'फडणवीसजी हिंदी आणायचा प्रयत्न तर करून बघा, फक्त दुकानं नाही... ', राज ठाकरेंचं खुलं आव्हान

मुंबई तक

Raj Thackeray: 'महाराष्ट्रात त्रिभाषा सूत्र 100 टक्के लागू करणार म्हणजे करणार..' असं मत मुख्यमंत्री फडणवीस यांनी मुंबई Tak बैठक या कार्यक्रमात केलं होतं. यानंतर आता राज ठाकरे यांनी जाहीर सभेतून फडणवीसांना याचविषयी खुलं आव्हान दिलं आहे.

ADVERTISEMENT

राज ठाकरेंचं खुलं आव्हान
राज ठाकरेंचं खुलं आव्हान
social share
google news

मिरारोड: 'त्रिभाषा सूत्र 100 टक्के आम्ही महाराष्ट्रात लागू करूच..', असं विधान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबई Tak बैठक या कार्यक्रमात केलं होतं. ज्याला आता मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी खुलं आव्हान दिलं आहे. राज ठाकरे यांची आज (18 जुलै) मिरारोड येथे जाहीर सभा आयोजित करण्यात आली होती. याच जाहीर सभेत बोलताना राज ठाकरेंनी मुख्यमंत्री फडणवीसांना खुलं आव्हान दिलंय. (fadnavisji if you want to hindi compulsion just try it mns chief raj thackeray gave an open challenge to chief minister devendra fadnavis)+

जाहीर सभेत बोलताना राज ठाकरे म्हणाले की, 'आता राज्य सरकारला आत्महत्या करायची असेल तर त्यांनी बेशक करावी. महाराष्ट्रात पहिली ते पाचवी हिंदी आणायचा आपण प्रयत्न तर फक्त करून बघा.. दुकानं नाही, शाळाही बंद करेन.'

हे ही वाचा>> CM फडणवीस म्हणालेले, 'त्रिभाषा सूत्र लागू करूच..' उद्धव ठाकरेंनी पुन्हा दिलं आव्हान

'राज्य सरकारला आत्महत्या करायची असेल तर त्यांनी...', पाहा राज ठाकरे नेमकं काय म्हणाले... 

'महाराष्ट्रात राहतात तर शांतपणे राहा, मराठी शिका.. आमचं काही भांडण नाहीए तुमच्याशी.. पण मस्ती करणार असाल इथे तर महाराष्ट्राचा दणका बसणार म्हणजे बसणार. एवढं लक्षात ठेवा.' 

'खरं तर काय विषय होता, पहिले ते पाचवी हिंदी अनिवार्य.. म्हणजे हिंदी भाषा शिकली पाहिजे. त्यानंतर हे सगळं सुरू झालं.' 

हे वाचलं का?

    follow whatsapp