Mumbai Tak /बातम्या / Kasba Peth election : उमेदवार म्हणून कमी पडलो.. हेमंत रासनेंची प्रतिक्रिया
बातम्या राजकीय आखाडा

Kasba Peth election : उमेदवार म्हणून कमी पडलो.. हेमंत रासनेंची प्रतिक्रिया

Kasba Peth Assembly By election results Hemant Rasane Defeat : कसबा पेठ विधानसभा पोटनिवडणुकीत भाजपला मोठा झटका बसला आहे. कारण भाजप-महायुतीचे उमेदवार हेमंत रासने (Hemant Rasane) हे पराभूत झाले आहेत. तर काँग्रेस-महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर (Ravindra Dhangekar) यांनी विजयाचा गुलाल उडवला आहे. रवींद्र धंगेकर यांनी तब्बल 11 हजार 40 मतांनी हेमंत रासने यांचा पराभव केला आहे. या पोटनिवडणूकीतील पराभवानंतर आता हेमंत रासने यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे. (kasba peth assembly by election result 2023 hemant rasane after defeat first reaction)

Kasba Peth By Election Results: धंगेकरांनी घडवला इतिहास! भाजपने बालेकिल्ला गमावला

11 हजार 40 मतांनी पराभव

कसबा पोटनिवडणुकीत (Kasba Peth election Results) कॉंग्रेसने इतिहास रचला आहे. भाजपच्या गडाला खिड्डार पाडत 28 वर्षानंतर कसब्यात कॉग्रेसचा उमेदवार विजयी झाला आहे. काँग्रेस-महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर मोठ्या मताधिक्यांनी विजयी ठरले आहेत. भाजप-महायुतीचे उमेदवार हेमंत रासने यांचा पराभव करत रवींद्र धंगेकर (Ravindra Dhangekar) विजयी ठरले आहेत. रवींद्र धंगेकर यांनी तब्बल 11हजार 40 मतांनी हेमंत रासने यांचा पराभव केला आहे. रवींद्र धंगेकर यांना 73 हजार 194 मतं मिळाली, तर हेमंत रासने यांना 62 हजार 244 मतं मिळाली आहेत.

Kasba Peth election Results: मतदारांचा भाजपला दणका, धंगेकर, रासनेंना किती मतं?

शेवटच्या निकालापर्यंत मतांची आघाडी कायम

कसबा पेठ पोटनिवडणुकीच्या निकालात काँग्रेस-महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकरांनी मतांची आघाडी शेवटपर्यंत कायम ठेवली होती. 11व्या फेरीअखेर धंगेरकर यांनी 3,122 मतांची आघाडी घेतली होती. 13 व्या फेरीअखेर हीच आघाडी 5 हजार 86 वर पोहोचली होती. निकालाच्या शेवटच्या टप्प्यात कल रवींद्र धंगेकरांच्याच बाजूनेच येत होते.त्यामुळे ते मतांची आघाडी घेत होती. तर धंगेकर यांनी 18व्या फेरीअखेर 9 हजार 49 मतांची आघाडी घेतली आहे. शेवटच्या दोन फेऱ्यांमध्ये धंगेकरांच्या मतांची आकडेवारी वाढतच गेली. आणि रवींद्र धंगेकर यांनी तब्बल 11हजार 40 मतांनी हेमंत रासने यांचा पराभव केला आहे. रवींद्र धंगेकर यांना 73 हजार 194 मतं मिळाली, तर हेमंत रासने यांना 62 हजार 244 मतं मिळाली आहे. या निकालाने भाजपला बालेकिल्यात खिंडार पडलं.

पराभवानंतर हेमंत रासने काय म्हणाले?

“2019 मध्ये किंवा त्यापूर्वी निवडणुका तिरंगी-पंचरंगी झाल्या. यंदा प्रथमच थेट लढत होती. त्यात उमेदवार म्हणून मी कमी पडलो. जनतेचा कौल मान्य आहे. मात्र यापुढेही लोकांच्या सेवेसाठी सक्रिया राहणार,” असे भाजपचे पराभूत उमेदवार हेमंत रासने (Hemant Rasane) म्हणाले आहेत.

---------
‘मेरा दिल तेरा दिवाना…’, तरुणी अचानक रेल्वे स्टेशनवर का नाचली? Bollywood: वय 50च्या पुढे पण आजही दिसतात पंचवीशीतल्या, पाहा कोण आहेत ‘या’ अभिनेत्री IPL 2023 : 12 क्रिकेटपटू खेळू शकणार नाही सुरूवातीचे सामने, पहा कोण आहेत ते? मुकेश अंबानींचा दुबईतील बंगला पाहिला का?, किंमत ऐकून व्हाल हैराण! IPL : एमएस धोनी याबाबतीत सर्वात पुढे, रोहित-विराट खूपच मागे ‘मला बाथरूममध्ये नेत…’, शिव ठाकरेने सांगितला कास्टिंग काऊचचा भयंकर अनुभव पोलीसाने भर रस्त्यात गर्लफ्रेंडला केलं प्रपोज, पुढे काय घडलं? Video व्हायरल Akanksha Dubey: अभिनेत्री आकांक्षाचा मृत्यू कसा झाला? पोस्टमॉर्टेम रिर्पोटमध्ये कळलं कारण अनुष्का शर्माचे टॅक्स प्रकरण काय? विक्रीकर विभागाचे म्हणणे काय? रस्त्यावर दगडं, गाड्यांची राखरांगोळी, छत्रपती संभाजीनगरातील ही दृश्ये बघितली का? WPL लाइव्ह मॅचमध्ये टीम इंडियाच्या ‘या’ स्टार खेळाडूंनी धरला ठेका, Video व्हायरल! Facebook-Instagram वर ब्लू टिक हवीये? भारतीयांसाठी असे आहेत प्लान Ayodhya: अयोध्येतील यंदाची रामनवमी आहे विशेष, भाविकांचा लोटला जनसागर सुहाना खान अमिताभच्या नातवाला करतेय डेट? Samantha Ruth Prabhu: कुटुंबीयांनी विरोध केला, पण मी…, सामंथाने सोडलं मौन रस्त्यावर विकले जाणारे ‘हे’ पदार्थ मुकेश अंबानींच्या फार आवडीचे! 15व्या वर्षी राहिलेली गरोदर… मुलीने सांगितली इमोशनल स्टोरी! 2 मुलांची आई, वय 40 पेक्षा जास्त; तरीही ‘या’ अभिनेत्री… एकाच वेळी घेतला तीन मुलींनी जन्म, रचला ‘हा’ विक्रम बिकनीत फोटो शेअर करण पडलं महागात, तरूणीला लाखोंचे नुकसान