Kusha Kapila shares Fake dating App Profile : प्रसिद्ध युट्यूबर आणि व्हिडिओ क्रिएटर कुशा कपिला (Kusha Kapila) सोशल मीडियावर खुप सक्रिय असते. सोशल मीडियावर (Social Media) व्हिडिओ शेअर करून ती चाहत्यांचे मनोरंजन करत असते. मात्र याच कुशा कपिलाला आता मोठा धक्का बसला आहे. कारण कुशा कपिलाच्या फोटोंच्या दुरूपयोग करण्यात आला आहे. तिच्या या फोटोद्वारे बंबल (Bumble) डेटींग अॅपवर फेक अकाऊंट तयार करण्यात आला आहे. या घटनेची माहिती मिळताच कुशाने ट्विट करून चाहत्यांना याची माहिती दिली. तसेच चाहत्यांना या खात्याची तक्रार करण्याचे आवाहन केले आहे.(kusha kapila shares fake dating apo profile using her pics calls identity theft)
कुशा कपिला (Kusha Kapila)एक स्टॅडअप कॉमेडियन आहे. सोशल मीडियावर ती तिचे कॉमेड़ी व्हिडिओ शेअर करत असते. यामुळेच सोशल मीडियावर ती ती खुप प्रसिद्ध आहे. कुशा कपिलाच्या फोटोंचा दुरुपयोग करून बंबल ड़ेटींग साईटवर (Dating Site) फेक अकाऊंट तयार करण्यात आले आहे. याबाबत कुशाने ट्विट करत चाहत्यांना माहिती दिली आहे. बंबल (Bumble) साईटवर बनवण्यात आलेल्या अकाऊंटवर तिचे नाव सना लिहिण्यात आले आहे. तसेच तिचे वय यावर 33 सांगण्यात आले आहे.तर या अकाऊंटवर तिचे ठिकाण पंजाबचे होशियारपुर सेट करण्यात आले आहे.
Satish Kaushik : फार्महाऊसवर सतीश कौशिक सोबत काय झालं? पोलिसांकडून चौकशी सुरू
कुशाच्या ट्विटमध्ये काय?
कुशाने (Kusha Kapila) ट्विटवर बंबलवरील या फेक अकाऊंटचा स्क्रिनशॉट शेअर केला आहे. या स्क्रिनशॉटसह तिने, सनाचा आवडता रंग कोणता आहे? नावाच्या स्पेलिंगमध्ये दोनदा एन का आहे? म्युझिकमध्ये कोणती कॅटेगरी आवडते? ती प्रेमावर विश्वास ठेवते का? तिला एपी ढिल्लन आवडते का? असे अनेक प्रश्न विचारले आहेत. कुशाने या प्रकरणात अनेक ट्विट केले आहे. तसेच चाहत्यांना या अकाऊंटची तक्रार करण्याचे आवाहन केले आहे. कुशाच्या या ट्विटनंतर अनेकांनी तिला ट्रोल केले. तर अनेक जण तिचे समर्थनही करत आहेत.अनेक चाहत्यांनी तिला आयटी कायद्याअंतर्गत तक्रार करण्याचा सल्ला दिला आहे.
wdyt is Sanna’s favourite colour? Why does she spell her name with two Ns? What’s her fave genre of music? Does she believe in love? Does she like AP Dhillon? Questions that will keep me up at night other than identity theft. pic.twitter.com/iN9l5Q1fgW
— Kusha Kapila (@KushaKapila) March 6, 2023
प्रेग्नेंट नीना गुप्ताला घातलेली लग्नाची मागणी, सतीश कौशिकांचा ‘तो’ किस्सा
कुशा कपिलाही (Kusha Kapila) सोशल मीडियावर कॉमेडी व्हिडिओसाठी प्रसिद्ध आहे. ती अनेक पॉप्युलर टीव्ही शोमध्ये देखील दिसली आहे. इन्टाग्रामवर तिचे 30 लाखहून अधिक फॉलोअर्स आहेत, तर युट्यूबवर तिचे 8 लाख फॉलोवर्स आहेत. ट्विटरवर तिला 38 हजाराहून अधिक लोक फॉलो करतात. आता या प्रकरणात ती तक्रार करून फेक अकाऊंट तयार करणाऱ्या व्यक्तीला जेलची हवा खायला लावते का? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
प्रसिद्ध अभिनेते सतीश कौशिक यांचं निधन; बॉलिवूडवर शोककळा