीने दिली होती.

नवी मुंबईला हादरून टाकणारी घटना, दिवसाढवळ्या गोळ्या झाडून बिल्डरची हत्या

ADVERTISEMENT

वडिलांच्या मृत्यूला 4 दिवस उलटले होते, मात्र त्याची मुलगी स्वत:लाच दोषी मानत होते. मुलगी यामुळे नैराश्यात देखील गेली होती. स्वत:ला वडिलांच्या मृत्यूला जबाबदार ठरवत आहे. आता मुलीच्या डोक्यावर पित्याचं छत्रही हरपलं आणि तिची शाळाही गेली आहे. या घटनेने गावात एकच शोक पसरली असून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

ADVERTISEMENT

मुंबई शहारली! बॉयफ्रेंडसाठी आईचे केले तुकडे, पोलिसांनी असा लावला छडा

दरम्यान एकीकडे बेटी बचाओ, बेटी पढाओ चे नारे दिले जात असताना, एका मुलीला शाळेत अशाप्रकारे वागणूक देणे खुपच चुकीचे होते.शासनाकडून हा नारा दिला जात असताना वडिलांचा अशाप्रकारे आत्महत्या करण्याच्या घटनेवर शोक व्यक्त होत आहेत.तसेच अनेक नागरीक शाळेच्या कारभावार टीका करत आहे. कानपूरमध्येही घटना घडली आहे. या घटनेने जिल्हा हादरला आहे.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT