Mumbai Tak /बातम्या / Health: सगळीकडे खो खो! हार्ट अटॅकसह तापाचे रुग्ण वाढले, तज्ज्ञांकडून महत्त्वाचा सल्ला
बातम्या मुंबई

Health: सगळीकडे खो खो! हार्ट अटॅकसह तापाचे रुग्ण वाढले, तज्ज्ञांकडून महत्त्वाचा सल्ला

Heart Attack, Cough and Viral Fever : देशभरात गेल्या अनेक महिन्यांपासून नागरिकांमध्ये हार्ट अटॅक (Heart Attack) येण्याचे प्रमाण खूप वाढले आहे. यामधील अनेक गंभीर प्रकरणे देखील समोर आले होते. यासोबतच सध्या नागरीकांना सर्दी, खोकला ताप आणि घसा खवखवण्याच्या समस्याही भेडसावत आहेत. या आजारातील काही आजार आठवडा आठवडा बरे होत नाहीत. त्यामुळे नागरीकांमध्ये दहशतीचे वातावरण पसरले आहे. दरम्यान नेमके हे आजार नागरीकांना का होतायत? यावर तज्ज्ञ डॉक्टरांचे म्हणणे काय आहे? तसेच तज्ज्ञ डॉक्टरांनी (Specialist doctors) यावर काय उपाय सांगितले आहेत? हे जाणून घेऊयात.(heart attack seasonal fever and cough patient count increases specilist doctor told the reason)

हार्ट अटॅकच्या घटना वाढल्या?

देशातील अनेक राज्यात हार्ट अटॅकच्या (Heart Attack)घटना वाढल्या आहेत. तेलंगणाची राजधानी हैदराबादमध्ये गेल्या 10 दिवसात हार्ट अटॅकचे 5 रूग्ण आढळले आहेत. या पाचमध्ये एका महाविद्यालयीन विद्यार्थ्याचा समावेश आहे. या घटनेपुर्वी हैदराबादच्या सिकंदराबादमध्ये बॅडमिंटन खेळताना एका व्यक्तीचा हार्ट अटॅकने मृत्यू झाला होता.महाराष्ट्राच्या नांदेडमध्येही नाचत असताना एका मुलाला हार्ट अटॅक आला होता. तसेच गुजरातमधील अहमदाबाद येथे क्रिकेट सामन्या दरम्यान एका जीएसटी कर्मचाऱ्याची हार्ट अटॅकने मृत्यू झाल्याची घटना घडली होती. गुजरातमध्येही 7 जणांचा हार्ट अटॅकने मृत्यू झाला आहे. विशेष म्हणजे या सर्व प्रकरणातील नागरीकांचे वय 40 वर्षांपेक्षा कमी होते.

Nagpur : भयंकर! अल्पवयीन मुलीने youtube बघून केली स्वतःची प्रसुती अन्…

तरूणांमध्ये हार्ट अटॅकचे प्रमाण का वाढतेय?

तरूणांमध्ये वाढत्या हार्ट अटॅकच्या (Heart Attack) घटनांवर जयपूरचे हार्ट स्पेशालिस्ट डॉ. गोविंद शरण शर्मा म्हणतात की, हार्ट अटॅक याआधी फक्त 60 वर्ष वयोगटातील नागरीकांना यायचा, पण आता 20 ते 30 वयोगटातील तरूणांना देखील येतो आहे. याला वाईट जीवनशैली, ताणतणाव, मद्यपान आणि धुम्रपाण कारणीभूत असल्याचे ते म्हणतात.

हवामान कारणीभूत आहे का?

हवामानातील बदलामुळे अनेक वेळा रक्तदाब अचानक वाढतो. यामुळे रक्त गोठणे म्हणजेच रक्तवाहिन्यांमध्ये रक्ताची गुठली तयार होऊ लागते, ज्यामुळे हार्ट अटॅक (Heart Attack)आणि ब्रेन स्ट्रोक येतो. हवामानातील बदलामुळे नागरीकांमध्ये सर्सगाचा धोकाही वाढतो. आहारातील बदल, व्यायामाचा अभाव यामुळेही हार्ट अटॅक येण्याची शक्यता वाढते.

काय काळजी घ्याल?

तरूणांमध्ये वाढत्या हार्ट अटॅकच्या घटनांचे मुख्य कारण म्हणजे वाईट जीवनशैली, खाण-पाण, जास्त वजन, धुम्रपान, मद्यपान आहेत. त्यामुळे तरूणांनी आपली जीवनशैली सुधारणे फार महत्वाचे आहे. विशेष म्हणजे, एखाद्या व्यक्तीच्या कौटूंबिक इतिहासात हार्ट अटॅकचा (Heart Attack) झटका आला असेल किंवा कुटुंबातील कोणतीही व्यक्ती हार्ट अटॅक, रक्तदाब, थायरॉईड किंवा मधुमेहाचा बळी असेल, तर त्या कुटूंबातील व्यक्तींनी स्वत:ची तपासणी करून घेणे आवश्यक आहे.

Cough Syrup : पालकांनो सावधान! राज्यात कफ सिरप बनवणाऱ्या 6 कंपन्यांचे परवाने रद्द

घसा आणि खोकला बराच होत नाहीये?

नागरीकांना सर्दी खोकला आणि घसा खवखवण्याच्याही समस्या सतावत आहेत.या आजारावर रूग्ण डॉक्टरांचाही सल्ला घेत आहेत. मात्र डॉक्टरांच्याही गोळ्याने आजार बरा होत नाही. रूग्णांचा ताप दोन-तीन दिवसात जातोय,मात्र खोकला आणि घसा खवखवण्याची समस्या दोन-तीन आठवडे कायम राहते.यावर गुळण्या आणि वाफ घेऊन देखील सुटका होत नाहीए. त्यामुळे नागरीकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.

खोकला, घसा खवखवण्यावर डॉक्टर काय म्हणाले?

जेव्हाही हवामानात बदल होतो, तेव्हा सर्व श्वसनाचे विषाणू ज्यात आरएनए असते, याला फ्लूचे विषाणू देखील म्हणतात. ते हवामानातील बदलामुळे नागरीकांच्या श्वसन प्रणालीवर हल्ला करतात. ते खुप लवकर उत्परिवर्तन करतात. आरएनए विषाणूच्या उत्परिवर्तनामुळे विषाणूचे नवीन रूपे उद्यास येतात, असे किंग जॉर्ज मेडिकल युनिव्हर्सिटी, लखनऊच्या पल्मोनरी आणि क्रिटिकल केअर मेडिसिन विभागाचे प्रमुख डॉ. वेद प्रकाश म्हणाले आहेत. तसेच व्हायरल इन्फेक्शनमुळे (Viral Infection) वरच्या श्वसन मार्गाचे संक्रमन होऊ शकते, ज्यात खोकला, वारंवार सर्दी, डोकेदुखी आणि ताप तसेच सांधेदुखीचा त्रास होतो.

खोकला आणि सर्दी एका आठवड्यात बरी व्हायची, पण आता तीच बरी व्हायला दोन आठव़डे लागतायत. काही प्रकरणांमध्ये तर तीन-तीन आठवडे लागतायत. कोविडमूळे, हवामानातील बदलामुळे किंवा अन्य कोणत्याही कारणामुळे असे प्रकार घडतायत, असे देखील ते म्हणाले आहेत.

संसर्गामुळे संपुर्ण कुटुंब आजारी पडतेय?

हवामानामुळे आणि कोणत्याही संसर्गामुळे सर्दी आणि खोकल्याचा त्रास होत आहे.त्यासोबत अनेकांना घसा खवखवण्याचा त्रास,कर्कशपणा आणि श्वासोच्छवासाच्या समस्या भेडसावतायत. या प्रकरणात घरातला एक माणूस आजारी पडला की त्यामागून कुटूंबातील इतर सदस्यही आजारी पडतात. ज्या नागरीकांची प्रतिकारशक्ती कमी आहे, त्या लोकांना या आजाराचा संसर्ग होतोय, असे मध्य प्रदेशातील एमजीएम मेडिकल कॉलेजमधील पल्मोनोलॉजिस्ट डॉ. सलील भार्गव यांनी सांगितले.

संसर्गापासुन कसा बचाव कराल?

प्रतिकारशक्ती (Immunity)वाढवण्यासाठी एखाद्याने पोषक तत्वांनी समृद्ध अन्न खावे. जर एखादा व्यक्ती आजारी असेल तर तो डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार व्हिटॅमिन सी, डी आणि मल्टीविटामिनची सप्लिमेट घेऊ शकतो. यामुळे तुमची प्रतिकारशक्ती वाढते आणि तुम्हाला लवकर आराम मिळतो. तसेच रूग्णांनी योगा करावा आणि जास्त त्रास असल्यास स्टीम घेऊ शकता.

दरम्यान वाढत्या संसर्गाच्या आजारामुळे आणि हार्ट अटॅकच्या घटनांमुळे नागरीकांमध्ये दहशतीचे वातावरण आहे. त्यामुळे नागरीकांनी या घटनेत घाबरण्याचे कारण नाही. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार उपचार घ्या, तुमची तब्येत ठणठणीत होईल.

रक्षकच बनले भक्षक! पोलिसांचाच गॅगरेप पिडितेवर बलात्कार Uttar Pradesh: महिलेच्या हत्येचे गूढ 9 वर्षांनंतर एका पोपटाने उलगडलं… Shraddha Arya: बॉलिवूड अभिनेत्रीने पतीच्या वाढदिवसाला घातली बिकिनी, नेटकरी म्हणाले… प्रसुतीनंतर अभिनेत्रीचं अविश्वसनीय ट्रान्सफॉर्मेशन, घटवलं 10 किलो वजन! Amrita Ahuja: हिंडेनबर्गच्या अहवालात भारतीय वंशीय महिलेचं नाव, गंभीर आरोप 38 कोटींचा बेवारस चेक परत केला अन् जे मिळालं त्याने पायाखालची जमीन सरकली Twitter Blue tick: ब्लू टिकसाठी आता पैसे भरा, महिन्याला किती रुपये द्यावे लागणार? H3N2 Virus पासून बचावासाठी ‘या’ घरगुती गोष्टींचा आहारात करा वापर… MS Dhoni: आयपीएलमध्ये धोनी करणार गोलंदाजी? नेटमधील फोटो बघून चाहते बुचकळ्यात Anushka Sharma : ग्लॅमरस ड्रेस, पायात घुंगरांचं पैजण अनुष्काची यूनिक स्टाईल चाहत्यांना भावली वय अवघं 48…काजोल देवगणच्या बोल्ड लूकची चर्चा ‘भाबी जी घर पर हैं’ हा अश्लील शो आहे का? अंगूरी भाभी म्हणाली, ‘मी कधीही…’ हिंदू राष्ट्राचे स्वप्न महाराष्ट्रातूनच पूर्ण होईल: धीरेंद्र शास्त्री या 6 गोष्टी रोज करा.. आयुष्यभर आनंदाची खात्री Salman Khan: कोट्यवधींमध्ये फीस घेतो, तरीही राहतो 1BHK फ्लॅटमध्ये, घरात काय काय? ईशा अंबानीचा रॉयल लूक पाहतच राहाल… मोबाइल दुकानदारावर जडला जीव; पत्नीने रचला कट, पतीची निर्घृण हत्या! 4 फूट उंचीचा ‘तो’ रेसलर, WWE च्या रिंगमध्ये महिला रेसलरला केलेलं KISS बॉलिवूडच्या ललनाचा हॉट बॅकलेस अवतार गर्लफ्रेंडला परत मिळवण्यासाठी ठोठावला कोर्टाचा दरवाजा