भारतात आणलेल्या चित्त्यांमागचं नागपूरमधलं मराठी कनेक्शन माहित आहे का?
मोदी सरकारने १७ सप्टेंबर या दिवशी म्हणजेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवशी देशात आठ चित्ते आणले. या चित्त्यांची चर्चा चांगलीच झाली. नामिबियातून हे चित्ते मध्य प्रदेशातील कुनो राष्ट्रीय अभयारण्यात आणण्यात आले. १९४७ नंतर पहिल्यांदाच भारतात चित्ते पाहिले गेले. त्याआधी सुरजगुजाच्या राजाने जे आता छत्तीसगढमध्ये आहे तीन चित्ते शिकारीत मारले होते. मात्र आता जे चित्ते आणले […]
ADVERTISEMENT

मोदी सरकारने १७ सप्टेंबर या दिवशी म्हणजेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवशी देशात आठ चित्ते आणले. या चित्त्यांची चर्चा चांगलीच झाली. नामिबियातून हे चित्ते मध्य प्रदेशातील कुनो राष्ट्रीय अभयारण्यात आणण्यात आले. १९४७ नंतर पहिल्यांदाच भारतात चित्ते पाहिले गेले. त्याआधी सुरजगुजाच्या राजाने जे आता छत्तीसगढमध्ये आहे तीन चित्ते शिकारीत मारले होते. मात्र आता जे चित्ते आणले गेले आहेत त्यात नागपूरच्या वन्यजीव आणि संवर्धन आणि ग्रामीण विकास संस्थेशी संबंधित असलेल्या डॉ. प्रज्ञा गिरडकर यांचा सिंहाचा वाटा आहे.
चित्ते नामिबियातून भारतातून आणण्यासाठी कायदेशीर अडथळे दूर झाले ते प्रज्ञा गिरडकर यांच्यामुळेच
चित्ते नामिबियातून भारतात आणण्यासाठी जे काही कायदेशीर अडथळे होते त्यात महत्त्वाची भूमिका बजावली ती प्रज्ञा गिरडकर यांनी. Cheetah Conservation Fund (CCF) या जगभरातल्या प्रसिद्ध संस्थेतर्फे प्रज्ञा गिरडकर यांनी चित्ते संवर्धनाचं प्रशिक्षण घेतलं आहे. अशा प्रकारे ट्रेनिंग घेणाऱ्या त्या पहिल्या भारतीय आहेत.
डॉ. प्रज्ञा गिरडकर यांनी जून २०११ मध्ये CCF नामिबियाचे संचालक लॉरी मार्कर यांच्यासोबत काम केलं. त्याच प्रमाणे याच वर्षी त्यांनी चित्त्यांचं संवर्धन कसं करावं याचं प्रशिक्षण घेतलं. भारतात प्रोजेक्ट चिताह हा २००९ मध्ये मांडला गेला होता. डॉ. मार्कर यांनी प्रकल्पासंदर्भातले काही तज्ज्ञ आणि इतर वन्य जीव अभ्यासक यांच्या भेटी भारतात झाले. २०१० ते २०१२ या दोन वर्षांच्या कालावधीत भारतातल्या १० ठिकाणांचं मूल्यांकन आणि अभ्यास केला गेला त्यानंतर शेवटी कुनो नॅशनल पार्क हे चित्त्यांच्या अधिवासासाठी योग्य संभाव्य ठिकाण म्हणून निश्चित करण्यात आलं.