सोसायटी रिडेव्हलपमेंटला आडकाठी करणाऱ्या सदस्याला हायकोर्टाचा दणका, 5 लाखांच्या दंडाची शिक्षा

एक सदस्य आपल्या आडमुठ्या वागण्यामुळे सोसायटीला वेठीस धरु शकत नाही - हायकोर्ट
सोसायटी रिडेव्हलपमेंटला आडकाठी करणाऱ्या सदस्याला हायकोर्टाचा दणका, 5 लाखांच्या दंडाची शिक्षा
फोटो सौजन्य - Mandar Deodhar

सोसायटी रिडेव्हलपमेंटमध्ये आडकाठी करणाऱ्या एका सदस्याला मुंबई हायकोर्टाने चांगलाच दणका दिला आहे. रिडेव्हलपमेंटच्या कामात आडकाठी आणून खोटी तक्रार दाखल करत इतरांचा वेळ वाया घालवल्याप्रकरणी हायकोर्टाने तक्रारदार सदस्यालाच 5 लाखांचा दंड सुनावला आहे. जस्टीस जी.एस.कुलकर्णी यांच्या खंडपीठासमोर झालेल्या सुनावणीदरम्यान हा निर्णय देण्यात आला.

जेव्हा सोसायटीतील इतर सदस्यांचं एकमत झालेलं असताना एक सदस्य आडमुठ्या वागण्यामुळे सर्व सोसायटीला वेठीस धरु शकत नाही. अशा घटनांवर कडक कारवाई केली जाणं गरजेचं असून, काही सदस्यांच्या अशा वागण्यामुळे इतर सदस्यांना मिळणाऱ्या लाभापासून वंचित रहावं लागतं असं परखड मत हायकोर्टाने आज सुनावणीदरम्यान नोंदवलं.

जस्टीस कुलकर्णी यांच्या खंडपीठासमोर रमणिकलाल गुटका या सोसायटी सदस्याविरुद्ध बिल्डरने दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी झाली. रमणिकलाल हे एकमेव असे सदस्य आहेत की जे रिडेव्हलपमेंटच्या प्रक्रीयेत सहकार्य करत नाहीत. ते आपला फ्लॅट रिकामा करण्यास नकार देत असल्यामुळे हे काम अडकून पडल्याचं बिल्डरने सांगितलं. मुंबई महापालिकेच्या माहितीप्रमाणे सदर बिल्डींग ही धोकादायक इमारतींमध्ये होती आणि या बिल्डींगच्या रिडेव्हलपमेंटसाठी बिल्डरने आवश्यक त्या सर्व परवानग्या मिळवल्या होत्या.

आपला फ्लॅट रिकामा करुन रमणिकलाल अतिशय आडमुठी आणि चुकीची भूमिका घेत असल्याचं परखड मत जस्टीस कुलकर्णी यांनी आजच्या सुनावणीदरम्यान व्यक्त केलं. रमणिकलाल यांना इतर सदस्यांना मिळणारे फायदे किंवा आर्थिक मोबदला नाकारण्यात आला आहे अशातलाही काही भाग आम्हाला दिसत नाही. त्यामुळे कोर्टाने रमणिकलाल यांना 2 आठवड्यात आपला फ्लॅट रिकामा करण्याचे आदेश दिले आहेत.

दोन आठवड्यात रमणिकलाल यांनी आपला फ्लॅट रिकामा केला नाही तर हायकोर्ट जबरदस्तीने हा प्लॅट रिकामा करेल असंही हायकोर्टाने सांगितलं. तसेच रमणिकलाल यांना सोसायटीला 5 लाखांचा दंडही हायकोर्टाने सुनावला आहे.

सोसायटी रिडेव्हलपमेंटला आडकाठी करणाऱ्या सदस्याला हायकोर्टाचा दणका, 5 लाखांच्या दंडाची शिक्षा
आदित्य ठाकरेंच्या ड्रीम प्रोजेक्टला हायकोर्टाचा दणका, पवई तलावाजवळील सायकल ट्रॅक अवैध

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in