मुख्यमंत्र्यांनी 'त्या' सर्व ऑडिओ क्लिप्स ऐकाव्यात-फडणवीस - Mumbai Tak - it seems that cm is not serious about pooja chavan suicide case says devendra fadanavis - MumbaiTAK
बातम्या

मुख्यमंत्र्यांनी ‘त्या’ सर्व ऑडिओ क्लिप्स ऐकाव्यात-फडणवीस

पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरण मुख्यमंत्र्यांनी किती गांभीर्याने घेतलं आहे ते माहित नाही. त्यांचं या सगळ्या प्रकरणाबद्दलचं वक्तव्य मी ऐकलं. कदाचित त्यांनी हे प्रकरण गांभीर्याने घेतलेलं नाही किंवा त्यांनी याबद्दलची सखोल माहिती घेतलेली नाही. माझं मत असं आहे की एकदा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्या सगळ्या क्लिप्स काळजीपूर्वक ऐकाव्यात म्हणजे त्यांना या प्रकरणातलं गांभीर्य समजेल असं […]

पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरण मुख्यमंत्र्यांनी किती गांभीर्याने घेतलं आहे ते माहित नाही. त्यांचं या सगळ्या प्रकरणाबद्दलचं वक्तव्य मी ऐकलं. कदाचित त्यांनी हे प्रकरण गांभीर्याने घेतलेलं नाही किंवा त्यांनी याबद्दलची सखोल माहिती घेतलेली नाही. माझं मत असं आहे की एकदा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्या सगळ्या क्लिप्स काळजीपूर्वक ऐकाव्यात म्हणजे त्यांना या प्रकरणातलं गांभीर्य समजेल असं वक्तव्य देवेंद्र फडणवीस यांनी नागपुरात केलं आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या प्रकरणातली माहिती नीट घ्यावी म्हणजे कुणाचं आयुष्य उद्ध्वस्त होतं आहे हे त्यांना लक्षात येईल असंही फडणवीस यांनी म्हटलं आहे.

पूजा चव्हाण या टिकटॉक स्टारने 7 फेब्रुवारीला आत्महत्या केली. ही मुलगी पुण्यात इंग्लिश स्पिकिंगचा कोर्स करण्यासाठी आली होती, ती भावासोबत राहात होती. ती पुण्यात ज्या इमारतीत वास्तव्य करत होती त्याच इमारतीवरून उडी मारून तिने आत्महत्या केली. तिच्या आत्महत्येनंतर 12 ऑडिओ क्लिप्स व्हायरल झाल्या आहेत. यानंतर भाजपने वनमंत्री आणि शिवसेनेचे नेते संजय राठोड यांच्यावर या प्रकरणी आरोप करत त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.

पाहा मुंबई तकचा खास व्हिडीओ

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे काय म्हणाले होते?

पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणाबद्दल जेव्हा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना विचारण्यात आलं तेव्हा “पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणाची व्यवस्थित आणि सखोल चौकशी होईल.त्यानंतर गरज असेल त्यांच्यावर योग्य ती कारवाई केली जाईल. सत्य जनतेसमोर आणलं जाईल यात काहीही शंका नाही. गेले काही दिवस, काही महिने असंही लक्षात आलं आहे की आयुष्यातून उठवण्याचाही प्रयत्न केला जातो आहे. असा प्रयत्न होऊ नये आणि सत्यही समोर आलं पाहिजे यासाठी योग्य जे काही असेल ते केलं जाईल.” असं वक्तव्य त्यांनी केलं होतं.

त्यांच्या या वक्तव्यावर आता विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे. हे सगळं प्रकरण मुख्यमंत्र्यांनी गांभीर्याने घ्यावं असं देवेंद्र फडणवीस यांनी सुचवलं आहे. तसंच व्हायरल झालेल्या 12 ऑडिओ क्लिप्स ऐकाव्यात असाही सल्ला दिला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

eighteen − seven =

शरीरातील 7 ठिकाणी वेदना जाणवल्या तर समजा… जान्हवीसोबत ओरी… ‘या’ लुकसाठी खर्च केले ‘एवढे’ लाख! इम्रानसोबतच्या किसिंग सीनबाबत तनुश्री दत्ताचा मोठा खुलासा शमीची पत्नी हसीन जहाँला चीअर लीडर म्हणून एवढा होता पगार! मुलाच्या जन्मानंतर IAS टीना दाबी खूपच बदलली, फोटो व्हायरल बॉबीने Animal मध्ये नाना पाटेकरची केली कॉपी? ‘हा’ व्हिडिओ पाहिल्यानंतर.. Ritu Suhas: ग्लॅमरस IAS अधिकारी, रॅम्पवर जलवा UPSC मुलाखतीत सर्वाधिक विचारले जातात ‘हे’ प्रश्न पोटाची चरबी 15 दिवसात होईल कमी, फक्त ‘या’ बिया खा अन् पाहा कमाल! तेजस्वीचा 9 वर्षांनी मोठ्या बॉयफ्रेंडसोबत सर्वांसमोरच liplock kiss तुम्ही मानसिकदृष्ट्या वृद्ध बनत आहात का..? ‘या’ गोष्टीमुळे शांत झोप कधीच नाही लागणार ‘या’ लोकांनी चुकूनही दूध पिऊ नये… मराठी सिनेसृष्टीत येतोय नवा चेहरा; जिच्या रूपाची आधीपासूनच का आहे एवढी चर्चा? भारतातील 8 सर्वात तरुण महिला IAS अधिकारी; तुम्हाला किती माहितीयेत? Apurva Nemlekar: अपूर्वाचा स्विमिंग पूलमध्ये ‘खेळ चाले…’ मादक अदा अन्… ह्रतिक रोशन-दीपिका पदुकोणचा Fighter मध्ये रोमान्स, बघा Video UPSC: अभिनेत्री नाही.. तर ही आहे मोठी अधिकारी, सगळेच करतात सॅल्यूट! Belly Fat: सकाळी उठल्यानंतर ‘या’ 8 गोष्टी करून वाढलेलं पोट करा कमी! IAS अधिकारी व्हायचंय? मग ‘या’ Top 7 गोष्टींची सवय असलीच पाहिजे