झटपट श्रीमंत व्हायचं होतं बॉयफ्रेंडला! गर्लफ्रेंडला म्हणाला, कॉलगर्ल हो..GF पुष्पाने ने नकार दिला अन् घडलं..
Couple Love Story Viral News : देशात सतत अशी प्रकरणं समोर येत आहेत, ज्यामध्ये कधी एखादी महिला पतीची हत्या करते, तर कधी एखादा प्रियकर प्रेयसीची हत्या करतो.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट

प्रियकराने प्रेयसीला वेश्या व्यवसायात जाण्यासाठी दबाव टाकला

कॉलगर्ल होण्यासाठी दबाव टाकायचा

चाकूने केला प्रेयसीवर हल्ला
Couple Love Story Viral News : देशात सतत अशी प्रकरणं समोर येत आहेत, ज्यामध्ये कधी एखादी महिला पतीची हत्या करते, तर कधी एखादा प्रियकर प्रेयसीची हत्या करतो. मागील काही दिवसांपासून प्रेमप्रकरणामुळे हत्या केल्याच्या घटना समोर आल्या आहेत. अशातच एक खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. येथे एका प्रियकराने त्याच्या प्रेयसीला म्हटलं की, तू कॉल गर्ल हो..दोघेही मिळून पैसे कमवू. यामुळे प्रेयसी भडकली आणि तिने या गोष्टीला थेट नकार दिला. प्रेयसीने नकार दिल्यानंतर संतापलेल्या प्रियकराने मोठं कांड केलं. हे संपूर्ण प्रकरण आहे तरी काय? जाणून घेऊयात.
ही धक्कादायक घटना आंध्रप्रदेशच्या राजोलू मंडळच्या सिद्धार्थनगरमध्ये एका छोट्या गावात घडली. येथे राहणाऱ्या पुष्पाचं लग्न काही वर्षांपूर्वी झालं होतं. पण पतीसोबत मतभेद झाल्यानंतर ते दोघेही वेगळे झाले. लग्नानंतर तिला एक छोटा मुलगा झाला. ज्याच्यासोबत ती राहत होती. त्याचदरम्यान तिची ओळख शेख शम्मा नावाच्या एका तरुणासोबत झाली. शम्मा आणि पुष्पा यांच्यात हळूहळू जवळीक वाढली आणि मागील सहा महिन्यांपासून ते लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहायचे. सुरुवातीला सर्वकाही ठीक होतं. पुष्पाला वाटलं की, तिला एक नवा जीवनसाथी मिळाला आहे. जे तिला समजून घेईल आणि साथ देईल.
हे ही वाचा >> 'फडणवीसजी हिंदी आणायचा प्रयत्न तर करून बघा, फक्त दुकानं नाही... ', राज ठाकरेंचं खुलं आव्हान
कॉलगर्ल होण्यासाठी दबाव टाकायचा
शम्मीचं खरं रुप हळूहळू समोर आलं. त्याला दारूचं व्यसन होतं आणि पुष्पावर नेहमी संशय घेत होता. त्याची वर्तणूक दिवसेंदिवस वाईट होत होती. एक दिवस त्याने पुष्पाला म्हटलं की, तू कॉलगर्ल हो..त्याने अनेकदा पुष्पावर दबाव टाकला. पण पुष्पाने प्रत्येक वेळी नकार दिला. पण शम्माने तिचं काहीही ऐकलं नाही.
हे ही वाचा >> CM फडणवीस म्हणालेले, 'त्रिभाषा सूत्र लागू करूच..' उद्धव ठाकरेंनी पुन्हा दिलं आव्हान
चाकूने केला प्रेयसीवर हल्ला
बुधवारच्या रात्री पुष्पा तिच्या आईच्या घरी गेली होती. शम्मीही तिथे उपस्थित होता. त्याने पुन्हा पुष्पाला वेश्या व्यवसाय सुरु करण्यासाठी दबाव टाकला. ही गोष्ट इतकी वाढली, की दोघांमध्ये वादविवाद सुरु झाले. रागाने फणफणलेल्या शम्माने पुष्पावर चाकूने हल्ला केला. त्याने पुष्पाच्या मानेवर आणि पायावर वार केले. त्यानंतर पुष्पा रक्ताच्या थारोळ्यात पडली आणि तिचा मृत्यू झाला. एवढच नाही, तर शम्माने पुष्पाची आई आणि भावावरही हल्ला केला.